भाजप नव्हे तर आता चक्क ममता दीदी काँग्रेसची डोकेदुखी बनत चालल्या आहेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बंगाल निवडणुकांचा धुरळा उडाला आता उत्तर प्रदेश, पंजाब गोवा राज्यांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर निवडणूका येऊन ठेपल्याने राजकीय पक्षसुद्धा सक्रिय झाले आहेत. निवडणूका लागल्याने सहाजिकच तिकीट वाटप होणार त्यावरून होणारी मतांतरे, पक्षातील लोकांची फाटाफूट या गोष्टी आपण रोजच बातम्यांमधून बघणार आहोत.
नुकतंच रायबरेली मतदार संघातील आमदार अदिती सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपच सरकार आणण्यासाठी पक्ष जोमाने काम करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस संपवण्यासाठी ममता दीदी देखील मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. तृणमुल पक्षातीलच एका व्यक्तीने ममता दीदी २०२४ च्या पंतप्रधान पदासाठी उमेदवार आहेत अशी चक्क घोषणा करून टाकली.
तृणमुल पक्षातील त्या व्यक्तीच म्हणणं अगदीच चुकीचं नाही कारण पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी ममता दीदी पदर खोचून तयारीला लागल्या आहेत, मगाशी म्हंटल्याप्रमाणे उत्तर प्रदेश प्रमाणे आसाम, गोवा त्रिपुरा, मेघालय, बिहार हरियाणा आदी राज्यांच्या काँग्रेस नेत्यांच्या भेटी ममता दीदी घेत आहेत.
बिहार हरियाणातील भेटी :
ममता दीदी दिल्ली दौऱ्यावर असताना बिहार काँग्रेसचे नेते कीर्ती कुमार आझाद आणि जेडीयूचे माजी खासदार पवन वर्मा यांना आपल्या पक्षात सामील केले.
कीर्ती कुमार आझाद बिहारमधील ब्राह्मण समाजाचा चेहरा म्हणून बघितला जातो तर पवन वर्मा हे ओबीसी समाजाचा चेहरा मानला जातो, ममता दीदींनी केवळ सेक्युलर विचारसरणींच्या लोकांना लक्ष न करता सगळ्या प्रकारच्या लोकांना आपल्या पक्षात सामील करत आहेत, तसेच या दोन्ही नेत्यांना पक्षात घेण्याचे श्रेय जाते ते म्हणजे चाणक्य प्रशांत किशोर यांना.
हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयोग करणारे अशोक तंवर यांनीही ममता दीदींनी आपल्या पक्षात सामील केले आहे. अशोक तंवर यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. दलित समाजातून अशोक तंवर येतात, कधीकाळी राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे.
मेघालयमधील फोडाफोडी :
मेघालय सारख्या राज्यात बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती यामुळे अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. एच पाला यांना काँग्रेस हायकमांडने अध्यक्ष बनवल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजी पसरली होती. तृणुमलने याच संधीच फायदा घेतला आणि अभिषेक बॅनर्जी जे टीएमसी प्रभारी आहेत त्यांनी संगमा आणि इतर राजकीय नेत्यांची भेटी घेतल्या.
गांधी परिवाराशी निगडित मंडळी आता ममता दीदींसोबत :
गांधी परिवार आणि त्यांच्याशी निगडित मंडळी यांचं एक वेगळं प्रस्थ आहे, आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा अनेक नेतेमंडळींचे गांधी घराण्याशी चांगले संबंध आहेत. आसाममधून सुश्मिता देव, उत्तर प्रदेशमधून ललितेशपती त्रिपाठी यांनी काँग्रेस पक्षाशी असलेली नाळ तोडून तृणुमल पक्षात एंट्री घेतली आहे, ललितेश यांच्या तीन पिढ्यांचे गांधी घराण्याशी उत्तम संबंध होते.
गोव्यातदेखील फाटाफूट :
मूळचा सेक्युलर विचारसरणीचं असलेलं राज्यात भाजपने अनेक वर्ष काम करून आपली सत्ता मिळवली आहे. ममता दीदींनी गोव्यासारख्या छोट्या राज्यात आपला पक्ष विस्तारत आहेत. गोव्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री फलेरियो यांना तृणमुल पक्षात घेऊन काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली आहे.
२०१४ साली अब की बार मोदी सरकार अशी हाक देऊन सर्वसामान्य जनतेत नरेंद्र मोदी नावाचे बीज प्रशांत किशोर यांनी रुजवले. नरेंद्र मोदी निवडणून देखील आले, मात्र त्यानंतर नरेंद्र मोदी आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि बहुदा त्यानंतरच ज्या नरेंद्र मोदींना आपण निवडणून दिले त्याच नरेंद्र मोदींना हरवण्याचा विडाच जणू प्रशांत किशोर यांनी उचलेला दिसून येतो.
ज्या पक्षाचे एकेकाळी बहुतांश राज्यात एकहाती सत्ता होती त्याच पक्षाची झालेली आजची अवस्था विदारक आहे, याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. काँग्रेसला येत्या लोकसभेत जर मुसंडी मारायची असेल तर त्यांनी पक्षाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.