' फेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे – ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे! – InMarathi

फेसबुक आपल्यात हे १० बदल घडवून आणत आहे – ज्याने आपलं प्रचंड नुकसान होणार आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अमेरिकेच्या whistleblower एडवर्ड स्नोडेनने जेव्हा अमेरिका सरकार आणि इतर प्रसिद्ध वेबसाईटच्या विषयी काही गोष्टी उघड केल्यानंतर, लोकांना गुगल आणि फेसबुकसारख्या वेबसाईटवरील प्राइवसीबद्दल पण शंका निर्माण झाली होती. एका अहवालानुसार,फेसबुक रोज ५१ लाख १० हजार चित्रपटांएवढी माहिती गोळा करताते आणि ही माहिती हॅकिंगच्या दृष्टीने संवेदनशील असते.

फेसबुक आज कितीतरी लोकांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनला आहे. तर मग खरंच हे आपल्यासाठी चांगले आहे की वाईट? २४ तास ऑनलाईन राहणे तुमच्या मानसिक,सामाजिक आणि शारीरिक जीवनावर कोणत्या प्रकारे परिणाम करत आहे, हे समजण्याचा प्रयत्न आज आपण करून घेऊ.

facebook-marathipizza01
indiatimes.com

१.फेसबुकला प्रत्येकवेळी तुम्ही कुठे आहात हे माहित असते.

जर तुमच्याकडे फेसबुक मॅसेंजर अॅप आहे, तर नक्कीच आतापर्यंत तुम्ही तुमचे लोकेशन शेयरिंग बंद केले नसेल. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्हाला तुमची माहिती फेसबुकला द्यायची आहे किंवा नाही, पण समजा कोणी तुमचा पाठलाग करत असेल तर? एका प्रोग्रामरने या विषयी एक Marauder नकाशा तयार केला होता. या नकाश्याच्या आधारे तो त्या लोकांची लोकेशन आरामात सांगू शकत होता ज्यांच्या मोबाईल मध्ये फेसबुक मॅसेंजर आहे. या घटनेनंतर फेसबुकने मॅसेंजर अॅप मधून लोकेशन डिसेबल केले होते पण ह्याचा असा अर्थ नाही की,फेसबुक तुमची माहिती मिळवत नाही आहे.

 

२.फेसबुक जास्त वापरल्याने तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता.

तुम्ही जेवढे जास्त फेसबुक वापराल, तेवढेच तुम्ही मानसिकदृष्ट्या जास्त खचू शकता, सोशल मिडियावर खूप जास्त वेळ घालवणाऱ्या लोकांमध्ये अश्या समस्या दिसून येतात. फेसबुक वापरामुळे लोकांना आता एक दुसऱ्याशी बोलायला आणि भेटून वेळ घालवायला आवडत नाही. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही फेसबुकवरील लोकांशी स्वतःची तुलना करू लागता. येल विद्यापीठाने तयार केलेल्या एका अहवालानुसार फेसबुक तुमच्यावर मानसिक परिणाम करू शकते.

facebook-marathipizza02
15minutenews.com

 

३.फेसबुक तुमची बौद्धिक क्षमता कमी करतो.

फेसबुक तुमची बौद्धिक क्षमता कमी करत चालला आहे, कारण फेसबुक तुम्हाला तेच दाखवते जे तुम्हाला बघायचे आहे, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या किंवा वेगळ्या विचारधारेची माहिती समजत नाही. फेसबुक तुम्हाला या भ्रमात ठेवतो की ज्या पक्षाला तुम्ही साथ देत आहात तो खूप प्रसिद्ध आणि चांगला आहे, भले ते तसे नसेलही. सोशल मिडियावर राजकीय पक्षांविषयी वाढणाऱ्या नकारात्मक भावनांमुळे लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या लोकांचा राग करतात असे दिसून आले आहे.

 

४.फेसबुक तुमचा चेहरा ओळखू शकतो.

जेव्हा पण तुमचा मित्र तुम्हाला फेसबुकवर कोणत्याही फोटोमध्ये  टॅग करतो तेव्हा ती माहिती फेसबुकमध्ये साठवली जाते. या सोशल नेटवर्ककडे असे Artificial Intelligence आहे,जो तुमच्या चेहऱ्याशी पॅटर्न जुळवून घेण्यात तरबेज असते, फेसबुकचे Algorithm एवढे उत्तम असते की ते ९८ टक्के बरोबर असल्याचे म्हटले जाते. प्रत्येक नवीन टाकलेल्या फोटोने फेसबुकचा हा पॅटर्न अजूनच चांगला होत जातो.

facebook-marathipizza03
biometrictechnologies.co.za

 

५.योग्य आहार न घेणाऱ्या लोकांवर फेसबुकचा वाईट परिणाम होतो.

फ्लोरिडा स्टेट विद्यापीठामध्ये ८४ विद्यार्थिनींवर एक सर्वे केला गेला ,या सर्वेमध्ये फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्या मुली वेळेवर जेवत नसल्यामुळे त्यांचावर शारीरिक आणि मानसिक नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. मानसिक समस्या असणाऱ्या लोकांनी फेसबुकचा वापर वापर करणे खूप धोकादायक ठरू शकते.

 

६.फेसबुक वापरणारे एकटे लोक अजून एकटे होतात.

न्यूयॉर्क विद्यापीठातील डॉ.सुदिप्ता वर्मा यांचानुसार, फेसबुक तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी ते काय करत आहेत याविषयी माहिती देते परंतु तुम्ही तुमच्या जीवनात काय करत नाही आहात आणि काय करू शकत नाही आहात हेही सांगते. ८२ लोकांमध्ये केलेल्या प्रयोगाने हे सिद्ध झाले आहे कि,फक्त २ आठवड्यांत चांगले हसत-खेळत असणारी लोक डीप्रेशन आणि भावनाशुन्य झाले.

 

facebook-marathipizza04
npr.org

 

७.फेसबुक तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतो.

फेसबुक आपल्या news feeds नेहमीच तुम्हाला दाखवत असतो,या न्यूज फिड्सला तुमचा असणारा प्रतिसाद आणि तुम्ही फेसबुकच्या अॅड ना दिलेला प्रतिसाद यावरून तुम्ही कश्या प्रकारचे मनुष्य आहात हे फेसबुक लगेच ओळखतो आणि तश्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो.

 

८.फेसबुक तुमची माहिती विकू शकतो.

मास्टरकार्ड कंपनीने फेसबुक कडून लोकांची माहिती विकत घेतली आहे, त्यामधून त्यांनी लोकांची पसंत-नापसंत समजून त्यांच्या खरेदी करण्याची आवड समजून घेतली आहे.तुम्हाला वाटेल कि यासाठी फेसबुकने खूप पैसे घेतले असतील पण तसे नाही आहे,फेसबुकने फक्त ५ डॉलर मध्ये १० लाख लोकांची माहिती विकली आहे.

facebook-marathipizza05
bernardhealth.com

 

९. फेसबुक वर होते पॉलिटिकल सेंसरशिप.

पाहायला गेलं तर फेसबुक एक मोफत सोशल साईट आहे आणि सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने बनवली आहे, पण त्यात ही एक पॉलिटिकल सेंसरशिप आहे. चीनमध्ये स्पेशल सॉफ्टवेअर वापरून काही युजर्सना सेंसर केले होते. रशिया मध्ये एका प्रोटेस्ट पेजवर बंदी घालण्यात आली होती.आपल्या देशात सुद्धा प्रसंगानुसार काही युजर्सवर बंदी घातल्याच्या आणि काही पोस्ट काढून टाकल्या जाण्याच्या वार्ता कानी आल्या आहेत.

 

१०. तुम्ही कधी झोपता हे देखील फेसबुकला माहित असते.

फेसबुक मेसेंजर अॅपने समजू शकते की,तुम्ही कधी ऑनलाईन एक्टीव असता. सोरेन जांजोन्सन नावाच्या डेव्हलपरने जेव्हा यावर अभ्यास केला तेव्हा त्याला समजले की, यातून सगळ्या मित्रांच्या झोपण्याच्या वेळा समजू शकतात, फेसबुक ID टाइम स्टॅम्प ला जोडून त्याने फेसबुक वापरणाऱ्या लोकांच्या झोपण्याचे पॅटर्न तयार करून दाखवले होते. फेसबुक तुम्ही झोपण्याचा आधी कोणत्या उपकरणातून ऑनलाईन होता हे जाणू शकतो आणि किती वेळ तुम्ही जागे आहेत यावर लक्ष ठेवून असतो.

facebook-marathipizza06
metro.co.uk

हे वाचून तुमची देखील झोप उडालीच असेल, तर यापुढे फेसबुकचा वापर करा पण जपून!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?