आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो, तुम्ही ‘गुलबकावलीची’ गोष्ट तर ऐकलीच असेल ज्यातील राजकुमाराला आपल्या पत्नीचा जन्मदिवस विसरल्याबद्दल परिराज्यात शिक्षा करण्यात आली होती. ही झाली गोष्टीतली कल्पना, पण आपल्या खर्या जगात असे काही होत असेल तर? म्हणजे प्रत्यक्षात कोणी आपल्या बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याला शिक्षा होत असेल तर?
आता काही महाभाग यावर पत्नीचा वाढदिवस रोजचं साजरा करण्याची टूम काढतील पण असे करणे सहज शक्य आहे का? म्हणजे इकडे आड तिकडे विहीरच म्हणा ना!
या जगात अशा अनेक मजेमजेच्या गोष्टी भरल्या आहेत हे नक्की. आता नवरा बायकोचे नाते म्हणजे ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे असते. याचा अनुभव प्रत्येक विवाहित व्यक्तीला असतो. नवरा बायकोचे नातेच तसे क्रिस्पी आणि खुमासदार असते. या नात्याच्या अनेक गमतीजमती आहेत. तसे चढ-उतार ही आहेत.
आता कामाच्या व्यापात जर एखादा आपल्या बायकोचा वाढदिवस विसरला तर काय होईल? जास्तीत जास्त एखादे भांडण किंवा दोन-चार दिवसांचा अबोला आणि एखाद्या महागड्या गिफ्ट वर सेटलमेंट… पण जगात असाही एक आगळावेगळा देश आणि त्यातील एक आगळावेगळा कायदा आहे जो ऐकला तर तुम्ही कधीच आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरणार नाही. कोणता आहे तो देश आणि त्याचा तो कायदा? चला माहिती करून घेवू.
पत्नी किंवा आपला लाईफ पार्टनर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. तेव्हा पत्नी संदर्भातली कोणतीच गोष्ट शक्यतो विसरू नये. त्यातही तिचा वाढदिवस! जगात एक असाही देश आहे की जो आपल्या महिला नागरिकांना पुरेपूर सन्मान देतो. याच भावनेतून त्या देशात एक आगळा वेगळा कायदा करण्यात आला आहे.
प्रशांत महासागरामध्ये अनेक लहान मोठी बेटे आहेत. या बेटांवर तसेच लहानमोठे देश आहेत. यातीलच पॉलिनेशियन एरियाचा एक छोटासा देश आहे ‘सामोआ’. हे निसर्ग सौंदर्याने नटलेले एक शानदार बेट आहे. या बेटावर बाकी तर सारे सर्वसामान्य आहे पण एक कायदा मात्र इथे अगदीच वेगळा म्हणजे जगावेगळा आहे. तो जोडलेला आहे पत्नीच्या वाढदिवसाशी!
तो कायदा असा आहे की,’ जर कोणी पती आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याला अगदी तुरुंगवास देखील होवू शकतो. ‘आता तुम्ही म्हणाल हा तर पती लोकांवर अन्याय आहे. तर तसे नाही.
या कायद्यात एक अपवाद देखील आहे. तो हा की जर पती आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला, ही त्याची विसरण्याची पहिलीच वेळ असेल तर सामोआ मधील पोलिस त्याला ताकीद देवून सोडून देतात जेणेकरून पुढच्यावेळी त्याने ही चूक करू नये. किंवा तसा विचार ही करू नये. असे असले तरी काही न्युज चॅनल्सनी या कायद्याच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
–
- लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय बेस्ट आहे?
- भांडण झाल्यावर नेहमी ३६ चा आकडा का धरतात? वाचा यामागचं गंमतीशीर कारणं
–
खरी गोष्ट ही आहे की फेब्रुवारी २०२० मध्ये पब्लिश झालेल्या एका रिपोर्टच्या संदर्भानुसार असे समोर येते की गेल्या काही वर्षांमध्ये सामोआमध्ये अनेक ‘डोमेस्टिक व्हायलेन्स’ अर्थात घरेलू हिंसाचारच्या घटना समोर आल्या आहेत.
त्यातलीच एक भयंकर घटना ही होती की एका महिलेने आपल्या पतीचा दुसर्या महिलेशी ऑनलाइन झालेला संवाद वाचून स्वत:ला पेटवून घेतले होते. या आणि अशा घटनांना प्रतिबंध म्हणून एक महिलांच्या बाजूचा कायदा तिथे करण्यात आला.
यातलेच एक कलम आहे की पतीने पत्नीकडे दुर्लक्ष केले तर ती महिला आपल्या पतीविरुद्ध तक्रार करू शकते. याच कायद्यातील काही तरतूदिंना वाढवून चढवून दाखवले जात आहे.
मात्र घरातील स्त्रियांना समान संधी मिळावी, त्यांच्या आयुष्यातील खासण, प्रसंग सादरे व्हावे, त्यांना घरात गृहित धरले जाऊ नये आणि पतीकडून लक्ष दिले गेले नाही म्हणून महिलांची मानसिकता ढासळू नये यासाठी खास महिलांकरिता असे कायदे आणि त्यातील कलम तयार करण्यात आले आहेत.
पब्लिश झालेल्या काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात येतो की प्रत्यक्षात हा कायदा पाळला जात नाही. मात्र असं असलं तरी अनेक पुरुषांना याची भिती असते हे ही खरं!
काही असो, पण खरच जर जर असा कोणताही कायदा जर आपल्या देशात असता तर आपल्या देशातली निम्मी जनता तुरुंगवास भोगत असती हे ही तितकेच खरे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.