आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सार्वजनिक ठिकाणी कलाकारांना प्रेक्षकांकडून जसं प्रेम मिळतं, तसंच अनेकदा विचित्र प्रसंगांंनाही सामोरं जावं लागतं. कधी प्रेक्षकांच्या अतिरेकी प्रेमामुळे कलाकार त्रस्त होतात तर कधी फॅन्सच्या अतरंगी मागण्यांनी कलाकारांचा जीव मेटाकुटीला येतो.
लावणीसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनाही अशाच एका विचित्र प्रसंगाला तोंड द्यावं लागलं होतं.
काही वर्षांपुर्वी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी हजेरी लावली होती. बिग बॉसच्या २ सिझनमधील सहस्पर्धक अभिजीत बिचुकले आणि सुरेखा पुणेकर यांनी या कार्यक्रमात धमाल आणली होती.
या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये सुरेखा पुणेकर यांना व्हिसा ऑफिसमध्ये अशाच विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.
काय घडलं होतं?
अमेरिकेतील मराठी मंडळांच्या अधिवेशनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुरेखा पुणेकर यांना दरवर्षी निमंत्रण येत होतं. अखेर २००३ साली त्यांनी हे निमंत्रण स्विकारत अमेरिकावारीची तयारी सुरु केली.
प्रक्रियेनुसार व्हिसा मिळवण्यासाठी त्यांनी व्हिसा ऑफिस गाठलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते त्यांच्यासाठी अत्यंत अनपेक्षित होतं.
सुरेखा पुणेकरांसह सुधीर भटही यावेळी उपस्थित होते. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिल्या. त्या अधिकाऱ्यांनी ”तुम्ही कोण?” असा प्रश्न करताच ” मी सुरेखा पुणेकर, नृत्यांगना असून लावणी सादर करण्यासाठी मी अमेरिकेत जात असल्याचंही सुरेखा यांनी सांगितलं.
मात्र त्यांचं हे उत्तर ऐकून संबंधित अधिकाऱ्याने अजब उत्तर दिलं. ”तुम्ही सुरेखा पुणेकर नाहीच. मी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा कार्यक्रम पाहिला आहे”. त्यांच्या या उत्तराने आधी सुरेखा पुणेकर घाबरल्या मात्र नंतर त्यांना हसु आवरेना.
—
- एक चूक ज्यामुळे सुनिल शेट्टीला पोलिसांनी आतंकवादी म्हणून पकडलं होतं
- १० वर्ष मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते मुंबई मॅरथॉन रनर…
—
”मी मेकअपसह कार्यक्रम सादर करते, सध्या कोणताही मेकअप नसल्याने तुम्ही मला ओळखलं नसेल” असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्याची समजुत घालण्याचा प्रयत्नही केला, मात्र अधिकारी आपल्या म्हणण्यावर ठाम होता.
अखेर काही वेळ त्यांच्यात चर्चा झाली, बाचाबाचीही झाली. मात्र त्यातील कुणीतरी ”लावणी ऐकवा” असा विचार मांडला. वाया जाणारा वेळ लक्षात घेता सुरेखा पुणेकर यांनी आपल्या खड्या आवाजात ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’ ही लावणी ऐकवली. पहिलं कडवं संपताच कार्यालयातील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.
संबंधित कर्मचाऱ्याने त्यांची माफी मागितली आणि अखेर सुरेखा पुणेकर यांच्या हाती व्हिसा दिला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.