Site icon InMarathi

कॉफी, बटाटा; या ७ पदार्थांना नको-नको म्हणण्यापूर्वी त्यांचे फायदेही जाणून घ्या

coffee potato inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यातले बहुतेक जण हल्ली डाएटच्या बाबतीत प्रचंड जागरूक असतात. काय खाऊ नये, पिऊ नये याची भलीमोठी यादी कुणीही पुढ्यात न दाखवता आपल्या मनात पक्की झालेली असते. मग तो बटाटा असो की कॉफी. केळी असोत की चीज. “कोण बटाटा खाऊन वजन वाढवेल बाबा!”, “केळी? नको नको! साखर वाढेल शरीरातली!”, असं करत आपण आपल्या रोजच्या आहारातल्या एकेका पदार्थावर काट मारत जातो.

आजुबाजूचे अनेक जण रोज नवेनवे सल्ले देतच असतात. त्यात भरीस भर म्हणून अनेक कार्यक्रमांमधूनही अशा डाएट टिप्स आपल्याला मिळतच असतात. अशा वेळी आपल्या आरोग्यासाठी अमुक अमुक पदार्थ फारसा बरा नाही असं समजल्यावर त्याचाही शरीरासाठी काही चांगला उपयोग असू शकतो हे आपल्या ध्यानीमनीही येत नाही.

आपल्या शरीरासाठी ‘वाईट’ ठरल्या गेलेल्या अशाच काही पदार्थांमधले काही पदार्थ खरंतर आपल्या शरीरासाठी चांगले असल्याचे समोर आलेले आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१.अंडी :

 

 

जर तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढेल, हृदयविकार वाढेल या भीतीने अंड्याचा पिवळा बलक काढून नुकताच अंड्याचा पांढरा भाग खात असाल तर तुम्हाला तसे करण्याची आवश्यक्ता नाही. अंड्यात जरी कोलेस्ट्रॉल जास्त असलं तरी त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही हे आता डॉक्टरांनी सांगितले आहे.

अंड्यातला पिवळा बलक खायचा टाळलात तर तुम्ही त्या बलकात असलेल्या ए, बी व्हिटॅमिन्स, सेलेनियम, बुद्धीसाठी चांगले असणारे कोलीन, आरोग्यासाठी चांगले असलेले फॅट्स, इ, डी, के ही प्रथिनं, बेटा कॅरोटीन,ल्युटेन, लिकोपिन या अँटीऑक्सिडंट्सना आणि कॅल्शिअमला मुकाल.

 

२.काजू :

 

बऱ्याच कॅलरीज आणि कमी पोषकमूल्ये असल्याने बाकी सुकामेव्याच्या तुलनेत काजू तसे तब्येतीला फारसे चांगले म्हणून समजले जात नाहीत. पण तसं नाहीये.

काजुतले ५५ % फॅट्स हे हृदयाकरता चांगले असतात जे फॅट्स आपल्याला ऑलिव्ह ऑइल आणि अवेकडोज मधूनही मिळतात. शिवाय आपल्या रक्तातली साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे मॅग्नेशियमही आपल्याला काजूमधून मिळते.

३.केळी :

 

 

साखर वाढेल या भीतीने केळे खाणे टाळत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. मध्यम आकाराच्या सफरचंद आणि नासपत्तीतून जितकी नैसर्गिक साखर आणि कॅलरीज आपल्याला मिळतात तितक्याच मध्यम आकाराच्या केळ्यातून मिळतात.

शिवाय केळ्यातलया ग्लीकेमिक इंडेक्सच्या कमी पातळीमुळे शरीरातली साखर पटकन न वाढता हळूहळू वाढते. याखेरीज केळ्यातून आपल्याला बऱ्यापैकी फायबर, फोलेट, व्हिटॅमिन बी ६ आणि मॅग्नेशिअमही मिळते.

४.बटाटा :

 

 

शरीरासाठी चांगल्या न समजल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बटाट्याचा क्रमांक बहुदा वरचाच लागेल. पण बटाटयाच्या अवघ्या १०० कॅलरीज मधून आपल्याला प्रथिनं, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आणखीही बरीच पोषकमूल्ये मिळतात.

लालसर तपकिरी रंगाच्या बटाट्यात ग्लीकेमिक इंडेक्सचं प्रमाण जास्त असतं पण हेच बटाटे जर शिजवून थंड केले तर त्याची पातळी झटकन खाली येते. शिजवून थंड केलेला बटाटा खाण्याचा आणखी एक फायदा असा की त्यामुळे आपल्या शरीरातल्या गट बॅक्टेरियाला पोषण मिळण्यास मदत होते.

५.कॉफी :

 

 

कॉफीमुळे कॅन्सर, हृदयविकार होतो, माणसाच्या वाढीवर परिणाम होतो असं म्हणून कॉफीला दूषणं दिली जातात पण योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन केलं तर कॉफी शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की कॉफी पिणाऱ्यांना हृदयविकार, टाईप २ डायबेटीस, पार्किन्सन्स, सिरॉसीस आणि काही प्रकारचे कॅन्सर्स होण्याची शक्यता कमी असते.

६००० वृद्ध बायकांच्या अभ्यासातून असं समोर आलंय की कॉफीतल्या कॅफेनमुळे वय वाढल्यामुळे जो विसराळूपणाचा त्रास होतो तो होण्याची शक्यता कमी होते.

६.चीज :

 

 

डाएट म्हटलं की चीजला जवळपास बाहेरचाच दरवाजा दाखवला जातो. पण एका अभ्यासातून असं समोर आलंय की चीजमध्ये कॅल्शिअमस, फॅट्स, प्रथिनं, व्हिटॅमिन ए, बी १२ आणि मिनरल्स असतात.

‘ब्री’ आणि ‘चेडर’ सारख्या हाय फॅट चीज मध्ये असणाऱ्या ‘कॉन्जुगेटेड लिनोलिक ऍसिड’मुळे जळजळ होत नाही, वजन वाढत नाही आणि हृदयविकारही होत नाही. आणखी एका अभ्यासातून असं निदर्शनास आलंय की चीजचे छोटे छोटे तुकडे खाल्ल्याने कॅव्हिटीज होण्यापासून बचाव होतो.

७.डार्क चॉकलेट :

 

 

डार्क चॉकलेट म्हणजे डाएटशी छत्तीसचा आकडा असं जर समीकरण तुमच्या डोक्यात असेल तर थांबा. चांगल्या प्रतीच्या डार्क चॉकलेटमधून तुम्हाला आयर्न, मॅग्नेशिअम आणि इतर मिनरल्स मिळू शकतात. ते हृदयासाठी देखील चांगले असते.

त्यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे ब्लड प्रेशर कमी करायला मदत होते आणि डायबेटीसही होत नाही. ब्लूबेरीसारख्या काही फळांपेक्षा डार्क चॉकलेटमध्ये जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

थोडक्यात योग्य प्रमाणात पदार्थ खाल्ले तर ज्या अनेक पदार्थांपासून आपण आरोग्य बिघडण्याचा भीतीने पळ काढतो ते पदार्थ खरंतर आरोग्यासाठीच फायदेशीर ठरू शकतात. आपण किती प्रमाणात काय खातोय याचं गणित मात्र चुकता कामा नये.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना : सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version