' सॅडफिशींग – स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष वेधण्यासाठी केला जाणारा हा प्रकार आहे काय? – InMarathi

सॅडफिशींग – स्वतःच्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष वेधण्यासाठी केला जाणारा हा प्रकार आहे काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सगळेच सध्या ऐकतोय की सोशल मीडियाचा अतिवापर हा घातक ठरत आहे. त्यात लाईक्स आणि व्हयूज या अंकांमध्ये तरुण पिढी अडकून पडत आहे. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला जास्त लाईक्स मिळाले तर अनेकांना असुरक्षित वाटायला लागते.

चांगले मित्र मैत्रीण असले तरी त्यांच्याबद्दल स्पर्धा निर्माण होते व याचे भयानक स्पर्धेत रूपांतर होते. मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळवण्यासाठी काही लोक सोशल मीडियावर भावनिक पोस्ट टाकतात.

या अशा भावनिक पोस्टला ‘सॅडफिशिंग’ म्हंटले जाते. लेखक रेबेका रीड यांनी २०१९ च्या सुरूवातीस हा शब्द वापरण्यास सुरुवात केली.

 

sad fishing inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऑनलाईन समुदायाकडून सहानुभूती किंवा लक्ष वेधण्यासाठी संवेदनशील, भावनिक वैयक्तिक ऑनलाइन पोस्ट करण्याची क्रिया अशी सॅडफिशिंगची व्याख्या आहे.

केंडल जेनर या अमेरीकन मॉडेलने तिच्या पिंपलबद्दलच्या अनुभवांबद्दल भावनिकरित्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती.

या २४ वर्षीय मॉडेलवर अनेकांनी “सॅडफिशिंग”चा आरोप लावला. कारण ही पोस्ट पिंपलवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्किनकेअर ब्रँडच्या उत्पादनासाठी करण्यात आली होती.

एका सर्वेक्षणातून असे कळत आहे की केवळ प्रौढच नाही, तर मुलेदेखील सोशल मीडियावर सॅडफिशिंगचा वापर करत आहेत. त्यापैकी, एचएमसी आणि डिजिटल अवेअरनेस यूकेच्या टेक कंट्रोलच्या वार्षिक अहवालानुसार, ११ ते १६ वयोगटातील त्रासलेली मुले ऑनलाइन भावनिक आधार शोधतात.

 

kids sadfishing inmararthi

 

हा ट्रेंड त्यांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो. एका मुलाखतीमध्ये, शाळकरी मुलाने असे म्हंटले केले की त्याने आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची भावनिक गोष्टी शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामचा वापर केला.

“माझ्या भावना ऑनलाइन शेअर केल्याने मला काहीवेळा वाईट वाटले आहे परंतु इतरांकडून मला मदत मिळाली,” असे तो मुलाखतीत म्हणाला.

एखाद्याच्या भावनिक सोशल मीडिया पोस्टला प्रतिसाद देण्यापूर्वी, पालक आणि जवळच्यांनी मुलाशी संभाषण करणे आवश्यक आहे. न्यू यॉर्कच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट लिंडसे गिलर यांनी सांगितले की, तुम्ही त्यांची पोस्ट पाहिली असून तुम्हांला त्यांची काळजी वाटत आहे असे त्यांना सांगा.

ऑनलाइन “सॅडफिशिंग” ही संकल्पना नवीन असल्यामुळे, सध्या या वर्तनांचे परीक्षण करणारे कोणतेही संशोधन करण्यात आले नाहीये. एखादी व्यक्ती इतरांचे लक्ष, सहानुभूती किंवा प्रमाणीकरण मिळविण्यासाठी प्रयत्न करते हे व्यक्तीच्या वर्तनातून कळते.

सोशल मीडियावरील फक्त पोस्ट पाहून ती पोस्ट टाकण्यामागील व्यक्तीची मानसिकता कळणे थोडे कठीण आहे. परंतु सॅडफिशिंग पोस्टमुळे उदासीनता किंवा चिंता यांसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील समस्या समोर येतात.

 

sad posts on social media inmarathi

सोशल मीडियावर सॅडफिशिंगसारख्या पोस्ट करणाऱ्या प्रत्येकाला दोषी ठरवले जाते. यात प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या संघर्षाबद्दल वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या असतील तर त्यांना प्रामुख्याने दोषी ठरवले जाते.

एका संशोधनात काही सेलिब्रेटींचे काही ट्विट्स वाचण्यात आले ज्यात भावनिक गोष्टी शेअर करण्यात आले होते आणि यातून ते सेलिब्रिटी त्यांच्या वर्तनासाठी दोषी आहेत का हे पाहण्यात आले आणि या अभ्यासातून असे आढळून आले की, ज्यांनी आपल्या पोस्टमधून नार्सिसिझम, सायकोपॅथी असे ‘डार्क ट्रायड’ दाखवले आहे त्यांना विशेषकरून लोकांकडून कमी सहानुभूती मिळाली आहे.

यातुन असे कळते की अशा पोस्ट करणाऱ्यांना सॅडफिशरचे उदाहरण म्हणून पाहण्यात येते. परंतु वास्तविक जगात लक्ष वेधून घेण्याचे वर्तन किंवा सॅडफिशिंगमुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक दृष्ट्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

उदाहरणार्थ, हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा उच्च स्तरावरील लक्ष वेधून घेण्यासाठी व्यक्तीला होणारा डिसऑर्डर असून हा प्रौढत्वाच्या सुरुवातीस होतो. या लोकांना एखाद्या गोष्टीच्या मंजुरीची फार गरज असते, ते त्यांच्या कौतुकासाठी वाट पाहतात.

परंतु चुकीच्या पद्धतीने सॅडफिशिंगचा आरोप असलेल्या व्यक्तीला स्वाभिमानाची कमतरता, चिंता आणि लाज वाटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. कुटुंब, मित्र, भागीदार किंवा सहकर्मचाऱ्यांपासून दूर जाऊ शकतात.

 

sad fishing 2 inmarathi

 

परंतु जे लोक जाणीवपूर्वक “सॅडफिशिंग करतात” त्यांना हे माहित असणे गरजेचे आहे की त्यांच्या कृतीमुळे इतरांवर परिणाम होऊ शकतो. गंभीर भावनिक पोस्ट केल्याने ती पोस्ट पाहणाऱ्याला चिंता, शारीरिक किंवा मानसिक ताण देखील येऊ शकतो.

सोशल मीडिया लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा इतर आरोग्य समस्यांबद्दल बोलण्यासाठी एक जागा असली तरी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या पोस्ट आनंद देण्यापेक्षा अधिक नुकसान करू शकतात.

सॅडफिशिंग हे लक्ष वेधण्यासाठीचे एक नवीन नाव आहे. जाणूनबुजून लक्ष वेधण्यामुळे पोस्ट लिहिणारी व्यक्ती आणि ती वाचणाऱ्या दोघांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?