Site icon InMarathi

या १० illogical गोष्टी पचवून तुमच्या घरीही ‘हम साथ साथ है’ आवडीने पाहिला जातो का?

hum sath sath hai film inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सूरज बडजात्यानं ‘मैने प्यार किया’मधून राजश्री प्रोडक्शनला नवसंजिवनी दिली. मात्र या संजीवनीचा डोस फारसा परिणामकारक नव्हता. अवघ्या दोन तीन चित्रपटांनंतर बडजात्यानी जो कौटुंबिक प्रेमाचा चिक्कट्टलोळ पाक बनवला होता त्यातून प्रेक्षक तडफडत कसेबसे जीव वाचवून पळत सुटले आणि नंतर त्यांनी राजश्रीच्या चित्रपटांकडे ढुंकून पाहिलं नाही. ‘हम साथ साथ है’ हा या पाकाचा उत्कलन बिंदू होता.

 

 

हिंदी चित्रपटसृष्टी जेंव्हा बच्चनच्या ॲन्ग्री यंग मॅन लाटेत ढिश्शुम ढिश्शुम खेळत होती तेव्हाही राजश्री प्रोडक्शन हातातली पाकाची वाटी खाली ठेवायला तयार नव्हती. अखेर लोकांना हा निरागस गोडवा सहन होईना आणि त्यांनी हे चित्रपट बघणं सोडलं.

एव्हाना बडजात्यांच्या कुटुंबातला सूरज हाताशी आला होता. नव्या पिढीचा हा गडी एक छानशी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांसमोर आला. लोकांनी मैने प्यार किया अक्षरश: डोक्यावर घेतला. राजश्रीची विझलेली भट्टी पुन्हा एकदा लाकडं सारून पेटविण्यात आली.

मोठाल्या कढया चढल्या आणि पुन्हा एकदा राजश्रीचा तो सुप्रसिध्द मज्जानू लाईफ़ चिकट्ट घट्ट प्रेमळ पाक खदखदू लागला. या पाकाचा सर्वोच्च बिंदू होता हम साथ साथ है! थिएटरमधे संदिग्ध यश मिळविलेला हा चित्रपट.

लोक साधारण विचार करत होते, की आता यांचे सिनेमे बघावेत की थांबावं? मात्र बडजात्यांनी हा सिनेमा वाहिन्यांना विकला आणि ढासळत्या भारतीय कुटुंब व्यवस्थेला सावरण्यासाठी प्रत्येक रविवारी एखादी वाहिनी नेमानं हा सिनेमा अनेक वर्षं लावत आहे.

 

या सिनेमाला रोस्ट करण्यासाठी बडजात्यांनीच अनेक कारणं दिलेली आहेत त्यामुळे लोक इतकी वर्षं हक्कानं त्याला बिनधास्त रोस्ट करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. रामायणाचं नवं व्हजर्न

रामायणाच्या श्रीराम-लक्ष्मण वनवासावर आणि रामालाच राज्य का? या प्लॉटवर या सिनेमाचा डोलारा उभा करण्यात आला आहे मात्र इथे रावण गायब असल्यानं क्लायमॅक्सचं युध्दच रंगत नाही आणि म्हणूनच रामाचं राज्य आलं याचा आनंदही होत नाही.

 

 

 

रामायणाच्या प्लॉटची बडजात्यांनी अगदीच कॉपी केली आहे.

२ कौटुंबिक हनिमून

सहकुटुंब सहपरिवार हनिमूनला जाण्याची घातक प्रथा बडजात्यांनी सुरू केली याबद्दल अखिल भारतीय नवविवाहीत संघटना त्यांना कधीच माफ़ करणार नाही.

 

 

बरं, कौटुंबिक हनिमुनही एकवेळ ठिक आहे पण हनिमूनला जाताना एबीसीडीईएफजी असं गाणं कोण गातं? कसा होणार त्या जोडप्याचा हनिमून? प्रेम, रोमान्स नावाच्या भावना आहेत की नाही? बडजात्यांचा सतत एकच भावना – मज्जानू लाईफ!

३. मामीचं पात्र कशासाठी 

यातलं हिमानी शिवपुरीचं पात्र नेमकं का घेतलंय हे सूरजला माहितच नसावं.

 

 

मागच्याच सिनेमातली अख्खी स्टारकास्ट पुढे घेताना चुकून त्याही आल्यासारखी झालेली आहे. फक्त गाण्यात दिसणार्‍या हिमानीलाही मैं कहां हू? हा प्रश्न पडला असेल.

४ डॉक्टर बहु

असाच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सुनबाई अर्थात डॉ. प्रिती ही डॉक्टर का आहे? कारण ती डॉक्टर असूनही तिचं काम एकही दिवस करताना दिसत नाही.

 

 

होणार्‍या सासरी लाजत मुरडत किचनमधेच चहापाणी बनवत बसायचं असेल तर ती डॉक्टर आहे हे तरी का दाखवावं नं?

५. स्त्री स्वातंत्र्याची ऐशीतैशी

बडजात्यांच्या नायिकांचं जगण्याचंच एकमेव ध्येय असतं, आदर्श सून बनणं! बस्स. जन्माला यायचं तेच कुरकुरीत भज्या तळण्यासाठी आणि बाबूजी, माजी यांचे पाय चेपण्यासाठी, रामचरित्र वाचून दाखविण्यासाठी, पहाटे पहाटे घरादाराला भक्तिगीतं ऐकवून उठविण्यासाठी. हा पडद्यावरचा एक मोठा आदर्श घोटाळा आहे.

 

 

स्त्रीयांना या पलिकडे विश्व असतं, करिअर असतं यांचा विसर पडलेला दिसतो. तरिही आपण या चित्रपट पाहतोच.

६. सावत्र आई- नेहमीचीच थिअरी

एक आई आपल्या दोन मुलांमध्ये भेदभाव करते आणि आपल्या बाळ्याचे लाड करत सावत्र मुलाला जाच करते हा हमखास हिट करणाऱ्या एकाच ट्विस्टवर चित्रपट फिरतो.

 

 

खरंतर चित्रपटाला वेगळी अशी कथा नाही, कारण रिमा लागू यांच्या एका (अर्थात अपेक्षित) निर्णयामुळे चित्रपटात काही काळ तणाव येतो, मात्र त्याचवेळी पुन्हा शेवट गोड होणार हा अलिखित नियमही आपल्याला आधीच ठाऊक असतो तरिही न थकता साडेतीन तास आपण चित्रपच बघतो.

७  त्या तिघींचं काय करायंच?

चित्रपटातील अनेक अनावश्यक पात्रांपैकी त्या तिघी अनेकांच्या डोक्यात जातात. तीन तिगाडा अर्थात रिमा लागु यांच्या तीन मैत्रिणी धड हसवतही नाहीत की रडवतही नाहीत.

 

 

विनाकारण गोंधळ घालणाऱ्या या मैत्रिणींना प्रेक्षक गेली अनेक वर्ष सहन करत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version