स्वतंत्र भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री जी चक्क सायनाईड कॅप्स्युल घेऊन फिरायची!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक भारतीयांनी प्राण पणाला लावून सहभाग घेतला. जात, धर्म, आर्थिक स्तर यांच्यापलीकडे जावून ही देशप्रेमाची गंगा वाहिली. या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांइतकेच महिलांचे देखील योगदान राहिले आहे. आज स्वतंत्र भारताच्या अर्थमंत्री एक महिला आहेत.
एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा एक महिला आहेत. देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर एक महिला विराजमान होत्या. या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधानांनी तर अनेक किर्तिचे क्षण मानांकीत केले आहेत.
भारतीय राजकारणात अशा अनेक कर्तुत्ववान महिला होवून गेल्या आणि आजही आहेत. यात आणखी एक महत्वाचे नाव आहे ‘सुचेता कृपलानी.’ ज्या स्वतंत्र भारतातील पहिल्या ‘महिला मुख्यमंत्री’ होत्या.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
उत्तर प्रदेशसारख्या राज्याची मुख्यमंत्री होण्याची एवढी मोठी जबाबदारी त्या काळात एका महिलेवर कशी काय देण्यात आली. एका महिलेला मुख्यमंत्री करण्याची कसरत का बरे करण्यात आली? चला जाणून घेऊया या स्टोरी मागची स्टोरी.
मुळच्या बंगाली असलेल्या सुचेता यांचा जन्म २५ जून१९०८ रोजी हरयाणा मध्ये झाला. त्यांचे वडील, एस. एन. मजुमदार हे डॉक्टर होते. त्याकाळात ते ब्रिटिश सेवेत होते. सुचेता यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इंद्रप्रस्थ आणि सेंट स्टीफन कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
स्वातंत्र्यानंतर जेव्हा फाळणीची दंगल उसळली तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांच्या सोबत उसळलेला जनक्षोभ सावरण्याचे काम केले. जेव्हा भारतासाठी संविधान बनवायचे होते, तेव्हा संविधान सभा स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुचेता कृपलानी यांचा समावेश होता.
त्यांनी भारतीय संविधानात महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुचेता कृपलानी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला १९५२ मध्ये आचार्य जेबी कृपलानी यांचे नेहरूंसोबतचे संबंध बिघडले. त्यांनी वेगळा पक्ष काढला. कृषक मजदूर प्रजा पार्टी. काँग्रेसच्या विरोधात हा पक्ष उभा राहिला.
१९५२ च्या लोकसभा निवडणुकीत सुचेता या पक्षाकडून लढल्या आणि नवी दिल्लीतून विजयी झाल्या, १९५७ मध्ये त्यांना नवी दिल्ली विधानसभेचे सदस्य बनवून लघु उद्योग मंत्रालय देण्यात आले. यानंतर, १९६२ मध्ये त्या कानपूरमधून उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या.
एका वर्षानंतर १९६३ मध्ये सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. भारतात महिला मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांना मुख्यमंत्री करण्यामागच्या घडामोडीत एक रंजक आणि ट्विस्टेड गोष्ट लपलेली होती.
सुचेता यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत जेबी कृपलानी एकदा म्हणाले होते, “आतापर्यंत मी काँग्रेसचे लोक मूर्ख आहेत असे समजायचो. पण आता गुंडही असल्याची माहिती मला समजली आहे जे इतरांच्या बायका घेऊन पळून जातात.”
सुचेता या स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय नेत्या होत्या. त्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास देखील भोगला होता. १५ ऑगस्ट रोजी जेव्हा नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले तेव्हा त्या आधी सुचेता यांनी ‘वंदे मातरम’ गायले होते.
–
- लालू प्रसाद फ्लर्ट करत पाकिस्तानी अँकरला चक्क “आती क्या घुमने?” म्हणाले होते…
- देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा
–
१९६२ मध्ये गोंडामधून विजयी होऊन त्या पुन्हा संसदेत पोहोचल्या. त्याच वेळी, सुचेता यांना यूपीच्या बस्ती सीटवरून उठवण्यात आले आणि त्यांना विधानसभेत पाठवण्यात आले जेणेकरून त्यांना यूपीची कमान सोपवता येईल. यानंतर १९६३ मध्ये त्या देशाच्या आणि यूपीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.
उत्तर प्रदेशातील राजनीती हा जिवावरचा खेळ असतो. हे आजवर अनेक उदाहरणातून सिद्ध झाले आहे. सुचेता यांचा उत्तरप्रदेशाशी काहीच संबंध नव्हता तरी त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यावेळी कोंग्रेस मधील काही नेत्यांचे प्रस्थ एवढे वाढले होते की त्यामुळे नेहरू चिंतित होते. यातच युपी मध्ये त्यावेळचे नेते ‘ चंद्रभानू गुप्ता यांचा प्रभाव नेहरूंपेक्षा जास्त होता.
त्यामुळे १९६३ मध्ये काँग्रेसने कामराज योजना आणली की देशातील प्रत्येक राज्यात पक्ष मजबूत व्हावा म्हणून जुन्या लोकांना त्यांची पदे सोडावी लागतील. मात्र चंद्रभानू गुप्ता यांच्या जाण्याने मुख्यमंत्री कोणाला करायचे, असा पेच निर्माण झाला.
कारण चौधरी चरण सिंग, कमलापती त्रिपाठी, हेमवती नंदन बहुगुणा यांच्यासह अनेक जण त्याचे दावेदार होते.
खुद्द चंद्रभानूच्या गटाला खूप राग आला होता. त्यामुळे काँग्रेसने अनपेक्षितपणे एका महिलेची मुख्यमंत्रीपदी निवड केली. तोपर्यंत देशातील कोणत्याही राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झाली नव्हती. सुचेता कृपलानी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्याचवेळी युपी मध्ये अनेक जण बंडखोरी करण्याच्या तयारीत होते.
मात्र हा डाव खेळून काँग्रेसने बंडखोरांना काही क्षणांसाठी शांत केले होते. नेहरूंनी सुचेता यांना आपले शस्त्र बनवले होते. १९६३ मध्ये त्या भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. हे सर्व राजकारणासाठी केले गेले.
त्यांच्या कारकिर्दीत एक घटना घडली जी सर्वांच्या लक्षात राहिली. वेतनवाढीवरून सरकारी कर्मचारी संपावर गेले. ६२ दिवस संप चालला पण सुचेता यांनी तो संप यशस्वी होवू दिला नाही आणि पेमेंट वाढवले नाही.
१९६२ मध्ये यूपीमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एक कमलापती त्रीपाठी यांचा होता. दुसरा चंद्रभानू गुप्ता यांचा होता. गुप्ता यांनी सुचेता यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रेरित केल्याचे बोलले जाते. कारण खुद्द गुप्ता निवडणूक हरले. कमलापतींनी मुख्यमंत्री व्हावे, अशी गुप्ता यांची इच्छा नव्हती.
तो काळ राजकारणाच्या टिपेचा काळ होता. एक महिला असल्याने आपल्यासोबत काही घातपात होईल अशी आशंका सुचेता यांना सतत वाटत होती. त्यातच उत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती. कारण त्यावेळी तिथल्या महिलांसोबत काहीही घडत होतं.
याचा उल्लेख एका पुस्तकात आहे. ग्रेट वुमन ऑफ मॉडर्न इंडिया या नावाने ही मालिका आली होती. त्यातील सुचेता कृपलानी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात या गोष्टी आहेत.
यानंतर सुचेता यांनी १९७१ मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतली. काही दिवस सामान्य जीवन व्यतीत केले. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांचे निधन झाले.
उत्तर प्रदेशसारख्या राजकारणाचे अनेक कंगोरे असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री होणे हे एखादा अवघड पण स्वीकारण्यासारखे असताना एक महिला त्या राज्याची मुख्यमंत्री होते आणि इतकेच नाही तर मोठ्या धाडसाने, प्रसंगी सोबत सायनाईड ची कॅप्सूल स्वत:सोबत ठेवून धाडसाने सर्वत्र वावरते!
यासाठी मोठी जिगर लागते जी सुचेता कृपलानी यांच्याकडे होती. म्हणूनच उत्तर प्रदेश सारख्या राज्याच्या त्या मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरल्या होत्या.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.