Site icon InMarathi

८०,००० ची “समुद्री फौज” असणारी वेश्या, जिच्या समोर सरकारने गुडघे टेकले होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महिला या कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात हे आता आपण सर्वांनीच मान्य केलं आहे, पण जहाजांवर सशस्त्र दरोडा टाकून एखाद्या जागेची संपत्ती चोरून आणणारी एखादी व्यक्ती महिला असू शकते याबद्दल आपण साशंक असू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चीन मध्ये १९व्या शतकात अशी एक महिला होऊन गेली आहे, जिने चक्क ८०,००० सैनिकांची फौज तयार केली होती आणि तिला पकडणं हे त्यावेळच्या पोलिसांना अशक्य झालं होतं.

दक्षिण चीन मधील ‘क्विंग डायनेस्टी’ या भागातील कॅन्टन शहरात ‘चिंग शिह’ नावाची एक महिला होऊन गेली आहे जिच्या नावावर हा गुन्हा नोंदवला गेला आहे.

 

चिंग शिह या महिलेचा पती चिंग -१ हा मोठा दरोडेखोर होता. आपल्या पतीच्या निधनानंतर या धाडसी महिलेने १८०० जहाजांवर आपला ताबा नोंदवला होता. चिंग शिह ही चीनच्या इतिहासात सर्वात जास्त दरोडे टाकणारी ‘पायरेट’ म्हणून ओळखली जाते.

चेंग १ हा रेड फ्लॅग फ्लिट या ‘पायरेट शिप्स’चा अजिंक्य सरदार होता. चिंग १ ने आपल्या कारकिर्दीत कित्येक दरोडेखोरांना एकत्र आणलं होतं.

चेंग १ ने १८०१ मध्ये २६ वर्षीय चिंग शिह हिच्या सोबत विवाह केला आणि त्यानंतर या दोघांनी एकत्र येऊन कित्येक दरोडे टाकले आणि १८८० पर्यंत त्यांच्या ‘रेड फ्लॅग फिट’ या समूहाने चीनच्या समुद्रावर आपली दहशत कायम ठेवली होती.

चिंग शिह ही लग्नापूर्वी वेश्या व्यवसाय करायची. आपल्या व्यवसायिक संबंधातून चिंग शिह ही विविध जहाजांची पूर्ण माहिती काढायची आणि मग हे दोघे मिळून दरोडे टाकायचे.

दरोडे टाकल्यावर उपलब्ध संपत्तीची मोजणीचं काम हे चिंग शिह करायची आणि चेंग १ हा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते जहाज लुटायचं काम करायचा.

 

 

पती पत्नी असलेल्या या दोन दरोडेखोरांमध्ये जहाजाच्या संपत्तीवरून नेहमीच वाद व्हायचे. चिंग शिह ही नेहमीच जहाजांच्या लूट मध्ये समान वाटा असावा याबद्दल आग्रही असायची.

चिंग शिह ही दरोड्यांची संख्या वाढवण्यात कायमच पुढाकार घ्यायची. तिच्या कामाची पद्धत बघून चिंग शिह ला ‘पायरसी फेडरेशन’ची प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. ‘महिला पायरेट लीडर’ ही त्यावेळची दुर्मिळ उपाधी ही चिंग शिहला मिळाली होती.

चिंग शिह आणि चेंग १ यांचा सुखी संसार हा केवळ ६ वर्षच टिकला. वयाच्या ४२ व्या वर्षी चेंग १ चं त्सुनामीच्या लाटेमुळे निधन झालं. काही इतिहासकारांनी चेंग १ चं निधन व्हिएतनाम मध्ये खून झाल्याने झालं अशी सुद्धा नोंद केली आहे. चिंग शिहने पतीच्या निधनानंतर काही आठवड्यातच पूर्ण सत्ता आपल्या हाती घेतली.

१८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या त्या काळात महिला एखाद्या जहाजावर दिसणं ही सुद्धा मोठी गोष्ट मानली जायची. दक्षिण चीन मध्ये तर अशी परिस्थिती होती की, एखाद्या जहाजावर महिलेला घेऊन जाणं म्हणजे अपशकुन मानलं जायचं.

 

 

काही जहाजांनी असे नियम केले होते की, महिलांना जहाजात प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत चिंग शिह या एकट्या महिलेने संपूर्ण चीन समुद्रावर प्रस्थापित केलेली आपली सत्ता ही त्यामुळेच विशेष मानली जाते.

१८०९ मध्ये चिंग शिहच्या सैन्याने रिचर्ड ग्लासपोल या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याला पकडले होते आणि वर्षभर त्याला ओलीस ठेवलं होतं.

रिचर्ड ग्लासपोल या अधिकाऱ्याची सुटका झाल्यानंतर त्याने चिंग शिहच्या जागेचं असं वर्णन केलं होतं की, “मला बंदी करून ठेवलेल्या जागेत साधारणपणे ८०,००० सैन्य होतं, ज्यामध्ये १००० लोक हे अजस्त्र होते आणि त्या सैन्यात काही रोबोट्सचा सुद्धा समावेश होता.”

कायदा तोडण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या चिंग शिहने महिला सुरक्षा हे आपलं प्रथम कर्तव्य म्हणून मान्य केलं होतं. आपल्या कारकिर्दीत तिने खूप कडक नियम केले होते. एखाद्या व्यक्तीने नियम न पाळल्यास त्या व्यक्तीला जागेवर गोळी मारण्याचं स्वातंत्र्य चिंग शिह ने स्वतःकडे ठेवलं होतं.

बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा ठरवून तिने समस्त महिला वर्गात आपण जहाजावर ‘सुरक्षित’ असल्याची भावना निर्माण केली होती.

 

 

जहाजावरील कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये जर अनैतिक संबंध असल्याचं सिद्ध झालं तर चिंग शिह त्या दोघांनाही मृतयदंड द्यायची. आपल्या पत्नीला धोका देणाऱ्या जहाजाच्या कॅप्टनला सुद्धा हीच शिक्षा दिली जायची.

पोर्तुगीज, क्विंग डायनेस्टी, ईस्ट इंडिया कंपनी यांच्यापैकी कोणीच रेड फ्लॅग फीट’ या चिंग शिहच्या साम्राज्याला कधीच हरवू शकलं नव्हतं. चिंग शिह ची कामाची पद्धत बघून १८१० मधील चीन सरकारने तिला गुन्हेगार ठरवण्यापेक्षा तिलाच सरकारमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला होता.

चीनच्या समुद्रावर राज्य करणाऱ्या या महिलेचा तिथून पुढे चीनच्या जमिनीवर राज्य करण्याचा काळ सुरू झाला होता. १८४४ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी चिंग शिहचं निधन झालं होतं. चिंग शिहच्या निधनानंतर तिने ठरवलेले नियम हे अबाधित ठेवण्यात आले होते.

‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ या सिनेमातील मिस्ट्रेस चिंग हे पात्र चिंग शिहच्या आयुष्यावर आहे असं चीनमधील इतिहास्कारांचं मत आहे.

चिंग शिह ही एक गुन्हेगार असली तरीही तिच्या महिला सुरक्षा आणि महिला स्व संरक्षणच्या धोरणाची जगाला आज २०० वर्षानंतर सुद्धा गरज आहे हे नक्की.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version