Site icon InMarathi

तालिबान राजवटीचे १०० दिवस – परिस्थिती अधिक बिकट होण्यामागची ५ कारणे

taliban featured 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमेरिकेची माघार आणि त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता स्थापन होणे या घटनेला आता तब्बल १०० दिवस उलटून गेले असून आपण मध्यंतरी अफगाणिस्तानविषयी बरंच काही ऐकलं वाचलं आहे.

कशाप्रकारे तिथे तालिबानी लोकं राज्य करत आहेत, तिथल्या नागरिकांचे मूलभूत हक्क पायदळी तुडवतायत हे आपण गेल्या काही दिवसात पाहिलंच असेल, पण सध्यातरी अफगाणिस्तानमधली परिस्थिति ही देवसेंदिवस आणखीनच खराब होत असल्याची लक्षणं दिसू लागली आहेत.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तिथे वाढणाऱ्या अतिरेकी कारवाया शेजारील राष्ट्रांनासुद्धा महागात पडणार आहेत त्यामुळे या कारवाया वेळीच रोखता याव्यात यासाठी इतर देशांनी एकत्रित येऊन वेळीच पावलं उचलायला हवीत असा तर्क काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.

काही तज्ञांच्या मते तालिबानी सत्तेला मदत पुरवण्यासाठी सेवानिवृत्त पाकिस्तानी अधिकाऱ्यांना तिथे पाचारण करण्यात येत आहे, शिवाय पाकिस्तान हे राष्ट्र उघडपणे तालिबानला पाठिंबा देत असल्याचंसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाहीर झालं आहे!

तसेच तालिबानकडून वेगवेगळे टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्पचं आयोजन केलं जात असून त्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानी लोकांचाच जास्त समावेश केला जात आहे असा तर्कसुद्धा तज्ञांनी वर्तवला आहे.

 

 

पाकिस्तानकडून फक्त मनुष्यबळच नव्हे तर त्यांना आर्थिक मदत करण्यात, शस्त्रसाठा पुरवण्यात ISI चादेखील तेवढाच सहभाग आहे असंही म्हंटलं जातंय!

या लेखातून आपण १०० दिवसांनंतर तालिबान व्याप्त अफगाणिस्तानची नेमकी परिस्थिती कशी आहे, तिथे काही सुधारणा आहे का परिस्थिती आणखीनच बिकट आहे याचा आढावा घेऊयात!

१. तालिबानी शासन :

 

त्यांनी अफगाणिस्तान काबिज तर केला, पण गुन्हेगारी आणि आतंकवादी विचारधारेशी जोडलेल्या तालिबानी सत्तेकडून देशाच्या, नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीही पावलं उचलली गेल्याचं दिसत नाही.

याउलट तालिबानी राजवटीत पाकिस्तानला हाताशी धरून दहशतवादाला खतपाणी घालण्याची कामंच तालिबानी सत्ता करतीये हे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट झालं आहे!

२. मूलभूत हक्कांची पायमल्ली :

 

 

अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर तालिबानी लोकांनी तिथल्या नागरिकांचे मूलभूत हक्क कसे पायदळी तुडवले ते आपण पाहिलं, भर रस्त्यात लोकांना ठार केल्याचे व्हिडिओज आपण पाहिले.

शिवाय यानंतर तालिबानी सत्तेत महिलांवर आणखीन कठोर निर्बंध लादल्याचं आपण पाहिलंच असेल, शिवाय महिलांचे शिक्षण, नोकरी आदी गोष्टींवरसुद्धा निर्बंध आणल्याने तिथल्या लोकांच्या मूलभूत हक्काची समस्या निर्माण झाली आहे!

३. आर्थिक चणचण :

 

 

अफगाणिस्तानला ८० ते ९० % आर्थिक सहाय्य हे अमेरिकेकडून होत असे, पण अमेरिकेने तिथून काढता पाय घेतल्याने तिथल्या सत्तेत चांगलीच आर्थिक चणचण जाणवू लागली आहे आणि अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे.

आर्थिक सहाय्य कुठूनच होत नसल्याने औषधं आणि इतर संसाधनांचा तुटवडा जाणवू लागला आहे!

४. आरोग्यसेवा :

 

 

आज सारं जग कोरोना महामारीशी दोन हात करण्यात व्यस्त आहे. आरोग्यसेवा, औषधं, लसीकरण सगळ्याच बाबतीत सारं जग एकत्र येऊन एकमेकांची मदत करत आहेत, पण अर्थव्यवस्था ढासळत असल्याने अफगाणिस्तानच्या आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे!

५. परराष्ट्रांशी संबंध :

 

 

पाकिस्तानचा खुला पाठिंबा आणि दहशतवादाचा प्रचार यामुळे अफगाणिस्तानचे इतर राष्ट्रांशीसुद्धा संबंध बिघडले आहेत, आणि यामुळेच अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य आणि पाठिंबा मिळत नसल्याने सगळीकडूनच त्यांची कोंडी झाली आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version