' कुत्र्यासोबतचे फोटो ते जिम लूक, सेलिब्रिटी या फोटोंसाठी रग्गड पैसे देतात का? – InMarathi

कुत्र्यासोबतचे फोटो ते जिम लूक, सेलिब्रिटी या फोटोंसाठी रग्गड पैसे देतात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधारण नव्वदीचं दशक संपेपर्यंत बॉलिवूड सितार्‍यांना त्यांचं खाजगी आयुष्य प्रकाशात आणणं रुचायचं नाही. चकचकीत मासिकांच्या गॉसिप कॉलममधून जी काय दबक्या आवाजात चर्चा व्हायची तितकीच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मात्र अलिकडील काही वर्षांत विशेषत: सोशल मिडियावर सेलिब्रिटीही सक्रीय झाल्यानंतर पाश्चिमात्यांचं पॅपराझी कल्चर भारतातही चांगलंच रुळलं आहे.

पॅपराझी ही संकल्पना साधारण पन्नासच्या दशकात पाश्चिमात्य देशात रुजली. मुळात पॅपराझी हे नावही (अनेकवचनी) एका फ़िल्मी पात्रावरून प्रचलित झालेलं आहे.

 

photographers inmarathi

 

१९६० साली आलेल्या दोल्स व्हिता या चित्रपटातील वार्ताहराचं नाव पॅपराझ असतं त्याच्यावरून हे नाव प्रचलित झालं आणि पुढे टाईम मॅगझिननं ते प्रस्थापित केल्याचं सांगितलं जातं.

तुम्हाला प्रिन्सेस डायना आठवतेय? एक दु:खी आणि नितांत संदर राजकन्या राजमहालाच्या दगडी भिंतीत जिची घुसमट होत होती तिचं प्रेमप्रकरणही जगानं स्विकारलं.

प्रिन्सेस डायना आणि डोडी एकत्र आहेत ही कुजबुज जेव्हा वाढली तेव्हा त्यांच्या खाजगी क्षणांना चोरून कॅमेर्‍यात बंदीस्त करण्याची जगभरातल्या फोटोग्राफर्समधे जणू स्पर्धाच लागली होती. जिथे डायना जाईल तिथे हे फोटोग्राफर मधमाशांसारखे घोंगावत जात असत.

अशाच एका पॅपराझी पाठलागाला चुकवताना झालेल्या अपघातात डायनाचा अखेर झाला असं म्हणलं जातं. डायनाच्या मृत्यूच्या बातम्यात जगानं पहिल्यांदा हा पॅपराझी शब्द ऐकला.

एकेकाळी पॅपराझी असणं बेकायदेशीर, असंस्कृत मानलं जायचं मात्र आता काल बदलला आहे आणि परिस्थितीही बदलली आहे. पॅपराझीच्या माध्यमातून उत्तम प्रसिध्दी मिळते हे सेलिब्रिटींच्या लक्षात आलं आणि पब्लिक अपियरन्स देण्याकडे कल वाढला.

 

airport look celebrity inmarathi

 

दुसर्‍या बाजूला अनेकांनी पॅपराझीना पैसे देऊन आपली प्रसिध्दी करण्यास सांगितलं. सतत बातम्यांचा, चर्चेचा विषय बनणं हे बदललेल्या सेलिब्रिटी कल्चरचा अनिवार्य भाग बनला आहे.

आज अनेक पीआर हॅण्डल आहेत जे लहान मोठ्या सेलिब्रेटींना प्रसिध्दी देत असतात, त्यांच्याबाबत विविध चर्चांची पिल्लं सोडत असतात. सामान्य माणसाला अजूनही वाटतं, की एखादी हिरोईन कुत्र्याचं पिल्लू घेऊन जाते, तेव्हा योगायोगानं फोटोग्राफरला ती दिसते आणि तिचे फोटो काढले जातात किंवा व्हिडिओ काढला जातो.

 

alia priyanaka inmarathi

 

एअरपोर्टवर उतरणार्‍या सेलिब्रिटींबाबतही हेच. विमानातून अनेक तासांचा प्रवास करून आल्यावरही फ्रेश आणि फॅशनेबल दिसणारे सितारे योगायोगानं पॅपराझींच्या नजरेस पडतात असं समजणारे अनेकजण आहेत.

हे जे सहजच काढलेले व्हिडिओ असतात त्यासाठी सितारेच या पीआर हॅण्डल्सना पैसे देत असतात. एरवी एखाद्या हिरोईनच्या मुलानं शी केली का? कोणता डायपर वापरला? त्याची सांभाळणारी बाई कोण आहे? हे सगळं जाणून घेण्यात आम जनतेला किती दिवस रस असेल? मात्र या चर्चा वर्षानुवर्षं चालूच रहातात याचं कारण सितार्‍यांना चित्रपट हातात नसले तरिही पब्लिकच्या नजरेआड जाण्याची असुरक्षितता जाणवत असते.

फिल्मी चकचकाटाची जी दुनिया आहे त्याची ही काळी बाजू आहे. इथे प्रत्येकजण कमालीचा असुरक्षित आहे आणि लाईमलाईटमधे रहाण्यासाठी धडपडणारा आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?