' वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर दादूसने पुन्हा उत्साहाने ‘हळद’ वाजवली – InMarathi

वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर दादूसने पुन्हा उत्साहाने ‘हळद’ वाजवली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिग बॉसच्या घरातून दर आठवड्याला कुणीतरी निरोप घेणार हे ठाऊक असूनही प्रत्येक रविवारी घरातील सदस्य गहिवरतात, मात्र काल झालेल्या एलिमिनेशनमुळे केवळ सदस्यच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनाही रडू आवरेना.

बिग बॉसच्या नवरत्नांपैकी दादुस अर्थात संतोष चौधरी यांनी काल घराचा निरोप घेतला. इतर सदस्यांमधील वाढलेली चुरस लक्षात घेता दादुस एलिमिनेट होणार ही बाब प्रत्येकाला ठाऊक असली तरी साध्याभोळ्या स्वभावाचे, हळवे, इतरांना समजून घेणारे दादूस आता यापुढे शोमध्ये दिसणार नाहीत ही बाब प्रत्येकालाच हूरहूर लावणारी ठरली.

 

big boss dadus inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गल्लीतला गायक ते कोळ्यांचा ‘बप्पी दा’

आगरी – कोळी बांधवांमध्ये लग्नापेक्षाही ‘हळद’ समारंभाला अधिक महत्व असतं. या समारंभात दादुसचं गाणं नाही तर अनेकांना आपला सोहळा पुर्ण झाल्यासारखा वाटत नाही.

सुरुवातीला केवळ गायनाची आवड असलेले संतोष यांनी ओळखीच्या लोकांमध्ये हळदीच्या कार्यक्रमाला गाणी गाण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा हा ठसका, पारंपरिक गीते लोकांना इतकी आवडू लागली की लग्नाची हळद दादुंच्या गाण्यांशिवाय अपुर्णच ठरू लागली.

सुरुवातीला केवळ ठाणे, भिवंडी याच परिसरात रंगणारे दादुस यांचे सुर हळूहळू मुंबईतील अनेक शहरात ऐकू येऊ लागले. लगीनसराईत दररोज २-३ कार्यक्रम करणाऱ्या दादुसची वेळ साधण्यासाठी अनेकजण लग्नाची तारिख ठरताच त्यांचा कार्यक्रम फायनल करतात.

 

dadus inmarathi

 

लग्नाव्यतिरिक्त इतरही अनेक कार्यक्रमांत कोळीगीतांचा ठेका ऐकू येतो तो दादुस यांच्यामुळेच! पारंपरिक कला जोपासणाऱ्या दादुस यांच्या सहकलाकारांची संख्याही सातत्याने वाढती आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये दादूस यांनी अक्षरशः शेकड्याने हळदींचे कार्यक्रम गाजवले आहेत.

दादुस यांना सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड! बिग बॉसच्या घरातही हातात वेगवेगळ्या अंगठ्या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घेऊन दिमाखात मिरवणाऱ्या दादुस यांना कोळी बांधवांचे ‘बप्पी दा’ म्हटलं जातं ते त्यांच्या याच सवयीमुळे!

 

dadus 1 inmarathi

 

बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेले संतोष हे आता सगळ्या महाराष्ट्राचेच लाडके दादुस झाले आहेत.

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

‘बिग बॉस’च्या भरभक्कम आणि बाणेदार आवाजामागचा खरा चेहेरा कोणाचा आहे?

वडिल गेले तरीही…

काही वर्षांपुर्वी दादुस यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र तेव्हा नेमकी सगळीकडे लगीनघाई सुरु होती. दादुस अशाच एका कार्यक्रमात असताना वडिलांच्या निधनाची बातमी समजली.

 

dadus 2 inmarathi

 

घरी परतल्यानंतर त्यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार पार पाडले. कुटुंबियांना आधार दिला. मात्र त्याचवेळी त्याचदिवशी रात्री असलेल्या हळदीच्या कार्यक्रमाची त्यांना आठवण झाली. वडिलांचे निधन झाल्याने दादुस नक्कीच कार्यक्रम रद्द करतील अशी सगळ्यांनाच खात्री होती.

मात्र दिलेला शब्द, कार्यक्रमासाठी दिलेला होकार आणि मुख्य म्हणजे लग्नघरात आपल्या गाण्यांची वाट पाहणारी मंडळी यांचा विचार करत वडिलांच्या जाण्याचे दुःख बाजूला ठेवत दादुसने रात्री आयोजित केलेला कार्यक्रम तितक्याच उत्साहात सादर केला.

बिग बॉसमधील ‘आपला माणूस’

बिग बॉसचं घर म्हणजे भांडणाचा अड्डा! इथे ग्रुप्स पडतात, वाद रंगतात, अनेकदा हमरीतुमरीही होते. मात्र यंदाच्या सिझनमधील सर्वात सज्जन, साधा आणि प्रत्येकाला आपला वाटणारा सदस्य म्हणून दादुस यांचा नाव गाजलं.

सर्वांपेक्षा वयाने ज्येष्ठ असणारे दादुस यांना खेळताना शारिरीकदृष्ट्या मर्यादा यायच्या. मात्र तरीही तरुणांच्या खांद्याला खांदा भिडवून तितक्याच उत्साहात खेळ खेळायचे.

गाणी म्हणणं, सकाळी उठल्.ावर मनसोक्त नाचणं यांबाबतही दादुस यांच कौतुक झालं. घरात प्रत्येकाचेच वाद झाले, मात्र दादुस हे दोन्ही ग्रुपमधील सदस्यांचे लाडके ठरले. दादुस यांनी इतर कुणाशीच कधीही वाद घातला नाही, त्यामुळेच दादुस यांना निरोप देताना प्रत्येक सदस्य हळहळला.

 

dadus big boss inmarathi

 

केवळ भांडणानेच नव्हे तर संयम, प्रेम, मनोरंजन यांच्या बळावरही बिग बॉसच्या घरात पन्नाच दिवसांहून अधिक काळ टिकून राहता येतं. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येतं, इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी फारशी प्रसिद्धी नसूनही पन्नास दिवसांच्या या खेळानंतर इतर सेलिब्रिटींहून अधिक मान, प्रेम मिळवता येतं याचं उदारण म्हणजे संतोष अर्थात दादुस यांची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?