Site icon InMarathi

पोट्टेहो आनंदाची बातमी- नागपूर होतंय भारतातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे शहर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ऑरेंज सिटी च्या नावाने प्रसिद्ध नागपूर शहराला एक मोठे यश मिळाले आहे. येत्या काळात नागपूर मध्ये खूप मोठ्या संख्येत विद्युत वाहने दिसतील. नागपूर देशातील पहिले असे शहर बनेल जिथे २०० विद्युत वाहने सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरली जातील. त्यामध्ये टॅक्सी, बस, ई-रिक्षा,ऑटोरिक्षा पण समाविष्ट आहेत. ह्या विद्युत वाहनांना चालवण्याची जबाबदारी ‘ओला’ कंपनीने आपल्या खांद्यावर घेतली आहे.


रस्ता परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच नागपूर विमानतळ कॉम्प्लेक्समध्ये ‘मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक व्हेइकल’ या प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी गडकरी म्हणाले की,

विद्युत वाहने आल्याने वाहतूक क्षेत्रात खूप बदल होतील. जर गाड्यांचे हे विद्युत मॉडेल यशस्वी झाले,तर याला देशातील दुसऱ्या भागांमध्ये पण आणले जाईल. ह्या योजनेला यशस्वी करण्यासाठी सरकार जी मदत लागेल ती करण्यास तयार आहे.या वाहनांमुळे फक्त वाहनांवर येणारा खर्च कमी नाही होणार तर गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला हि आळा घालू शकतो.

या कार्यक्रमात उपस्थित असलले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की,

आमचे सरकार विद्युत वाहनांचा वापर वाढवण्यासाठी परिवहनावर लागणाऱ्या करावर सूट देईल.

टॅक्सी अॅप सेवा ओलाने ह्यासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नागपूर मध्ये या विद्युत वाहनांसाठी ५० जागेवर चार्जिंग स्टेशन बनवले आहेत. ह्याशिवाय इथनॉल आणि दुसऱ्या इंधनाच्या विकल्पचा उपयोग करण्यासाठीही रिसर्च चालू आहे.

२०० विद्युत वाहनांपैकी १०० महिंद्राच्या विद्युत कार ई2ओ प्लस आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त टाटा, काइनेटिक, बीवाईडी आणि टीव्हीएस कंपनीच्या वाहनांना ही घेण्यात आले आहे.


ओलाचे सीईओ भाविज अग्रवाल यांनी या संदर्भात सांगितले की,

हे मॉडेल देशाच्या विकासासाठी खूप मदतीचे आहेत.आम्ही या मिशनला पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करू.

नागपूर मध्ये एक नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. ह्याआधी भारतातील कोणत्याही शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युत वाहनांचा प्रयोग केला गेला नाही आहे. नागपूर सारखेच इतर शहरांतही विद्युत वाहने वापरणे चालू झाले तर भारत लवकरच प्रदूषण मुक्त होईल.

सर्व इमेज स्रोत : indiatimes.com

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version