' ४०० वर्षानंतर स्वतंत्र झाला आज एक देश; ब्रिटिश राणीला दिली सोडचिठ्ठी… – InMarathi

४०० वर्षानंतर स्वतंत्र झाला आज एक देश; ब्रिटिश राणीला दिली सोडचिठ्ठी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपूर्वी कंगना राणावत या अभिनेत्रीने एक वादग्रस्त विधान केलं ज्यावरून तिला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले, देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावरून तिने विधान केले होते. खरं तर आपल्या देशात जात, धर्म, स्वातंत्र्य हे खूप संवेदनशील आहेत. देशाने लोकशाही जरी स्वीकारली असली तरी आपल्याकडे ती कितपत रुजली आहे, हा एक वेगळाच चर्चेचा मुद्दा आहे.

काही महिन्यांपूर्वी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला, मागच्या वर्षी कोरोनामुळे उत्साहाने साजरा करता आला नाही, यावर्षी शेतकरी आंदोलन चांगलेच चिघळत होते त्यामुळे कुठे गालबोट लागायला नको म्हणून खबरदारी घेऊन साजरा केला होता.

 

Independence day,marathi pizza13
media2.intoday.in

 

आज आपण स्वातंत्र्याच्या गप्पा अगदी घरात आरामात बसून मारतो मात्र तेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याच लोकांनी घेतलेले कष्ट आपल्या लक्षात येत नाही, आजही काही गरीब देश गुलामगिरीत जगत आहे, नुकतंच एका देशाला तब्बल ४०० वर्षांनंतर स्वातंत्र्य मिळाले आहे कोणता आहे तो देश चला तर मग जाणून घेऊयात….

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कॅरेबियन बेटं म्हंटली की आपल्या डोळ्यासमोर फक्त वेस्ट इंडिज आठवते मात्र याच बेटावर आणखीन काही देश आहेत जे आपल्या कधी नजरेत आले नाहीत, त्यातीलच एक देश म्हणजे बार्बाडोस, निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या हा देश जवळजवळ ४०० वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता, सोमवारी हा देश ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतंत्र होऊन पूर्णपणे आता बार्बाडोस वासियांचा झाला आहे.

 

dominica-marathipizza
caribbeannewsdigital.com

 

थोडक्यात इतिहास :

आपण इतिहासात वाचलेच असेल की यूरोपातुन अनेक खलाशी जगाच्या शोधात निघाले होते. वास्को द गामा याने सर्वप्रथम भारतात पाऊल ठेवले. अगदी प्राचीन काळापासून भारताबद्दल अनेकांना कुतूहल होतेच, काही त्यातले यशस्वी झाले तर काहीजणांनी इतर देशांचा शोध लावला.

खलाशांपैकी असलेला एक म्हणजे कोलंबस, भारताच्या शोधात निघालेला हा खलाशी जाऊन थेट या बेटांवर पोहचला, तेव्हापासून अनेक दर्यावर्दी इथे येऊ लागले. ब्रिटिशांना जेव्हा या बेटांची माहिती समजली आणि त्यांनी १६२५ मध्ये सर्वप्रथम आपले पाऊल या बेटावर ठेवले.

 

columbus inmarathi

तिकडच्या गरीब आणि अशिक्षित जनतेचा फायदा घेऊन त्यांना गुलाम बनवण्यात आले. १९६६ सालापासून ते २०२१ सालापर्यंत वेटामिनिस्टर प्रणालीवर आधारित एक प्रकराची घटनात्मक राजेशाही आणि संसदीय लोकशाही राणी एलिझाबेथ हिच्या अधिपत्याखाली होती. १९६६ सालापासून तीन वेळा राष्ट्र प्रजासत्ताक बनवण्याचे प्रयत्न केले गेले, शेवटी २०२१ शाळांचा मुहूर्त लागला.

 

queen-elizabeth-inmarathi02
cbc.ca

 

आता हे राष्ट्र म्हणजे ३० नोव्हेंबर पासून एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखले जाईल. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यात ब्रिटनचे राजपुत्र आणि इतर राजकीय मंडळी सहभागी झाली होती. बार्बाडोसच्या गव्हर्नर जनरलपदी सॅन्ड्रा मॅसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील एका मुख्य चौकात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता, एक मोठ्या स्क्रीनच्या साहाय्याने तिकडची जनता हा सोहळा पाहू शकली. लोकांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण होते. रात्री हा सोहळा संपन्न झाल्याने मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी देखील करण्यात आली. बार्बाडोस आता ५४ राष्ट्रकुल राष्ट्रांपैकी एक राहील.

 

barba inmarathi

 

आज आपण म्हणतो तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आले आहे तरीसुद्धा आज जगभरात असे काही देश आहेत जे आजच्या धावत्या जगाच्या खूप मागे आहेत, आफ्रिकेमधील काही देशांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांना सोडवत न आल्याने उपासमार, गरिबी वाढती रोगराई यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे. बार्बाडोस आता एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखले जाणार आहे लवकरच ते प्रगती पदाच्या शिखरावर पोहचू दे अशी अपेक्षा आपण करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?