Site icon InMarathi

बारावीच्या विद्यार्थ्यांनी या डिप्लोमा कोर्सेसची माहिती करून घ्या.. नक्कीच फायदेशीर ठरेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पहिले सगळे म्हणतात की एकदा दहावी पास झालास की पुढे मजाच कारायची आहे, त्यांनंतर येते १२ वी, तेंव्हा सुद्धा असंच सगळे म्हणतात की आता फक्त बारावी कर पुढे काय डिग्री कॉलेज ला एन्जॉयच करायच, आणि हा प्रकार अजिबात थांबायच नाव घेत नाही आणि बहुतेक आपण सगळेच या परिस्थितीमधून गेलेलो आहोत!

एक परीक्षा पास केली की दुसरी आहे समोर उभी ठाकलेली अशी परिस्थिति आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांची होते, आणि त्यातून पार पडता पडताच समोर येऊन उभा राहतो तो प्रश्न म्हणजे १२ वी नंतर काय करायचे हा??

१२ वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच एक टेन्शन कमी होतं पण त्याचवेळेस त्यांच्या डोक्यामध्ये दुसर टेन्शन भुंग्यासारखं थैमान घालत असतं ते म्हणजे कोणता कोर्स घेऊ? करीयर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही, वगैरे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत आणि हेच टेन्शन पालकांना देखील सतावत असतं.

बरं, आपल्या मुलाचं भलं व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते, पण सोबत ही देखील चिंता असते की त्याने योग्य तो कोर्स निवडावा नाहीतर उगा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये.

काही विद्यार्थी यामध्ये खूप गोंधळून जाऊन गडबडीत चुकीचा निर्णय घेतात आणि नंतर त्याचा त्यांना पश्चात्ताप होतो, आणि त्यानंतर जे स्वीकारलं आहे ते निभावण्यातच त्यांच अर्ध आयुष्य निघून जात! आणि मग काही मुलं या सगळ्याला कंटाळून आत्महत्येसारखा पर्याय निवडतात!

आणि त्यातून तो प्रश्न सुटण्याऐवजी खंडीभर नवीन प्रश्न समस्या मनस्ताप निर्माण होतो, आणि त्यात त्या मुलाचे पालक भरडले जातात, जे खूप दुर्दैवी असत!

तर असो, सध्याचे विद्यार्थी आणि पालक यां दोघांना या सगळ्या संकटांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण या लेखात सगळ्या विद्यार्थी आणि पालकांची मदत करायचा प्रयत्न करणार आहोत!

यात आम्ही तुम्हाला काही हटके डिप्लोमा कोर्सबद्दल माहिती सांगणार आहोत जे १२ वी नंतर काय करायच हा गोंधळ दूर करण्यात तुमची मदत करतील!

 

cedp-edu.com

 

कोर्स निवडण्याआधी सर्वात प्रथम विद्यार्थ्याने खालील प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे..

१) मला काय करायला आवडते?

२) मी त्या कोर्सचा अभ्यास करू शकतो का? मला तो अभ्यास करताना मजा येईल का?

३) मी जे काही करेन त्या जोरावर आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होऊ शकेन का?

या सर्व प्रश्नांना तुमच्या अंतर्मनाने आत्मविश्वासाने हो अशी उत्तरे दिली पाहिजेत, उगाच मित्र घेतोय किंवा कोणी सल्ला दिलाय म्हणून कोणताही कोर्स निवडू नये.

उदाहरण म्हणून १२ वी नंतर करता येतील असे डिप्लोमा कोर्स पुढे देत आहोत. ह्यांमधून पुढे तुम्ही स्वत:चं करियर घडवू शकता!

 

१) डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग :

 

instituto design innovation

 

या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला फॅशन जगताबद्दल आवड असयला हवी. या क्षेत्रात आल्यावर डिजाईन आणि स्टाइल या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल.

 

२) डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेशन : 

 

DTES institute

 

जर तुम्हाला कॉम्प्युटर सोबत खेळण्याची (गेम नव्हे, तंत्रज्ञान) आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या क्षेत्रात तुम्हाला computer software आणि languages वर काम करायला मिळेल.

 

३) डिप्लोमा इन योगा :

 

indira gandhi medical university

 

सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योगा आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे असे समजा.

 

४) डिप्लोमा इन बँकिंग :

 

jain

 

ज्यांना सायन्सची आवड नसते त्यापैकी बरेच जण बँकिंग क्षेत्राकडे वळतात, पण प्रत्येक जण या क्षेत्रात यशस्वी होतोच असे नाही, त्याचे कारण म्हणजे विद्यार्थी बँकिंग क्षेत्राला अतिशय हलक्यामध्ये घेतात. तुम्हाला बँकिंग संबंधित कार्यांची आवड असेल तरच या क्षेत्रात या, अन्यथा डेटा एन्ट्री करण्यात अख्ख आयुष्य जाईल.

 

५) डिप्लोमा इन फायनांशीयल आकाऊंटींग 

 

india MART

 

बहुतेक जण हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच असल्याचे समजतात, पण तसे बिलकुल नाही. सध्या या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर बिनधास्त करा हा कोर्स.

 

६) डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी : 

 

jiti institute

 

चाकोरीबाहेरचा करियर ऑप्शन म्हणून याकडे पाहता येईल. प्रत्येक उद्योगामध्ये या क्षेत्राचा समावेश असल्याने बेरोजगार वगैरे राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्योगक्षेत्र प्रत्येक आपत्तीपासून सुरक्षित राखणे म्हणजे Industrial Safety.

 

७) डिप्लोमा इन फिजियोथेरपी :

 

careerslgnite.com

 

हा डिप्लोमा खास करून सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी! जर तूम्हाला रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते शिकवते Physiotherapy

 

८) डिप्लोमा इन ३डी एनिमेशन : 

 

middlesexuniversity

 

या क्षेत्राबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. इमॅजीनेशन आणि मेहनत या दोन गोष्टी या कामात अतिशय महत्त्वाच्या! जर तुम्ही कार्टून वेडे असाल आणि अॅनिमेशनचे फॅन असाल तर बॉस हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, पण यात पैसा देखील भरपूर लागतो बरं!

 

९) डिप्लोमा इन इंटीरियर डिझायनिंग :

 

blackford centre

 

घर सजवायची आवड आहे? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल हाच विचार तुम्ही सतत करत असाल, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकण्याचे चान्सेस जास्त आहेत.

 

१०) डिप्लोमा इन एडव्हरटायझिंग / मार्केटिंग :

 

ADMEC institute

 

हे तर आजचं सर्वात आघाडीचं क्षेत्र! गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र इतकं भरभराटीला आलं आहे की जाहिरात आणि मार्केटिंगच्या पलीकडे गेलं आहे. जर तुमच्याकडे संवाद कला आहे किंवा लोकांना कन्वीन्स करण्याची पॉवर आहे तर या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्यास हरकत नाही.

 

११) डिप्लोमा इन लँग्वेजेस : 

 

indiaeducation.net

 

या क्षेत्रात सहसा कोणी पाउल ठेवत नाही कारण हे क्षेत्र तितकं फॅन्सी नाही ना! पण विश्वास ठेवा, यात करियर करण्यास तुम्हाला जास्त कॉम्पीटीशन नाही. तसेच पैसे हि जबरदस्त मिळतात, आणि परदेशातून संधी चालून आली तर जमलं की सगळं!

हो पण तुम्हाला विविध भाषा शिकण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल.

असे अजून अनेक कोर्स आहेत. पण लक्षात ठेवा तुमच्या आवडीनुसारच कोर्स निवडा. आवड म्हणजे वरवरची नको.

खरंच त्यात स्वत:ला झोकून देण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि जे करताना तुम्हाला आनंद मिळेल असंच क्षेत्र करीयर म्हणून निवडा, यातच तुमचे यश आहे!

तुम्हाला देखील या व्यतिरिक्त अजून काही कोर्सेस बद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदाच होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version