हाती पिस्तूल न घेताही मुंबईवर दहशत माजवणारा पहिला डॉन
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मुंबई आणि अंडरवर्ल्ड हे खूप जुनं समीकरण आहे. आज सुरक्षित असलेल्या आपल्या मुंबईला २० व्या दशकाच्या सुरुवातीला कित्येक ‘भाई’, ‘डॉन’ मंडळींनी स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
‘लोकांची एकजूट’ ही मुंबईची तेव्हाही ताकत होती आणि आजही आहे. मुंबईवर वक्रदृष्टी ठेवणारा सर्वात पहिला डॉन कोण ? असा प्रश्न विचारला तर ‘हाजी अली मस्तान’ हे नाव लगेच समोर येतं.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात अजय देवगण ने साकारलेलं ‘सुल्तान मिर्झा’ हे पात्र हाजी अली मस्तान च्या गुन्हेगारी जगतातील कारवायांसोबत खूप मिळतं जुळतं आहे.
१९२५ मध्ये स्वतःला मुंबईचा डॉन म्हणून लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या हाजी अली मस्तान या ‘भाईगिरी’च्या क्षेत्रात कसा आला ? कोणत्या राजकीय नेत्याच्या ‘वरदहस्त’ असल्याने तो मुंबईत आपले अवैध कामं करू शकला? आणि हे सर्व करण्यामागे त्याचा काय उद्देश होता हे काही वेळासाठी त्या काळात जाऊन जाणून घेऊयात.
हाजी अली मस्तान आणि मुंबईत दहशत पसरवणाऱ्या इतर डॉन मध्ये हा फरक आहे की, त्याने कधीच कोणावर स्वतः पिस्तुल ताणलं किंवा गोळी चालावलेली नाहीये. दाऊद गँग आणि पठाण गँग यांना जोडणारा एकमेव दुवा असलेल्या हाजी अली मस्तानचा जन्म २६ मार्च १९२६ रोजी तामिळनाडू मध्ये झाला होता.
हाजी अली मस्तानचे वडील हैदर मिर्झा हे एक गरीब शेतकरी होते. घरात असलेल्या दारिद्र्यामुळे हैदर मिर्झाला गाव सोडून शहरात जाण्याची खूप इच्छा होती. पण शेतकरी असल्याने त्याला ते करणं शक्य होत नव्हतं.
१९३४ पर्यंत हैदर मिर्झाने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. पण, जेव्हा काहीच बदल घडत नव्हते तेव्हा त्याने आपल्या १० वर्षाच्या मुलाला (हाजी अली मस्तानला) घेऊन मुंबई गाठली.
क्राफर्ड मार्केट मध्ये त्याने सायकल दुरुस्त करण्याचं दुकान सुरू केलं. हे दुकान चालवत असतांना हैदर मिर्झा याने त्या भागातील मोठ्या इमारती, कार बघून स्वतः सुद्धा श्रीमंत होण्याचं स्वप्न बघितलं.
१९४४ पर्यंत हाजी अली मस्तान हा १८ वर्षांचा झाला होता. त्यावेळेस त्याची भेट गालिब शेख या व्यक्तीसोबत झाली. गालिब शेख ने हाजी अली मस्तानला पोर्ट वर जहाजातून येणारा माल उतरवण्याचं काम दिलं.
हाजी अली मस्तान हा कामात आणि बोलण्यात तरबेज असल्याने त्याला गालिब शेख ने ‘पोर्टर’ या पदावर नक्की केलं. हाजी अली मस्तानने ही नोकरी करत असतांना बरेच मित्र जमा केले.
–
- १० वर्ष मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते मुंबई मॅरथॉन रनर…
- ‘दहशतीचा एन्काउंटर’ करून भाजपने जिंकली मनं आणि गुजरातमध्ये सुरु झालं ‘BJP पर्व’
–
परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर त्या काळात सुद्धा खूप कर आकारले जायचे. गालिब शेख हा एक ‘स्मगलर’ होता. तो लोकांना कर वाचवून त्यांच्या वस्तू पुरवायचा. हाजी अली मस्तानने हे काम शिकून घेतलं आणि तोसुद्धा काही पैश्यांच्या मोबदल्यात इतर ‘स्मगलर’ला हे विना कर माल सफाईने पुरवू लागला. ‘पोर्टर’ असल्याने कोणीच हाजी अली मस्तानवर संशय घ्यायचं नाही.
१९५० चं दशक हे हाजी अली मस्तानचा काळ म्हणून समजलं जातं. त्याच काळात त्याची सुकुर नारायण या गुजरातच्या ‘स्मगलर’ सोबत मैत्री झाली. दोघांच्या महत्वकांक्षा सारख्याच होत्या. दोघांनी सोबत काम करायचं ठरवलं. सोन्याचे बिस्कीट, सोन्याचं घड्याळ, फिलिप्स रेडिओ या महाग वस्तू या दोघांनी दुबई मार्गे भारतात आणण्याचं काम हाती घेतलं.
हाजी अली मस्तानचं आयुष्य या कामानंतर बदललं होतं. कधीकाळी जहाजावर ओझं वाहणारा हा मुलगा आता ‘माफिया मस्तान भाई’ म्हणून ओळखला जात होता. पांढरा सूट आणि मर्सिडीज कार ही आता हाजी अली मस्तानची ओळख निर्माण झाली होती.
१० वर्षात हाजी अली मस्तानने मुंबईतील सर्व बंदरांवर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. श्रीमंत होण्याच्या त्याच्या कल्पने पेक्षाही जास्त श्रीमंती त्याने आता बघितली होती. १९७० च्या दशकापर्यंत हाजी अली मस्तानने आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे हाजी अली मस्तान हा सुद्धा बॉलीवूड आणि विशेष करून ‘मधुबाला’चा खूप मोठा फॅन होता. या दोघांना लग्न करायचं होतं. पण, काही कारणांमुळे ते शक्य झालं नाही.
हाजी अली मस्तानने ‘सोना’ या अभिनेत्रीसोबत लग्न केलं,जी मधुबाला सारखीच दिसायची. असं सांगितलं जातं की, त्या काळातील बॉलीवूडचे कलाकार, निर्माते हे हाजी अली मस्तानच्या बंगल्यावर त्याला भेटायला जायचे. हाजी अली मस्तानच्या कामाची एक विशिष्ठ पद्धत अशी होती की, तो पोलिसांना कधीच त्रास द्यायचा नाही.
१९७४ मध्ये जेव्हा हाजी अली मस्तानला पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली होती, तेव्हा त्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं होतं. पोलिसांना उंची भेटवस्तू देणे आणि त्रास देणाऱ्या पोलीस ऑफिसरची बदली घडवून आणणे हे हाजी अली मस्तानला त्या काळात सहज शक्य होतं.
इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांना हाजी अली मस्तानच्या अवैध व्यवसायाबद्दल सतत माहिती पुरवली जायची. आणीबाणी घोषित झाल्यानंतर हाजी अली मस्तानला अटक करण्यात आली आणि त्याला १८ महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
यानंतर गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडून राजकारणात जाण्याचा त्याने निर्णय घेतला. ‘जेपी’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका काँग्रेस नेत्याचा हाजी अली मस्तानवर वरदहस्त होता जो त्याला राजकारणात सक्रिय होण्यासाठी मदत करणार होता.
१९८० च्या दशकात हाजी अली मस्तानने राजकारणावर लक्ष केंद्रित केलं आणि १९८४ मध्ये त्याने ‘जोगेंद्र कवाडे’ या नेत्यासोबत काम करून ‘दलित-मुस्लिम सेक्युरिटी फेडरेशन’ पक्षाची स्थापना केली. १९९० मध्ये या पक्षाचं नाव बदलून ‘फेडरेशन ऑफ इंडियन मायनॉरिटीज’ हे ठेवण्यात आलं होतं.
ही पार्टी कधीच कोणती निवडणूक जिंकू शकली नाही. पण, या मार्गाने हाजी अली मस्तानने आपला सर्व काळा पैसा बाजारात आणला असं सांगितलं जातं. निवडणुकीत अमाप खर्च करायची पद्धत या निवडणुकीनंतरच सुरू झाली असं सुद्धा राजकीय विश्लेषक नेहमीच सांगतात.
१९९४ मध्ये आपल्या पत्नी आणि दत्तक घेतलेल्या मुलासोबत राहत असतांना हाजी अली मस्तानचं हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झालं.
कोणत्याही व्यक्तीचं खून न करणाऱ्या हाजी अली मस्तानचं नाव हे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रात त्या काळी भीतीने घेतलं जायचं. हाजी अली मस्तानच्या निधनानंतर मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कारभार दाऊद इब्राहिम या नावाभोवती फिरत होता.
सामान्य मुंबईकर मात्र कोणत्याही भीतीला भीक न घालता आपलं काम प्रामाणिकपणे करून मुंबई शहराला अजून मोठं करण्यात व्यस्त होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.