कतरीनाला मिळाला नकार ,आणि मग ती सलमान जवळ जाऊन ढसाढसा रडली….
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिनेमे पाहणे हे सगळ्यांच्याच खूप आवडीचे काम आहे, पण कोरोना महामारीमुळे फिरायला जाणे, आपल्या नातेवाईकांना भेटणे, सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहणे, नाटक पाहणे हे सगळेच बंद झाले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आता लॉकडाऊन संपून बरेच दिवस झाले आहेत आणि हळू हळू सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू व्हायला सुरुवात देखील झाली आहे. मंदिरे, नाट्यगृहे आणि थिएटर्स उघडली गेली आहेत आणि बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.
सगळेच पुन्हा नव्या उत्साहाने सिनेमागृहामध्ये हजेरी लावून चित्रपट पाहण्याचा आनंद लुटत आहेत. सध्या जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ तर सलमान खानचा ‘अंतिम – द फायनल ट्रूथ’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
आपले सगळ्यांचेच बॉलिवूडच्या कलाकारांवर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि तेथील सनसनाटी बातम्या यावर सगळ्यांचे बारीक लक्ष असते. केवळ सिनेमांच्या बातम्यांसाठीच नव्हे तर कलाकारांच्या व्यक्तिगत गोष्टींसाठी सुद्धा.
रोज बॉलिवूडमध्ये धमाकेदार काही ना काही होतच असते आणि त्याची चर्चा रिपोर्टरद्वारे, टेलिव्हिजन द्वारे, मीडिया द्वारे होत राहते. कधी कलाकारांच्या आपापसातील वादामुळे, कधी प्रेम प्रकरणामुळे, कधी बर्थ डे पार्टीमुळे तर कधी त्यांनी केलेल्या चांगल्या वाई कामामुळे. कोणतेही कारण त्यासाठी पुरेसे असते.
बऱ्याच कलाकारांमध्ये आपसात काही खटके उडतच असतात. सलमान खान हे वादाच्या बाबतीत अग्रेसर नाव. जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यात मैत्रीचे संबंध होते, पण एका टूर दरम्यान जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यात वाद झाले. तेव्हापासून त्या दोघांमध्ये मैत्री राहिली नाही. तसेच कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यातही काही कारणांमुळे वाद झाले, त्यामुळे ते मित्र राहिले नाहीत.
कतरिना कैफ ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे खूप चर्चेत आहे. बातमीदारांच्या म्हणण्यानुसार, येत्या ७-१२ डिसेंबर दरम्यान विकी कौशलसोबत ती लग्न बंधनात अडकणार आहे, पण याच कतरिना कैफला कधी काळी तिचे करिअर संपुष्टात येईल की काय अशी भीती वाटली होती.
—
- या १३ बॉलिवूड स्टार्सनी यश मिळवण्यासाठी ‘हेदेखील’ सहन केलं आहे, वाचा!
- ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बद्दल च्या ९ मजेशीर गोष्टी!
—
त्याच झालं असं, की जॉन अब्राहमने कतरिना कैफला ‘साया’ या चित्रपट मधून बाजूला केले होते. इंडिया टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत सलमानने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यावेळी सलमान खान आणि कैटरीना कैफ यांच्यात मैत्री होती.
सलमानच्या म्हणण्यानुसार, जॉन अब्राहमने कतरिना कैफसोबत काम करण्यास नकार दिला होता, कारण कतरिना कैफला हिंदी बोलता येत नव्हते. त्यामुळे तिच्या ऐवजी तारा शर्माला ही संधी देण्यात आली होती. कतरिना सलमानजवळ ‘माझे करिअर संपुष्टात आले’ असे म्हणून तीन दिवस ढसाढसा रडली होती.
तेव्हा सलमान खानने तिची समजूत काढली होती. ती उगाच रडत आहे असे सलमानला वाटत होते, कारण ती उद्याच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक असणार आहे हे त्याला माहित होते. इतकेच नाही तर ‘काही वर्षानंतर हे सगळं आठवून तू हसशील’ असेही त्याचे म्हणणे होते.
आणि असेच झाले. काही वर्षानंतर कतरिनाने यशाचे उच्च शिखर गाठले आणि टॉप अभिनेत्रीच्या यादीत तिचे नाव समाविष्ट झाले. पुढे जॉनसोबत काम करण्यास कतरिना तयार नव्हती, पण सलमानने तिची समजून काढल्यानंतर तिने जॉनसोबत ‘न्यूयॉर्क’ चित्रपटात काम केले आणि तो हिट ठरला.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.