' हॉटनेसचा तडका निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस चक्क “ती”ला तिकीट देणार? – InMarathi

हॉटनेसचा तडका निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस चक्क “ती”ला तिकीट देणार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अभिनय आणि राजकारण ही खरंतर किती वेगळी क्षेत्रं आहेत एकमेकांपेक्षा! राजकारणात अभिनय चालतो आणि अभिनय क्षेत्रातही राजकारण असते हे अर्थात खरे असले तरी या दोन्ही गोष्टी एकत्र असण्याला खरंतर काही लॉजिक नाही. तरीही काही अभिनेता-अभिनेत्रींची पावलं अभिनय सोडून थेट राजकारणाकडे का वळतात?

त्यांना एकूणच राजकीय अभ्यासाची काही ठोस पार्श्वभूमी नसतानादेखील त्यांना थेट राजकारणाची वाट का धरावीशी वाटते? जनतेचा उद्धार करायला म्हणून राजकारणात उतरलेल्या अशा कलाकार राजकारण्यांच्या आश्वासनांवर सामान्य माणसाने कितपत विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यापूर्वी गोविंदा, उर्मिला मातोंडकर, राज बब्बर यांनी असाच राजकारणात प्रवेश केला होता. मिळायची ती प्रसिद्धी त्यांना त्यासाठी मिळाळीच पण त्यापलीकडे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. नुकताच ‘मिस इंडिया’ असलेल्या एका मॉडेल, अभिनेत्रीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 

urmila politics inmarathi

 

प्रियंका गांधींच्या संमतीने ‘अर्चना गौतम’ या मॉडेल, अभिनेत्रीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बरोबर २०२२ च्या उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षात प्रवेश करण्याची तिने वेळ साधली. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अर्चनाला बोलवून काँग्रेस पक्षाचं सदस्यत्त्व दिलं.

 

archana gautam inmarathi

 

कोण आहे अर्चना गौतम ?

उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये १ सप्टेंबर १९९५ ला तामिळ चित्रपटांमधली प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना गौतम चा जन्म झाला. तिने मेरठमधील ‘गंगानगर’ मधील ‘आयआयएमटी’ महाविद्यालयातून मास कम्यूनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. आपलं मॉडेलिंग आणि ऍक्टिंग चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली. सध्यादेखील ती मुंबईतच राहते आहे.

तिने २०१४ सालचा ‘मिस उत्तर प्रदेश’ चा पुरस्कार जिंकला. त्यानंतर २०१८ साली ‘मिस बिकिनी इंडिया’,’मिस कुओमो इंडिया’, ‘मिस टायलेन्ट’ अशा स्पर्धांमधून आपली चुणूक दाखवून पुरस्कारांवर स्वतःच्या नावाची मोहोर उमटवली.

 

archana gautam 1 inmarathi

 

२०१५ साली आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत ती या सिनेमात दिसली होती. त्यानंतर आलेल्या ‘हसीना पार्कर’ आणि ‘बरोटा कंपनी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. तिने ‘जंक्शन वाराणसी’ मधून छोटी पण ताकदीची भूमिका केली होती.

 

archana gautam 2 inmarathi

अर्चनाने ‘साथ निभाना साथिया’, ‘कुबुल है’, ‘बुढ्ढा’, ‘अकबर बिरबल’ आणि ‘सीआयडी’ या मालिकांमधून काम केले आहे. २०२२ च्या आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत तिला काँग्रेसकडून तिकीट मिळेल असा अंदाज बांधला जातोय.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी काँग्रेस पार्टी उत्तर प्रदेशच्या येत्या इलेक्शनमध्ये ४०% महिलांना तिकीट देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘लडकी हूँ लड सकती हूँ’ अशी त्यांची मोहीम आहे.

 

priyanka gandhi inmarathi

 

१०० दिवसात ७ करोड महिलांपर्यंत पोहोचता यावं हा त्यामागील हेतू आहे. यावरून अर्चनाला गौतम काँग्रेस कडून तिकीट मिळण्याची शक्यता अधिकच दृढ झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आणण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?