' हिंदुत्वावर टीका करणाऱ्या मूनव्वर फारुकी या कॉमेडीयनचं करियर म्हणजे “दैव देतं अन् कर्म नेतं”! – InMarathi

हिंदुत्वावर टीका करणाऱ्या मूनव्वर फारुकी या कॉमेडीयनचं करियर म्हणजे “दैव देतं अन् कर्म नेतं”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात एका गोष्टीचं पेव फुटलंय ते म्हणजे स्टँड अप कॉमेडी. आणि आज देशभरात बहुतांश वाद या स्टँड-अप कॉमेडीयन्समुळेच होताना दिसत आहे. वीर दासच्या मोनोलॉगने देशभरात कशी दुफळी माजवली हे आपण गेल्या आठडव्यात बघितलंच.

आता आणखीन एका स्टँड-अप कॉमेडीयनने आपले शोज कॅन्सल झाल्याकारणाने हे क्षेत्र सोडायचा निर्णय घेतला आहे, त्याचं नाव म्हणजे मूनव्वर फारुकी!

 

munavvar farooqui inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मूनव्वरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून याची घोषणा केली असून, हे क्षेत्र सोडण्यामागे लोकांचा द्वेष कारणीभूत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या ट्विटमध्ये त्याने म्हंटलं की “द्वेष जिंकला, एक कलाकार हरला, अलविदा!”

बेंगलोरमध्ये मूनव्वरचा एक स्टँडअप शो अरेंज केला गेला होता, आणि तो रद्द केल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता त्यांना पोलिसांकडून नोटिस गेली ज्यात हे स्पष्ट केलेलं होतं, की मूनव्वर हा फार वादग्रस्त कॉमेडीयन आहे आणि बरीच लोकं त्याचा विरोध करतायत त्यामुळे हा शो त्वरित रद्द करण्यात यावा.

शिवाय मूनव्वरने याआधीदेखील लोकांच्या धार्मिक श्रद्धास्थानांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती आणि त्याने या शोमध्येसुद्धा अशीच काही टिप्पणी केली तर त्याचे फार वाईट पडसाद आपल्याला बघायला मिळतील असंही पोलिसांनी नमूद केलं आहे!

यामुळेच मूनव्वरने आता स्टँडअप कॉमेडीला रामराम ठोकला आहे, त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने यावर सविस्तर मुद्दे मांडले आहेत, त्याच्या म्हणण्याप्रमाणे –

“६०० हून अधिक तिकीटं विकली जाऊनसुद्धा बेंगलोरचा शो रद्द करण्यात आला आहे, माझ्या शोमध्ये कुठलंही वादग्रस्त विधान नाहीये, शिवाय याआधीही मी न केलेल्या टिप्पणीसाठी मला जेलची हवा खायला लागली आहे, आमच्याकडे या शोचं सेन्सॉर सर्टिफिकेटसुद्धा आहे, तरीही गेल्या २ महिन्यात माझे तब्बल १२ शोज रद्द केले गेले आहेत!”

 

munavvar 2 inmarathi

 

याच वर्षी जानेवारीमध्ये इंदोरच्या एका शोमध्ये हिंदू देवी देवतांबद्दल टिप्पणी केल्याने मूनव्वरला अटक करण्यात आली होती आणि तब्बल एक महिना त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, नंतर सुप्रीम कोर्टाने त्याला जामिनावर सोडलं!

राम सीता पासून गोधरा हत्याकांडाबद्दल उलट सुलट कॉमेंट करणाऱ्या मूनव्वरला अटक झाल्यानंतरसुद्धा त्याने बऱ्याच ठिकाणी शो पुन्हा करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या या रेकॉर्डमुळे बऱ्याच ठिकाणचे त्याचे शोज रद्द करण्यात आले.

एकीकडे मूनव्वरने स्टँडअप कॉमेडीला राम राम ठोकला, तर दुसरीकडे बेंगलोर पोलिसांच्या या कारवाईवर सगळ्याच स्तरातून टीका होऊ लागली, हिंदू उग्रवादी संघटनाच्या आहारी जाऊन पोलिस आशा कारवाया करत असल्याचे आरोप बेंगलोर पोलिसांवर केले जात आहेत.

banglore police inmarathi

 

या सगळ्या प्रकरणावर कॉँग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधी यांनी मूनव्वरचं नाव न घेता ट्विट करत त्याला सपोर्ट केला – “द्वेष कधीच जिंकणार नाही, विश्वास ठेव, हार मानयची नाही, थांबायचं नाही!”

या सगळ्या प्रकरणावर स्वरा भास्कर, झिशान अयुब खान यांनीसुद्धा ट्विट करत याविरोधात भाष्य केलं आहे. एकंदरच या प्रकरणाला जातीय रंग दिला जातोय आणि त्यातून देशातल्या एका समुदायाची प्रतिम मलिन केली जात आहे.

मूनव्वरचे शोज कारणाविना रद्द करणं जसं चुकीचं आहे तसं त्याने याआधी केलेली वक्तव्यंसुद्धा चुकीची आहेत, आणि त्याच्या या वादग्रस्त विधानांमुळेच त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. फक्त मुस्लिम आहे म्हणून त्याला टार्गेट केलं जातंय हे म्हणणं कितपत योग्य आहे?

आज याच क्षेत्रात झाकीर खानसारखा मुस्लिम कलाकारसुद्धा काम करतोय, त्याच्या स्टँडअप कॉमेडीवर कधीच कुणी आक्षेप घेत नाही, त्याचे शो कधीच रद्द होत नाहीत, याचा विचार कुणीच करत नाही.

 

zakir-khan-inmarathi

 

आज डिजिटल माध्यमांच्या क्रांतिमुळे आपण देशाच्या कानाकोपऱ्यातला कंटेंट सहज बघू शकतो त्यावर भाष्य करू शकतो आणि स्टँडअप कॉमेडी ही एक performing art आहे, त्यामुळे त्याचा वापर योग्य पद्धतीनेच व्हायला हवा.

स्वातंत्र्य आहे, प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे म्हणून कोणत्याही धर्म, जात, वंश, रंग, लिंग याविषयी उलट सुलट भाष्य करणं टाळायला हवं, टीका करायचीसुद्धा एक पद्धत असते, त्या योग्य पद्धतीने टीका केली तर लोकं हसत हसत ती स्वीकारतातसुद्धा, पण जर लोकांच्या आस्थेवर तुम्ही बोट ठेवाल तर त्यानंतरच्या परिणामांसाठी तयार रहायलाच लागेल.

मूनव्वर बाबत घडलेली गोष्ट चुकीची जरी असली तरी यामागे त्याची जुनी वक्तव्यंसुद्धा तितकीच जवाबदार आहेत, त्यामुळे या सगळ्याचं खापर सरसकट सिस्टिमवर किंवा समाजाच्या मानसिकतेवर फोडणं योग्य नाही!

 

munavvar 3 inmarathi

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?