आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नुकतेच गायिका शाल्मली खोलगडे हिने तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखबरोबर लग्न केले. अनेक ‘सेक्युलर’ लोकांना यात काहीही गैर वाटले नाही पण अनेकांना हा लव्ह जिहादचा प्रकार वाटतो.
अर्थात प्रत्येक आंतरधर्मीय (हिंदू-मुस्लिम) विवाह हा लव्ह जिहादचा प्रकार असेलच असे नाही. पण लव्ह जिहाद अस्तित्वातच नाही असे नाही. बिगरमुस्लिम (खास करून हिंदू) मुलींना अगदी पद्धतशीरपणे खोटे बोलून प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांचे धर्मांतर करणे म्हणजेच लव्ह जिहाद होय.
या लव्ह जिहादची पाळेमुळे इस्लामी दहशतवादापर्यंत आहेत. या लव्ह जिहादच्या असंख्य केसेस ह्यापूर्वी झालेल्या आहेत. अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा लव्ह जिहाद अस्तित्वात आहे हा युक्तिवाद ग्राह्य धरून एनआयएला (राष्ट्रीय तपास यंत्रणा) चौकशीचे आदेश दिले आहेत. म्हणजेच सेक्युलर लोकांनी कितीही डोळे झाकून घेतले तरीही लव्ह जिहाद नक्कीच आहे आणि त्यामुळे अनेक मुलींचे आयुष्य कायमस्वरूपी उध्वस्त झाले आहे हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
या जिहादला एक वेगळी बाजू देखील आहे. अनेक हिंदू तरुणांनी देखील मुस्लिम मुलींशी विवाह केला आहे. त्यापैकी काही तरुण हे प्रसिद्ध हिंदी अभिनेते आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आज आपण बघूया कोण आहेत हे हिंदू अभिनेते ज्यांनी मुस्लिम मुलींशी विवाह केला आहे.
१. हृतिक रोशन
हृतिक रोशन व सुझान खान हे एकमेकांचे जुने मित्र आणि त्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. हृतिकच्या करियरच्या सुरुवातीलाच म्हणजे २००० साली त्यांनी एकमेकांशी लग्न केले. ह्या दोघांना दोन मुले आहेत. २०१४ साली ह्या दोघांचा घटस्फोट झाला पण मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघे मिळून पार पाडताना दिसून येतात. सुझान व हृतिक आजही एकमेकांशी “मित्र” म्हणून वावरताना दिसतात.
२. कुणाल खेमू
कुणाल खेमू हा बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आला. त्याने मोठे झाल्यावर देखील चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले. कुणाल खेमूने पतौडी खानदानातील कन्या, अभिनेता सैफ अली खानची बहीण सोहा अली खान हिच्याशी २०१५ साली लग्न केले.
कुणाल खेमू हा एक काश्मिरी पंडित आहे. तर सोहाची आई म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर या मूळच्या हिंदूच! त्यांनी नवाब पतौडींशी लग्न केले.
या घराण्यात आंतरधर्मीय विवाहाची बहुतेक परंपराच आहे.कारण सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग ही सुद्धा हिंदू आणि दुसरी पत्नी करीना कपूर ही सुद्धा मूळची हिंदूच आहे. कुणाल खेमू, सोहा अली खान हे २००९ साली एका चित्रपटात एकत्र काम करत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि २०१५ साली ते विवाह बंधनात अडकले. या जोडप्याला इनाया नामक एक मुलगी आहे.
३. अतुल अग्निहोत्री
अनेक चित्रपटांत झळकलेल्या अतुल अग्निहोत्री ह्या अभिनेत्याने चक्क सलमान खानची बहीण अल्विरा खान हिच्याशी १९९६ साली लग्न केले. अल्विरा आणि अतुल अग्निहोत्रीची ओळख सलमान खानच्या ‘जागृती’ नावाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. दोघांची आधी मैत्री झाली आणि मग दोघांनी प्रेमविवाह केला. या दोघांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.
४. संजय दत्त
ज्याप्रमाणे संजय दत्तचे वडील व प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त ह्यांनी अभिनेत्री नर्गिस ह्या मुस्लिम असून देखील त्यांच्याशी विवाह केला, त्याचप्रमाणे संजय दत्त ह्यानेही दिलनवाज शेख ह्या मुस्लिम अभिनेत्रीशी विवाह करून तिचे नामकरण मान्यता दत्त असे केले. संजय दत्तचे हे तिसरे लग्न आहे. रिचा शर्मा, रेहा पिल्लई ह्या दोघींनंतर त्याने दिलनवाज शेख हिच्याशी तिसरे लग्न केले. या दोघांना दोन अपत्ये आहेत.
–
- नावावरून वादच नको; १० वादग्रस्त चित्रपट ज्यांची नावंच बदलण्यात आली!
- जेव्हा कमल हसन म्हणाले…”नथुराम गोडसे हाच स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू अतिरेकी!”
–
५. सुनील शेट्टी
सुनील शेट्टीची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. एका पेस्ट्री शॉप मध्ये त्याला एक मुलगी भेटते काय, आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडतो काय! सुनील शेट्टी आणि माना कादरी हे एका पेस्ट्री शॉप मध्ये पहिल्यांदा भेटले.
सुनील शेट्टी तिला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडला. त्याकाळी सोशल मीडिया वगैरे प्रकार नव्हते त्यामुळे त्याने आधी मानाच्या बहिणीशी मैत्री केली आणि मग मानाशी मैत्री केली. काही दिवसांनी त्याने तिच्यासमोर प्रेमाची कबुली दिली. ९ वर्षे डेटिंग केल्यानंतर १९९१ साली त्या दोघांनी लग्न केले. या दोघांना आथिया व अहान नामक अपत्ये आहेत.
६. शिरीष कुंदर
शिरीष कुंदर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध एडिटर आहे. शिरीष कुंदर व फराह खान ह्यांची ओळख मैं हूं ना या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान झाली. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खान करत होती आणि एडिटिंगचे काम शिरीष कुंदरकडे होते. फराह खान ही शिरीष कुंदर पेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. असे असले तरीही दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांनी लगेच एकमेकांशी लग्न केले. या जोडप्याला तीन मुले आहेत.
७. आदित्य पांचोली
अभिनेता आदित्य पांचोलीने अभिनेत्री झरीना वहाब हिच्याशी लग्न केले आहे. दोघांची ओळख कलंक का टीका नामक एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. या दोघांनी १९८६ साली लग्न केले. त्यावेळी ह्या दोघांच्या लग्नाची पूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चा झाली होती.
८. मयूर माधवानी
मयूर माधवानी हे अभिनेते नाहीत तर एक व्यावसायिक आहेत. त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज ह्यांच्याशी लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मुमताज व मयूर माधवानी ह्यांचा विवाह १९७४ साली झाला आणि ह्या जोडप्याला दोन मुली आहेत.
९. अमित कपूर
अमित कपूर याने टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ हिच्याशी लग्न केले आहे. आमना शरीफने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. २०१३ साली ह्या जोडप्याने लग्न केले. त्यानंतर आमना शरीफ हिने हिंदू धर्म स्वीकारला. ह्या दोघांना एक मुलगा आहे.
१०. मनोज वाजपेयी
वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. मनोज वाजपेयी व अभिनेत्री नेहा ह्यांची भेट १९९८ साली करीब ह्या चित्रपटादरम्यान झाली. नेहा ही अभिनेत्री मूळची मुस्लिम असून तिचे नाव शबाना रझा आहे. मनोज व नेहा ७ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.