Site icon InMarathi

जगातील १० असे देश जेथे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे

Gas-Station InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

भारतात रोज पेट्रोलच्या किंमती वाढत असतात. त्यामुळे नेहमीच वाहनचालकांमध्ये या बद्दल नाराजी दिसून येते. अर्थात त्यांची नाराजी ही रास्तच आहे, कारण पेट्रोल निव्वळ पैश्यांनी जरी वाढलं, तरी त्यांच पेट्रोलचं अर्थ कारण बिघडतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं.

असं हे पेट्रोल आपल्या देशासाठी नेहमीच एक महागाईची गोष्ट ठरली आहे, पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगात सर्वत्र ही परिस्थिती नाही, जगात असे काही देश आहेत जेथे पेट्रोल पाण्यापेक्षाही स्वस्त आहे. काय म्हणता? विश्वास बसत नाही, चला तर मग, आज जाणूनच घ्या त्या १० देशांद्दल जेथे पेट्रोलच्या दरवाढीची चिंता कोणीही करत नाही.

 

तुर्कमेनिस्तान

 

पेट्रोल ९.३१  रुपये लिटर

तुर्कमेनिस्तानकडे नैसर्गिक वायूंचेही मोठे भांडार आहे. याबाबत हा देश जगात चौथ्या स्थानावर आहे.

 

इजिप्त

पेट्रोल १४.७० रुपये लिटर

इजिप्तसाठीही तेलाचे भांडार उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे. येथे गेल्या काही वर्षांत इतर देशांपेक्षा सर्वाधिक नवे तेलाचे भांडार शोधले गेले.

 

बहारीन

पेट्रोल १०.२९ रुपये लिटर

आखाती देशांत सर्वप्रथम कच्च्या तेलाचे भांडार बहारीनमध्येच आढळले होते. येथे दररोज ४० हजार बॅरल तेलाचे उत्पादन होते.

 

अल्जिरिया

पेट्रोल १५.६८ रुपये लिटर

तेलाच्या निर्यातीतूनच या देशाला ९७ टक्के महसूल मिळतो.

 

व्हेनेझुएला

पेट्रोल १.४७  रुपये लिटर

या देशाने सर्वात स्वस्त पेट्रोलबाबत सौदी अरेबियालाही मागे टाकले आहे.

 

सौदी अरेबिया

पेट्रोल ६.३७ रुपये लिटर

या देशात २६७ अब्ज बॅरल तेलसाठा आहे. जगात तो दुसऱ्या क्रमांकाचा साठा आहे.

 

कतार

पेट्रोल ११.७६ रुपये लिटर

कतारच्या अर्थव्यवस्थेत पेट्रोलियम उत्पादनाचे स्थान माकडहाडासारखे आहे. सरकारला ७० टक्के महसूल त्यातूनच मिळतो.

 

ओमान

पेट्रोल १५.६८ रुपये लिटर

या देशाकडे जवळपास ५.५ अब्ज बॅरल तेलाचे भांडार आहे.

 

कुवेत

पेट्रोल १०.७८ रुपये लिटर

कुवेतकडे जगातील तेल भांडाराचा आठवा हिस्सा आहे. तेलाचे उत्पादन व निर्यातीत आघाडीच्या देशांत त्याचे स्थान आहे.

 

लिबिया

पेट्रोल ६.८६ रुपये लिटर

आफ्रिकन देशांपैकी सर्वात मोठे तेल भांडार लिबियाकडे आहे. याबाबत जगात लिबियाचे आठवे स्थान आहे.

 

या सर्व किंमतीमध्ये कमी अधिक प्रामाणात परिस्थितीप्रमाणे चढउतार सुरु असतात, पण कधीही ही किंमत भरमसाठ वाढत नाही हे विशेष!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version