अनेकजणांना त्रास देणारी ‘पायदुखी’ आणि त्यावरचे ६ घरगुती उपाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्ली सर्दी-खोकला होणे हे जितके ऐकायला नेहमीचे वाटते तितकेच पायांना सूज येणे ही समस्याही हल्ली सर्रास ऐकू येते. साधं बराच वेळ एखाद्या दिवशी चालणं झालं तरी पायांना सूज येते. घरात करायच्या रोजच्या कामांची सवय नसेल आणि अचानक कामे अंगावर पडली तरीही आपल्याही नकळत पायांना सूज आलीये हे जाणवतं. लग्नकार्यात किंवा इतर कुठल्याही कौटुंबिक सोहळ्यांमध्ये होणारी धावपळही पायावर सूज आणते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
हौशी ट्रेकर्स उत्साहाने दिवसभर ट्रेकिंग करून आले, की ज्या पायांनी दिवसभर तंगडतोड केली त्या पायांवर हमखास सूज आलेली असते. हल्ली तरुणांमध्ये स्थूलतेचं प्रमाण वाढलंय त्यामुळे आपल्याच शरीराचा भार पायांवर पडतो, आपलंच शरीर आपल्याला पेलवत नाही आणि पायांवर सूज येते.
पायावर सूज का येते?
पायांवर सूज येणे हा एक आजार नसून आजाराचे लक्षण समजले जाते. म्हणजे काय तर सूज कशामुळे येते आहे याचा विचार होणे महत्त्वाचे.
सर्वप्रथम हे पहावे लागते, की पायावर येणारी सूज ही केवळ काही नैसर्गिक कारणांमुळे आहे अथवा आजारामुळे आहे.
ज्या व्यक्तींना सतत उभे राहावे लागते किंवा पाय खाली लटकवून खुर्चीवर बसावे लागते , सतत दीर्घकाळ प्रवास करावा लागतो अशा व्यक्तींमध्ये ही समस्या आढळते. जसे की, कंडक्टर, शिक्षक (अर्थात शिक्षण पद्धती ऑनलाईन होण्याच्या पूर्वीचे).
गर्भवती महिलांमध्ये साधारणपणे सहाव्या महिन्याच्या पुढे अशी नैसर्गिक कारणांनी येणारी सूज आढळते. मुख्यतः सतत पाय लटकवून राहिल्यामुळे व्हीनस रिटर्न, म्हणजे पायातील व्हेन्सकडून हृदयाकडे रक्त परत करण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे ही सूज येते. तसेच गर्भाशयाचा दाब पायाच्या व्हेन्स वर पडल्यामुळे आणि lymphatic सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे ही सूज आढळते.
नैसर्गिक कारणांमुळे येणारी सूज ही मुख्यतः संध्याकाळच्या वेळेला जास्त प्रमाणात दिसते. अतिशय कमी प्रमाणात असते. जनरली थोड्या वेळासाठी येते आणि आरामानंतर दिसेनाशी होते.
पायावर अनैसर्गिक सूज येण्यासाठी वेगवेगळी कारणं असू शकतात. मुख्यतः तीन प्रकारच्या शारीरिक बदलांमुळे सूज येऊ शकते
१. शरीरामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण खूप कमी झाल्यास
२. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जलनिस्सारण होण्याचे म्हणजे पाणी बाहेर येण्याचे प्रमाण वाढल्यास
३. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अती झाल्यास (हायड्रो स्टॅटिक प्रेशर वाढल्यास).
वर उल्लेख केलेले शारीरिक बदल निरनिराळ्या आजारांमध्ये आढळतात, त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या पायांवर सतत सूज येत असल्यास आपल्याला या आजारांचा विचार करावा लागतो:
१. रक्तक्षय अनिमिया, हायपो प्रोटीनेमिया, लिव्हर संबंधित आजार, आहारामध्ये प्रोटिन्सची कमतरता असणे इ.
२. रक्तवाहिन्यांना संदर्भात असणारे आजार, वेगवेगळ्या गोष्टींना असणारे अलर्जी इ.
३. हृदयाचे आजार, किडनी संदर्भातील आजार इ.
पण घाबरून जाऊ नका, पायावरची सूज ही काही साध्या कारणांमुळेही येऊ शकते, वरील पैकी काही कारणे नसतील, तर तुम्ही घरगुती उपाय करून ही सूज कमी करू शकता.
—
- होय! सर्दी खोकल्याच्या औषधांत गुंगी आणणारी द्रव्यं असतात. कारणं…
- सर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं?! जाणून घ्या
—
बेकिंग सोडा :
२ चमचे तांदूळ पाण्यात घालून उकडायचे. त्या पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा घालून त्याचा लेप पायांवर लावायचा. १५ मिनिटं हा लेप पायांवर ठेवायचा.
बेकिंग सोड्यात अनेक दाहक विरोधी गुणधर्म असतात. हा लेप लावल्याने पायात जे अतिरिक्त पाणी झालेले आहे ते शोषले जाते आणि पायातला रक्तप्रवाहही सुरळीत व्हायला मदत होते. पायांवरची सूज उतरायला हा चांगला उपाय ठरू शकतो.
लिंबू आणि दालचिनी :
लिंबू, दालचिनी आणि ऑलिव्ह ऑइल या तिन्हींची मदत दाह कमी करण्यासाठी होते. एक चमचा लिंबाच्या रसात, एक चमचा दालचिनी पूड, एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा दूध असं मिश्रण तयार करून ते मिश्रण पायावर लावले तर पायांवरची सूज कमी होऊ शकते.
काही तास आपण पायांवर हे लावून ठेवू शकतो किंवा चक्क रात्री झोपताना पायांवर ते लावायचं आणि सकाळपर्यंत ठेवायचं. पटपट तुमच्या पायांवरची सूज उतरेल.
जाडे मीठ :
जाड्या मिठात हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फेटचे क्रिस्टल्स असतात. गरम पाण्याच्या टबात किंवा बादलीत अर्धा कप हे जाडे मीठ घालायचे आणि रात्री झोपण्यापूर्वी पाय १० – १५ मिनिटं पाण्यात सोडून बसायचे. या उपायामुळे पायावरची सूज कमी व्हायला मदत होऊ शकते.
–
- स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही ‘मेनोपॉझ’चा त्रास होतो का? वाचा यामागची माहिती
- अनेक विकारांवर गुणकारी अशा तुळशीच्या बियांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
–
इसेन्शिअल ऑइल :
इसेन्शिअल ऑइलच्या मदतीनेदेखील पायांवरची सूज कमी होऊ शकते. त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून दिलासा मिळवायचा असेल तर हे तेल गुणकारी ठरते. नुसते इसेन्शिअल ऑइल पाण्यात टाकून मिसळले आणि ते मिश्रण पायांना लावले तरी बरी वाटू शकते पण जर तुम्हाला अधिक प्रभावी परिणाम हवा असेल तर त्यात अर्धा कप जाडे मीठदेखील घालावे.
हे मिश्रण तयार करताना त्यात युकेलिप्टस, पेपरमिंट, लेमन इसेन्शिअल ऑइल चे ३-४ थेंब गरम अर्धी बादली गरम पाण्यात घालायचे आहे. हा उपाय केल्यानेंही तुमच्या पायांची सूज कुठच्या कुठे पळून जाईल.
कोथिंबीर आणि धणे :
कोथिंबीर आणि धणे यांच्या मदतीनेही पायांवरची सूज कमी करता येऊ शकते. आहारात कोथिंबिरीचा जास्तीत जास्त वापर करा. त्याने सूज उतरेल. त्याशिवाय नेहमीपेक्षा कमी लघवी होत असेल किंवा इतर त्रास होत असेल तर हमखास धण्याचा उपयोग होतो.
धण्यामुळे सूजलेल्या पायांमधला जास्तीत जास्त साठलेला द्रव बाहेर पडायला मदत होते. एक कप पाण्यात २ चमचे धणे घालून ते पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळायचं आणि प्यायचे.
बर्फ :
बर्फ हा अनेक लहानसहान कुरबुरींवरचा रामबाण उपाय आहे. पायाच्या सूजेची समस्याही याला अपवाद नाही. एक स्वच्छ फडकं घेऊन त्यात बर्फ़ाचे ४-५ खडे टाकून ते फडकं गुंडाळायचं १०-१५ मिनिटं तरी बर्फ़ाचा पायाला चांगला शेक द्यायचा. बर्फ़ाने शेकल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे दुखणं कमी व्हायला मदत होते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.