गाणं आणि सोनं – दोन्ही गोष्टींसाठी फेमस असलेले बप्पीदा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तम्मा तम्मा लोगे, ऊ ला ला, याद आ रहा है.., डांस डांस अशी अनेक एका पेक्षा एक ढिनचाक गाणी संगीतबद्ध करणारे बप्पी लाहिरी हे एक जानेमाने संगीतकार आहेत. १९७२ पासून चित्रपट सृष्टीत कार्यरत असणारे बप्पी दा ‘ डिस्को किंग’ म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्या निधनामुळे केवळ बॉलिवूडलाच नव्हे तर संगीतप्रेमींनाही धक्का बसला.
भारतातच नाही तर परदेशातही बप्पी दा संगीताच्या ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट आहेत. हा संगीताचा जादूगार आपल्या संगीतासोबतच आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे त्यांचे ‘सोनेप्रेम!’ हे सोनेप्रेम एवढे आहे की बप्पीदा म्हणजे एक चालते बोलते ज्वेलरी शॉप आहेत.
हौसेला मोल नसते असे जरी मानले तरी ती हौस करण्यामागे काही खास कारण असतेच असते. इतके सारे सोने परिधान करण्यामागे बप्पीदा यांचे ही काही खास कारण असेलच. काय असेल बरे ते कारण ? तुम्हालाही उत्सुकता असेल ना? चला तर मग जाणून घेवू या गोल्ड मॅन चे रहस्य…
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बप्पी दा यांचे खरे नाव ‘आलोकेश लाहिरी आहे, २०१४ मध्ये बप्पी दा यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, त्यावेळी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडील सोन्या-चांदीची माहिती दिली होती.
लोकसभा निवडणुकीत बप्पी लाहिरी यांनी भाजपच्या तिकिटावर श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपल्या संपत्तीची माहिती देताना बप्पी दा यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेला तपशील २०१४ मधील आहे. या प्रकरणाला जवळपास ७ वर्षे झाली आहेत.
आता या संपत्तीमध्ये बदल झाला असावा, असा अंदाज आहे की त्यांची एकूण संपत्ती २० कोटी रुपयांच्या जवळ आहे. त्यांची पत्नी चित्राणी लाहिरी यांच्याकडे बप्पी दापेक्षा जास्त दागिने आहेत. २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, बप्पी दा यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोन्याच्या तुलनेत त्यांच्या पत्नीकडे ९६७ ग्रॅम सोने आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर बप्पी दाकडे ४.६२ किलो आणि त्यांच्या पत्नीकडे ८.९ किलो चांदी आणि ४ लाख रुपयांचे हीरे ही आहेत.
एका मुलखातीदरम्यान “ह्या चकचकणार्या धातुबद्दल इतके प्रेम का आहे? ” असे खुद्द बप्पीदा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ” हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध गायक एल्विस प्रेस्ली सोन्याच्या साखळ्या घालत असे. मी प्रेस्लीचा खूप मोठा फॉलोअर होतो. मला वाटायचे, जर मी यशस्वी झालो तर माझी प्रतिमा वेगळी तयार होईल. देवाच्या कृपेने सोन्याचे दागिने घालून मी माझी वेगळी प्रतिमा तयार केली आहे. पूर्वी लोक विचार करायचे, माझे सोने वापरणे हा फक्त दिखावा करण्याचा एक मार्ग आहे. पण तसे नाही. सोने माझ्यासाठी भाग्यवान आहे,”
हे ६३ वर्षीय संगीतकार मात्र काळासोबत पुढे जाण्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच त्यांनी अलीकडे सोने वापरणे बंद केले असून नवीन जमान्याचा नवा धातू ‘Luminex Uno’ वापरणे सुरू केले आहे. जो ज्वेलर्स तसेच गुंतवणूकदारांसाठी पर्यायी मौल्यवान धातू आहे.
“सोने, प्लॅटिनम आणि चांदीपासून बनलेला हा नवीन युगातील धातू ‘Luminex Uno’ उत्कृष्ट आहे. मी कधीही कोणत्याही ब्रँडचे समर्थन केले नाही, परंतु यावेळी, मी या नवीन युगातील धातूला निश्चितपणे समर्थन देत आहे.
–
- आजारी असताना हॉस्पिटलला न जाता, बर्मनदाना रेकॉर्डिंगला जायचं होतं; पण…
- हा “गायक” एकेकाळी फाटक्या चपलेने फिरायचा, एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता.
–
मी luminex uno साठी एक नवीन गाणे देखील तयार करत आहे, जे लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांच्या चालू असलेल्या आणि आगामी प्रकल्पांबद्दल पुढे बोलताना, बप्पी दा म्हणाले, “मी अलीकडेच LA मध्ये ‘दमादम मस्तकलंदर’ नावाचे एक गाणे रेकॉर्ड केले आहे, टॉप पॉप-गायिका ज्युलिया प्राइससोबत. स्नूप डॉगसोबतचे गाणे पुढील महिन्यात येत आहे. एकॉनसोबत एका प्रकल्पावर काम करत आहे.
तर मित्रांनो ही होती बप्पी लाहीरी नावच्या ‘गोल्ड मॅन’ ची कहाणी. तुम्हाला लेख कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा आणि नवनवीन लेखांसाठी आमच्याशी जोडले रहा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.