' सुका खोकला ते जुलाब…पेरूचे हे औषधी उपाय तुम्हाला माहीतच नसतील – InMarathi

सुका खोकला ते जुलाब…पेरूचे हे औषधी उपाय तुम्हाला माहीतच नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हल्लीचं आयुष्य इतकं धकाधकीचं आणि स्ट्रेसफुल झालं आहे, की काहीही केलं तरीही स्वतःसाठी वेळ मिळत नाही. पैसे तर आपण कमावतो, पण ते खर्च करण्यासाठी, त्यांचा उपभोग घेण्यासाठी अंगात पुरेशी एनर्जीच नसते.

कोरोनामुळे काही नाही तर माणसाला एक गोष्ट समजली आहे, ती म्हणजे ‘योग्य आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम’ ही त्रिसूत्री जर नीट असेल, तर तुम्हाला कोणताही आजार शिऊ शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या घरातले आजी- आजोबा आपल्याला नेहमी सांगत असतात, ‘पूर्वी आमचा आहार असा होता, सगळ्या गोष्टींचा समावेश होता, तुम्ही आजकालची मुलं नुसतं बाहेरचं खाता..’ क्षणिक या गोष्टीचा राग येत असला, तरीही कोरोनामुळे सगळ्यांना घरगुती पदार्थांचं, चांगल्या सवयींचं महत्त्व पटलेलं आहे.

कोणताही आजार झाला आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, की औषधांआधी ते तुम्हाला सांगतात, की आहारात फळांचा समावेश जरूर करा. फळं तुम्हाला योग्य ते पोषणमूल्य देतातच, पण फ्रेश राहायला मदत करतात.

 

fruits inmarathi

 

आपल्याकडे ठराविक ऋतूत ठराविक फळं खाण्याची परंपरा आहे आणि त्यामागे काहीतरी कारण सुद्धा आहे, परंतु काही फळं अशी असतात जी बारमाही मिळतात आणि त्यांचे औषधी फायदेही असतात.

आज आपण अशाच एका फळाचे औषधी फायदे बघणार आहोत. हे फळ म्हणजे ‘पेरू’ उत्तर भारतात पेरूला ‘अमृत’ म्हटलं जातं. अहो. या फळाचे फायदे इतके आहेत, की त्याची तुलना अमृताशीच होऊ शकते. शरीराला आणि मनाला आपल्या चवीने फ्रेश करणाऱ्या या फळाचे फायदे पाहूया…

१. सुक्या खोकल्यावर उपयोगी –

guava inmarathi

 

पेरू खाल्याने सुका खोकला जातो. कधीकधी खोकून खोकून जीव कासावीस होतो. कफ बाहेर पडत नाही, अशावेळेस पहाटे उठून पेरू, लोखंड न लावता चावून चावून खावा. २-३ दिवस हा उपाय केल्यास खोकला लगेच जातो, पण म्हणून जास्त प्रमाणात खाऊ नये.

२. शक्तिवर्धक पेरू –

भांगेने झोप येत असेल, तर ती उतरवण्यासाठी पेरू खावा. शक्ती येण्यासाठी अनेक घरांमध्ये पेरूचे शिकरण केले जाते. पेरू कुस्करून घ्यावे, त्यात दूध घालून ते गाळावे जेणेकरून बिया राहत नाहीत. चवीनुसार साखर घालून तुम्ही हे खाऊ शकता.

पेरूचे लोणचे, कोशिंबीर आणि मुरंबादेखील केला जातो.

३. पानांचाही उपयोग –

 

guava inmarathi2

 

पेरूच्या फळाप्रमाणे त्याच्या पानांचेही औषधी उपयोग आहेत. जुलाब- उलटी होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा देतात. अपचन झाले असता खडीसाखरेसोबत पानांचा रस घ्यावा याने पोट बरे होते.

स्त्रियांना पाळीच्या काळात पोटदुखी होते, पानांचा रस यावरही उपयोगी ठरतो.

४. लहान मुलांना फायदेशीर –

guava inmarathi1

 

पेरूच्या झाडाची कोवळी पाने लहान मुलांना जुलाब होत असतील, तर एक उत्तम औषध आहेत. योग्य मात्रेत हा काढा प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. पण यासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.

थोडक्यात, हे फळ बहुगुणी आहे. आपल्या आहारात योग्य मात्रेत या फळांचे सेवन केले, तर आपल्याला ते निश्चितच आरोग्यदायी ठरेल

===

वरील माहिती ‘आयुर्वेद’ मासिकातील लेख आणि कै. वैद्यतीर्थ आप्पाशास्त्री साठे यांच्या पुस्तकातील माहितीच्या आधारे लिहिण्यात आली आहे, पण आपल्या तब्येतीनुसार, वैद्यांचा सल्ला घेऊनच या उपायांचा अवलंब करावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?