मेहबुबा मुफ्ती म्हणतात “कलम ३७० परत लावा आम्हाला गोडसेंच्या देशात रहायचं नाही”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०१९ साली दोन्ही सभागृहांनी एक मताने काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम रद्द केले आणि यावरून देशात एकच खळबळ माजली गेली होती. आज देशाला इतकी वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा काश्मीर सारखं राज्य धगधगत आहे. निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेल हे राज्य आज दहशतीच्या सावटाखाली आहे. या राज्याचे कलम ३७० हटवल्यानंतर या राज्याला भारतातील सर्व सामान्य राज्यांचा दर्जा देण्यात आला.
कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या मागण्या तिकडचे राजकारणी लोक सातत्याने करत असतात, काश्मीरच्या जनतेवर हा अन्याय आहे, अशी ओरड सातत्याने केली जात आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा कलम ३७० बद्दल वक्तव्य करून जुना वाद पुन्हा उकरून काढला आहे, नक्की काय म्हणाल्या आहेत, चला तर मग जाणून घेऊयात…
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मेहबुबा मुफ्ती राजकरणात आल्या, त्या स्वतः कायद्याच्या पदवीधर आहेत. पीपल डेमोक्रेटिक पार्टी या आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षाचे त्या प्रतिनिधित्व करतात. काश्मीरमधील पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचं मान देखील पटकवला आहे.
नुकतंच त्यांनी काश्मीरमधील एका सभेत कलम ३७० बद्दल पुन्हा वादग्रस्त विधान केली आहेत. सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, काश्मीर आणि तिकडच्या जनतेने आपलं नशीब आजमवण्यासाठी महात्मा गांधीसारख्या नेत्यांना पाठिंबा दिला होता, ज्यात आमच्यासाठी वेगळे संविधान, वेगळा ध्वज आणि कलम ३७० देण्यात आले होते.आम्ही गांधींच्या भारतात राहण्यासाठी तयार आहोत. गोडसेंच्या भारतात आम्ही राहू शकत नाही.
मेहबुबा इथवर थांबल्या नाहीत तर पुढे त्यांनी जनतेला आवहान केले की, आपल्या संविधानासाठी आणि विशेष दर्जाच्या राज्यासाठी आपण एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. तसेच काश्मीरच्या जनतेला सन्मान मिळाला पाहिजे. जर आमची प्रत्येक गोष्ट हिरावून घेणार असाल तर आम्ही देखील आमचा निर्णय मागे घेऊ. केंद्र सरकारने काश्मीरच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा विचार करावा आणि आमचे हक्क आम्हाला परत द्यावेत.
मेहबुबा मुफ्ती या केवळ एकमेव व्यक्ती नसून, काश्मीरमधील इतर राजकीय मंडळींनी सुद्धा याला विरोध केला आहे. कलम ३७० हटवाल्यानंतर अनेकवेळा त्यांनी याचा खुलेआम विरोध केला आहे. जेव्हा हे कलम हटवले जाणार होते, तेव्हा अनेक राजकीय मंडळींना राजकीय बंदिवासात ठेवले गेले होते.
–
- जेव्हा कमल हसन म्हणाले…”नथुराम गोडसे हाच स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू अतिरेकी!”
- “परदेशात गेल्यावर गर्वाने सांग, गांधींच्या नव्हे गोडसेंच्या भूमीतून आलोय…”
–
सरकारमध्ये असलेल्या भाजपने सुद्धा मेहबुबा मुफ्तीनवर दहशतवादाला खतपाणी घालत आहेत असे आरोप केले होते. मध्यन्तरी त्यांच्या पासपोर्टवरून सुद्धा वाद निर्माण झाले होते. पासपोर्ट मिळत नसल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.
आज कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती तज्ञांनाकडून सांगितली जात आहे तर दुसरीकडे देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणत होते हा देश कायम भगवा राहिला पाहिजे तो कधीच हिरवा होणार नाही, तर नुकतंच नाना पाटेकर म्हणाले हा देश इंद्रधनुष्याच्या रंगासारखा आहे.
देशाचा रंग कोणताही असला तरी आपण सगळ्यांनी मिळून तो सुजलाम सुफलाम कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. देशापुढील ज्या समस्या आहेत त्यांना सामोरे गेले पाहिजे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.