Site icon InMarathi

मोदींची प्रशंसा केली म्हणून या विद्यार्थ्याची अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने डिग्री रद्द केली…

danish final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज देशात जरी वेगवेगळे जाती धर्म अस्तित्वात असतील तरी सुद्धा आपला देश आज प्रामुख्याने दोन गटात विभागाला गेला आहे तो म्हणजे मोदी समर्थक आणि मोदी विरोधक. २०१४ साली एक नवा इतिहास घडला, अनेक वर्ष काँग्रेसचे असलेले सरकार जाऊन भाजपचे सरकार आले. मोदींनी निवडणून येण्यासाठी हरप्रकराचे तंत्र वापरले.

नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि आल्या आल्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली. देशातील काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नोटबंदी सारखा मार्ग अवलंबला, मात्र त्यांचा हा मार्ग काही फळाला आला नाही उलट लोकांचा रोष त्यांनी ओढवून घेतला.

 

 

आज सोशल मीडियावर दिवसरात्र हे दोन गट एकेमकांशी भांडत असतात, मोदींची कामगिरी आणि अपयश या दोन मुद्द्यांवरून एकेमकांना टोले लगावत असतात. आज मोदींना पाठिंबा देण्यासाठी सर्वात मोठा वर्ग आहे तो म्हणजे युवा, मात्र एका तरुणाला मोदींना पाठिंबा देणे महागात पडले आहे, कोण आहे तो तरुण चला तर मग जाणून घेऊयात…

 

 

कोण आहे तो मुलगा?

देशात आज अनेक नवी जुनी अशी विद्यापीठ आहेत जिथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्न करत असतात. असेच एक विद्यापीठ म्हणजे अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, गेल्या १०० वर्षात अनेक मात्तबर मंडळी या विद्यापीठातून शिकली आहेत. मात्र दानिश रहीमच्या शिक्षणावर कुऱ्हाड कोसळली आहे.

 

 

दानिश सोशल मीडियावर व्यक्त झाला त्यात त्याच असं म्हणणं आहे की, नरेंद्र मोदींची मी सोशल मीडियावर प्रशंसा केली, त्यांची प्रशंसाया विद्यार्थ्याने  मला चांगलेच महागात पडले आहे कारण अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने मला माझी डिग्री परत करण्याची नोटीस पाठवली आहे. तसेच नरेंद्र मोदींनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा.

 

तो पुढे म्हणाला की, ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने मला भाषाशास्त्रात मिळालेली पदवी परत करण्यास सांगितले आहे तसेच त्यांचं असं म्हणणं आहे की त्याऐवजी जाहिरात आणि विपणन विषयातील डिग्री घेण्यास सांगितले आहे. ही डिग्री मिळवण्यासाठी मी तब्बल ५ वर्ष मेहनत घेतली आहे. तर मी ही डिग्री कशी परत करू शकतो? असा सवाल त्याने केला आहे.

विद्यापीठाचे म्हणणे काय?

प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अलिगगढ  विद्यापीठाने मात्र हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत, विद्यापीठाचे प्राध्यापक शफी कीडवे म्हणाले की, ‘भाषाशास्त्र विभागाच्या एलएमएम कोर्स मध्ये एमए आणि पीएचडी केली आहे, जे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएमएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएमएममधील पदवी मिळायला हवी, चुकून भाषाशास्त्रातील पदवी दिली गेली आहे. प्राध्यापकांनी पुढे स्पष्टीकरण दिले की चुकून ही घटना घडली असून त्याचा राजकारणाशी संबंध लावू नये..

 

 

आता यातील चूक नेमकी कोणाची हे काही दिवसात कळेलच मात्र प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या विद्यापीठाकडून होणारी चूक अंत्यत लाजिरवाणी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version