Site icon InMarathi

बिग बॉसचं घर नक्की कुणाच्या इशाऱ्यावर चालतंय? कमेंट करा

big boss inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक दिवस हा नवं आव्हान घेऊन येत आहे. सदस्यांसाठी खेळाचं नव रुप समोर येत असताना प्रेक्षकांनाही रोज नवे धक्के बसत आहेत.

गेल्या रविवारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिचे एलिमिनेशन हा प्रेक्षकांसाठी धक्काच ठरला. मात्र शो मस्ट गो ऑन म्हणत उरलेल्या सदस्यांनी सोमवारपासून अधिक जोमाने आपला खेळ सुरु ठेवला.

 

 

प्रत्येक सदस्य टॉप ५ मध्ये आपली जागा पटकवण्यासाठी उत्साहाने खेळत असला तरी घरातील दोन सदस्यांना ‘मास्टरमाईंड’ हा किताब प्रेक्षकांकडून दिला जात आहे.

बिग बॉसचा खेळ शक्तीपेक्षा युक्तीचा असल्याचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर वारंवार सांगतात. त्यांचा हा कानमंत्र २ सदस्यांंनी तंतोतंत पाळला असून हे २ दोन सदस्य खेळाची स्ट्रॅटजी ठरवणे, आपल्यासह टिममधील सदस्यांना सुरक्षित करणे, समोरील टिमला चीत करण्यासाठी हरत-हेची शक्कल लढवणे यात प्रामुख्याने सहभागी असतात.

कोण आहेत हे २ सदस्य? तुमच्यामते घरातील खरा मास्टरमाईंड कोण? वाचा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. डॉ उत्कर्ष शिंदे

पेशाने डॉक्टर असलेला, कविता-गाणी यांचा छंद असलेला बहुरंगी उत्कर्ष बिग बॉसच्या घरात आला आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावला. शिंदेशाही बाणा मिरवत आलेल्या उत्कर्षने खेळाची सुरुवात चांगली केली. मात्र त्यानंतर दुटप्पीपणा, आपल्या टिमकडे असलेला कल, अनेकदा त्याने केलेला भेदभाव यांमुळे प्रेक्षकांनी त्याला ट्रोल केले.

 

 

असं असलं तरी उत्कर्ष-जयमधील मैत्री, टिमसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी आणि मुख्यतः न चीडता शांतपणे लढवलेली शक्कल आणि प्रत्येक खेळात आपल्या मताप्रमाणे टिमला खेळायला भाग पाडण्याची त्याची वृत्ती यांमुळे त्याला मास्टरमाईंड म्हटलं जातं.

तुमच्यामते उत्कर्ष खरंच मास्टरमाईंड आहे का? कमेंटमध्ये नोंदवा.

२. विकास पाटील

मालिकांमधील हसरा चेहरा असलेला विकास घरात आला आणि प्रेक्षकांना आवडू लागला. काहीसा शांत वाटणारा विकास हल्ली मात्र रौद्ररुपातही दिसून येतो.

 

 

विशालशी असलेली मैत्री, खोडकर स्वभाव, कोणताही खेळ जिंकण्याची जिद्द यांमुळे प्रेक्षकांमध्ये तो चांगलाच पॉप्युलर आहे. उत्कर्षप्रमाणेच दुसऱ्या ग्रुपचा लीडर म्हणूनही विकासकडे पाहिले जाते.

आपल्या टिममधील भांडणं सोडवणारा, टिमच्या विचारांना दिशा देणारा, वयाने मोठा असल्याने प्रत्येक गोष्ट सामंजस्याने सोडवत टिम जिंकण्यासाठी प्लॅन करणारा विकास घराचा खरा मास्टरमाईंड आहे असंही अनेकांना वाटतं.

तुम्हाला या दोघांपैकी कोण लीडर वाटतो? कोण घराचा मास्टरमाईंड म्हणून अधिक शोभून दिसतो? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version