Site icon InMarathi

जगातला असा पेशंट ज्याने स्वतःला कोणत्याही औषधाशिवाय HIV-AIDS मधून मुक्त केले!

Adam HIV Cured IM

Adam Castillejo

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एचआयव्ही विषाणू शोधून तीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. एड्स हा मानवामध्ये एचआयव्ही विषाणू संक्रमित झाल्यामुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, एड्सच्या आजारामुळे जगभरात ३२ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे.

आजही एड्स वरील उपचार हा ‘सावधानी बाळगणे’ हाच असल्याचे संगितले जाते. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच असतो. आपले मानवी शरीर हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. त्यातलाच एक चमत्कार म्हणजे आपल्या शरीरातील पेशी ज्या दोन प्रकारच्या आहेत. पांढर्‍या पेशी आणि लाल पेशी.

 

 

आपले शरीर या पेशींनी बनलेले असते. ज्या शरीरात रोगप्रतीकारक क्षमता विकसित करतात. यात गर्भजल पेशी किंवा स्टेम सेल्स या फारच महत्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की एड्स आणि स्टेम सेल्स यांचा काय संबंध आहे? तर मित्रांनो प्रत्यक्ष जारी संबंध नसला तरी काही प्रमाणात त्या एड्स च्या उपचारात मदतशील ठरल्या आहेत. कशा ? ते जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल ना? चला तर मग पाहूया यामागची गोष्ट

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मूळचा अमेरिकेला  टिमोथी ब्राऊन हा २००८ मध्ये एड्स मधून पुर्णपणे बरा झालेला जगातील पहिला व्यक्ति ठरला होता. जो ‘बर्लिन पेशंट’ या नावाने ओळखला जातो. त्याच्यानंतर आता लंडनचा एक पेशंट एड्समुक्त झाला आहे. ज्याचे नाव डॉक्टर किंवा संशोधकांनी जाहीर केलेले नाही. संशोधकांनी असा दावा केला आहे की ‘ स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ च्या माध्यमातून त्याला यशस्वीरीत्या एड्समुक्त करण्यात आले आहे.

 

 

२००३ मध्ये लंडन मधील या रूग्णाला आपण HIV पॉजिटिव असल्याचे कळले होते. पण त्याने २०१२ मध्ये आपला इलाज सुरू केला होता. त्याच दरम्यान त्याला Hodgkin lymphoma नावाचा कॅन्सर झाल्याचे डिटेक्ट झाले. २०१६ मध्ये स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट च्या माध्यमातून त्याचा कॅन्सरवर उपचार सुरू झाला.

त्या व्यक्तीच्या डॉक्टरांना एक असा स्टेम सेल डोनर मिळाला ज्याच्या शरीरातील जीन्सची रचना बदललेली होती. या रचनेला जिन म्युटेशन असे नाव आहे. ही गुणसुत्रामधील उत्क्रांती नैसर्गिकरित्या झाली होती आणि ती HIV विरोधात प्रतिकारक्षमता वाढवणारी होती. ही गोष्ट कळताच संशोधकांनी कॅन्सर सोबतच त्या पेशंटच्या HIV इन्फेक्षनवर देखील इलाज करायचे ठरवले. संशोधकांच्या मते अशा प्रकारची गुणसुत्रे मिळणे जवळजवळ अशक्यप्राय असते. उत्तर युरोप मधील फक्त १% लोकांमध्ये ही गुणसुत्रे आढळून आली.

 

 

याच स्टेम सेल ट्रान्सप्लांटमुले लंडन च्या त्या रुग्णाच्या शरीरातील गुणसुत्रामध्ये बदल होत गेले. ज्यामुळे त्या गुणसूत्रांच्या दात्याच्या शरीरासारखेच त्या रुग्णाच्या शरीरात HIV शी लढणारी पेशी यंत्रणा तयार झाली. त्यानंतर त्या रुग्णाने स्वेच्छेने एचआयव्ही साठीची औषधे घेणे बंद केले. त्या रुग्णामद्धे एचआयव्ही संक्रमण पुन्हा कार्यरत होते अथवा नाही हे तपासण्यासाठी ही औषधे बंद केली गेली होती.

आश्चर्याची आणि आव्हानात्मक गोष्ट ही की औषधे घेणे बंद केल्यानंतर १८ महीने उलटून गेल्यावरही त्या रुग्णामध्ये एचआयव्ही संक्रमण झालेले आढळले नाही. अमेरिकेच्या ‘नेचर’ या ऑनलाइन वैज्ञानिक मासिकात यावरील प्रबंध प्रसिद्ध झाला होता. दुसर्‍या एका केस मध्ये अर्जेंटीनाच्या एका महिलेला झालेले एचआयव्ही संक्रमण तिच्या स्वत:च्या शरीरातील इम्युन सिस्टिम ने नाहीसे केले होते.

 

तिच्या शरीरातील गुणसूत्रांच्या रचनेने हा चमत्कार केला होता. लंडनचा पेशंट, ज्याला संशोधकांनी ‘Esperanza patient’ हे नाव दिले आहे, तो आता HIV मुक्त झाला आहे. यात कळीचा प्रश्न हा देखील आहे की एचआयव्ही पॉजिटिव पेशंट खरेच बरे झाले आहेत का? हे तपासणे ही गरजेचे आहे असे मत अन्य काही संशोधकांनी मांडले आहे.

काहीही असले तरी स्टेम सेल ट्रान्सप्लांट जर खरच यशस्वी ठरणार असेल तर त्याबद्दलची जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. ज्यामुळे अनेक एचआयव्ही बाधित रुग्ण सुटकेचा श्वास घेवू शकतील. आणि अन्य दुर्मिळ आजारांवर देखील उपचार करता येतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version