आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूडमध्ये आपली मत परखडपणे मांडणारे अनेकजण आहेत, अगदी आजकालच्या कंगना स्वरा असोत किंवा जावेद अख्तर, शबाना आझमी असो, देशातील राजकरण असो किंवा एखादी घटना घडली की ही मंडळी आपसूकच आपापली मत मांडत असतात. मध्यंतरी जावेद अख्तरांनी तालिबान्यांची तुलना RSS च्या लोकांशी केली होते, यावरून बराच वाद निर्माण झाला होता.
खरं तर आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली असल्याने प्रत्येकालाच आपला मत मांडायचा हक्क आहे. त्यामुळे जो तो आपला हक्क बजावत असतो, कधी कधी केवळ प्रसिद्धीसाठी देखील बॉलीवूडची मंडळी वादग्रस्त विधाने करून लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.
जावेद अख्तर, शबाना आझमी, नसरुद्दीन शाह यांच्याच पंक्तीमधील एक आणखीन एक व्यक्ती जी आपल्या सडेतोड स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्ध आहे ती म्हणजे जया बच्चन. बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांची पत्नी.
पडद्यावरची सोज्वळ असणारी ही गुड्डी खऱ्या आयुष्यात मात्र बरीच फटकळ स्वभावाची असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये त्यांनी नाव तर कमावलेच त्यांनतर त्यांनी राजकरणात उडी घेतली. समाजवादी पार्टी तर्फे २००४ सालापासून राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत.
सध्या त्या चर्चेत आल्या आहेत ते वादग्रस्त विधानामुळे नव्हे तर अधिवेशनामध्ये ज्या खासदारांना निलंबित केलं होते त्या खासदारांना त्यांनी चॉकलेट वाटले, मात्र कधीकाळी जया बच्चन यांना सुद्धा आपला खासदारकीपद सोडावं लागलं होत, नेमकं काय झालं होत चला तर मग जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं?
हे प्रकरण २००६ सालातलं आहे जेव्हा समाजवादी पार्टीचे अमर सिंग आणि बच्चन परिवाराचे मैत्रीपूर्ण संबंध होते. २००४ साली त्या पार्टीकडून राज्यसभेवर गेल्या मात्र २००६ साली त्यांना अपात्र ठरवले कारण तेव्हा जया बच्चन या उत्तर प्रदेश चित्रपट विकास मंडळाच्या अध्यक्षपद भूषवित होत्या.
राज्यघटनेच्या कलम १०२ नुसार कोणत्याही खासदाराला भारत सरकाराच्या अंतर्गत कायद्याद्वारे घोषित केलेल्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात लाभाचे कोणतेही पद धारण करण्यास प्रतिबंध करते. तसेच EC च्या अंतर्गत राजसभेच्या अध्यक्षाला वर्तमान सदस्याला अपात्र ठरवण्याचा अधिकार असतो.
जया बच्चन प्रमाणे अमर सिंग यांच्याबाबत देखील अशीच घटना घडली, ते उत्तर राज्य विकास परिषदेचे अध्यक्ष असताना एकीकडे राज्यसभेचे पद भूषवत होते, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
—
- बच्चनजी मधे आले म्हणून नाहीतर राजीव गांधी फिल्मस्टार झाले असते!
- जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप
—
आपलं पद गेल्यांनतर साहजिकच जय बच्चन संतप्त झाल्या होत्या, तेव्हा काँग्रेसचे सरकार अस्तित्वात होते. त्यांनी काँग्रेसला यासाठी जबाबदार ठरवले. जया बच्चन यांनी रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आपल्या नवऱ्याप्रमाणे त्यांनीदेखील राजकरणात पाऊल ठेवले. अगदी लहान असल्यापासून त्यांनी अभिनय करण्यास सुरवात केली होती. जय बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पणातच आपल्या अभिनयाची छाप पाडली.
साधी सोज्वळ अशी नायिका त्यांनी अनेक सिनेमात रंगवली. शोले सारख्या सिनेमात फार कमी सीन्स पदरात पडून देखील केवळ आपल्या चेहऱ्यावरील भाव उत्तमरीत्या दाखवून प्रेक्षकांची मन जिंकली होती.
सध्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कृषी कायदे रद्द केल्याने एकूणच दोन्ही सभागृहातले वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.