प्रिय व्यक्तीला ‘बाबू’ म्हणताय? थांबा, ही चूक करण्याआधी या शब्दाचा अर्थ समजून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकाल निब्बा निब्बी लोक रिलेशनशिप मध्ये आले, की एकमेकांना लाडाने प्रेमाने बाबू, शोना म्हणणे सुरु होते. “मेले बाबूने थाना थाया” टाईप लाडाने बोलणे, मेसेजेस सुरु होतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एकमेकांशी प्रेमाने बोलणे, प्रेमाने वेगळ्या नावाने हाक मारणे हे प्रकार जवळपास सगळेच कपल्स करतात. हनी, स्वीटहार्ट, बेबी, जानू, पिल्लू असली “प्रेमाची नावे” असतात, पण सगळ्यात कॉमन म्हणजे “बाबू आणि शोना” ही नावे असतात.
चित्रपटांमध्ये देखील ‘बाबू’ म्हणत रोमान्स करणारे कपल्स आपल्याला दाखवण्यात येतात. ह्या “बाबू शोना” ची खिल्ली देखील उडवली जाते. कार्तिक आर्यनच्या ‘प्यार का पंचनामा’या चित्रपटात बाबू ह्या ‘निकनेम’ वर भरपूर विनोद केलेले आपण बघितले आणि पोट धरून हसलोय, पण या शब्दाचा इतिहास वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला “बाबू” म्हणण्याच्या आधी शंभर वेळा विचार कराल. बाबू हा शब्द खरं तर इंग्रजांच्या काळातील आहे.
इंग्रज भारतात आले आणि त्यांनी दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केले. ते आपल्याला अत्यंत कमी लेखून हीन दर्जाची वागणूक देत असत. भारतात आल्यानंतर ते त्यांच्या घरची चाकरी करण्यासाठी, त्यांची लहानमोठी कामे करण्यासाठी भारतीय लोकांनाच नोकर म्हणून ठेवत असत.
लहान मोठी कामे केल्याच्या बदल्यात ते मोबदला म्हणून भारतीय नोकरांना पैसे, जुने फाटलेले कपडे, जुन्या तुटक्या चपला-बूट वगैरे देत असत.
आपल्या लोकांना आधीपासूनच गोऱ्या रंगाविषयी, गोऱ्या कातडीविषयी प्रचंड आकर्षण आहे. ‘भलेही गोरा साहेब चाबकाने फोडून का काढेना, पण मी त्याचेच पाय चाटणार’ या गुलामगिरी मानसिकतेची माणसे आपल्या देशात भरपूर होती. म्हणून इंग्रजांनी दिलेल्या फाटक्या-तुटक्या वस्तू घेऊन ते खुश होत असत.
—
- स्त्री-पुरुष परस्पर संबंधांचे केवळ २ नव्हे तर चक्क १० प्रकार असतात! वाचा
- या सुपरहिट हिंदी चित्रपटांची खरी कहाणी ‘वेगळ्याच वाटेने’ आलेली आहे
—
गोऱ्या साहेबाचे नोकर, सहाय्यक म्हणून काम करणारे भारतीय लोक त्यांच्या गोऱ्या साहेबाचे जुने कपडे घालून त्यांच्या सारखे दिसण्याचा प्रयत्न करत असत. त्यांची हुबेहूब नक्कल करत असत. इंग्रजांसारखे इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत असत.
भारतीयांचा स्वतःचे सगळे सोडून इंग्रजांसारखे होण्याचा प्रयत्न बघून, त्यांचे तुटके-फुटके इंग्लिश आणि विदेशी कपडे घालून मिरवण्याचा अट्टाहास आणि तो सगळा अवतार बघून इंग्रज ह्या त्यांच्या नोकरांना हसत असत. त्यांची प्रचंड खिल्ली उडवत असत. ते त्यांना बबून म्हणत असत.
बबून म्हणजे वानर जमातीतील एक प्राणी होय. म्हणजे थोडक्यात, इंग्रज आपल्या भारतीयांना वानर किंवा माकड म्हणून त्यांची खिल्ली उडवत असत. पण भारतीयांना मात्र असे वाटत असे की त्यांचे गोरे साहेब त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना प्रेमाने बबून म्हणत आहेत. भारतीयांना बबून ह्या शब्दाचा अर्थच माहित नव्हता.
हळू हळू सगळेच इंग्रज अधिकारी त्यांच्या भारतीय नोकरांना बबून म्हणू लागले. काही काळाने बबून ह्या शब्दाचा अपभ्रंश ‘बाबू’ असा झाला. तुम्हाला हे वाचून कदाचित वाईट वाटेल किंवा चीड येईल की ज्यांच्या शरीरातून दुर्गंधी येत असे, त्यांना देखील इंग्रज बबून म्हणत असत.
आता सगळी मेहनतीची कामे केल्यावर भारतीय लोकांना घाम येणारच आणि प्रत्येकालाच कुठे सुगंधी उटणे किंवा साबण परवडणार? म्हणून मेहनतीची कामे केल्यावर त्यांच्या घामाचा दुर्गंध इंग्रजांना येत असावा आणि मग ते त्यांच्या नोकरांना बबून म्हणून त्यांची हेटाळणी करत असत.
नंतर १९ व्या शतकात बाबू शब्दाला वेगळाच अर्थ मिळाला. आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा सरकारी कचेऱ्यांमध्ये सगळी कामे क्लार्क करत असत.
आजच्यासारखेच तेव्हाही सरकारी क्लार्कना खुश केल्याशिवाय सर्वसामान्यांची कामे होत नव्हती. म्हणूनच लोक त्या क्लार्कना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असत आणि त्यांना मान देण्यासाठी त्यांना बाबू म्हणत असत. तेव्हापासून सरकारी कचेऱ्यांमध्ये बाबू हा शब्द प्रचलित झाला. मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अधिकाऱ्यांसाठी साहेब हे संबोधन तर छोट्या हुद्द्यावर असलेल्या लोकांना बाबू म्हटले जाऊ लागले.
आता एकविसाव्या शतकात तर बाबू ह्या शब्दाला वेगळाच अर्थ मिळाला आहे. काही लोक स्वतःच्या वडिलांना प्रेमाने बाबूजी म्हणू लागले तर लहान मुलांना आणि आपल्या प्रेमाच्या माणसाला प्रेमाने बाबू म्हटले जाऊ लागले.
आता तुम्हीच विचार करा, ज्या शब्दाचा इतिहास असा आहे तो शब्द तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी वापरणार का? आपल्याच लाडक्या व्यक्तीला प्रेमाने “माकड” म्हणणार का? मग बाबू पेक्षा प्रेमाने “अरे माकडा” म्हटलेलं काय वाईट?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.