ISIS ची नवी खेळी : ख्रिसमसच्या मुहूर्तावर टिकटॉकच्या माध्यमातून करणार आत्मघाती हल्ला?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
टिकटॉक हा टाईमपास आपल्याकडे जरी बॅन झाला असला तरी बाहेरच्या देशात हे ऍप अजूनही सुरु आहे. अनेक कलाकार लोक आपापली वेगवेगळी कला व्हिडीओच्या स्वरूपात लोकांसमोर सादर करतात. काही लोक ओढूनताणून नसलेली कला सादर करतात आणि मीम्स म्हणून व्हायरल होतात.
टिकटॉकची लोकप्रियता अजूनही बाहेरच्या देशांत कमी झालेली नाही. आता तर दहशतवादी सुद्धा षडयंत्र रचण्यासाठी या तंत्रज्ञानाची, ऍप्लिकेशन्सची मदत घेत आहेत. असे समोर आले आहे की इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाकडून टिकटॉकचा वापर केला जात आहे.
या दहशतवादी गटाचा प्लॅन ख्रिसमसच्या उत्सवादरम्यान हल्ले करण्याचा आहे आणि ही योजना पूर्ण करण्यासाठी इस्लामिक स्टेट, तरुण आत्मघाती हल्लेखोरांची भरती करण्यासाठी टिकटॉकचा वापर करत आहे. एका तपासादरम्यान अशी माहिती समोर आली आहे की सोशल नेटवर्कवर अनेक अकाउंट्स आहेत जे ISIS चा प्रचार करतात, त्याबद्दल अनेक पोस्ट करतात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
या पोस्ट्समधून हे लोक गैर-मुस्लिमांविरुद्ध द्वेष भडकावतात आणि महत्वाची बाब म्हणजे हे अकाउंट्स मुले तसेच तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
काही दिवसांपूर्वी अश्याच एका अकाउंटद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या समर्थकांना ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भयंकर दहशतवादी हल्ले सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला विचित्र आवाज आहेत आणि ख्रिसमसचे वर्णन हे काफिरांचा (गैर-मुस्लिमांचा) आणि क्रुसेडर्सचा उत्सव म्हणून केले आहे. ह्या व्हिडिओत असेही म्हटले आहे की “काफिर हे अल्लाहवर विश्वास ठेवत नाहीत आणि ते पवित्र गोष्टींची चेष्टा करतात. ते सैतानाचे गुलाम आहेत.”
ख्रिसमस साजरा करण्यासाठी सजलेल्या बाजारपेठा, दुकाने आणि उत्सवाची दृश्ये दाखवल्यानंतर व्हिडिओचा निवेदक थंडपणे पुढे म्हणतो की, “हे अल्लाहच्या सैनिकांनो, ह्या काफिरांचे रक्त सांडण्यासाठी स्वतःला तयार करा.” हा निवेदक पुढे लोकांना सांगतो की “तुम्ही आत्मघाती हल्लेखोर (बॉम्बर) व्हा आणि ख्रिसमसचा उत्सव सुरु असताना काफ़िरांच्या वेशात गर्दीच्या ठिकाणी जा. जमावात प्रवेश करा.
स्वतःच्या कपड्यांमध्ये ,सामनामध्ये स्फोटके लपवून न्या आणि मग अचानकपणे स्फोट करून काफ़िरांच्या मनात, हृदयात दहशत निर्माण करा.”
या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आहेत. ISIS चे व्हिडिओ पसरवण्यासाठी वापरण्यात येणारे हे अकाउंट गेल्या अठरा महिन्यांपासून चालवले जात आहे.
तपासात टिकटॉकवर आयसिसचे अनेक अकाउंट्स आढळले. त्यापैकी एका अकाउंटवर बुरखा घातलेल्या एका महिलेचा एक व्हिडीओ आहे. या बुरखाधारी महिलेने जर्मनीमधील इमारती आणि संरचनेचा एक स्पष्ट पाळत ठेवणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडिओत ती महिला म्हणजे की “अल्लाह तुम्हाला स्वर्गात जागा देवो.” व्हिडीओचे बॅकग्राउंड म्युझिक ऐकून अंगावर काटा येतो कारण व्हिडीओची सुरुवात होते इलेक्ट्रॉनिक बिपिंगच्या आवाजाने आणि त्यानंतर पोलीस/ऍम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येतो. या बुरखाधारी महिलेच्या टिकटॉक अकाऊंटच्या बायोमध्ये तिने असे लिहिले आहे की “A lion fights for its prey until it has it and turns its enemies into its flock”.
दहशतवादाचा हा असला घातक प्रचार करण्यासाठी दहशतवादी गट आता टिकटॉकसारख्या ऍप्लिकेशनचा वापर करत आहेत. अगदी सहज ते तरुण लोकांच्या मनात शिरू बघत आहेत. याचा असाच अर्थ काढता येईल की आता आयसिससारखे दहशतवादी गट दहशतवादी गट युरोपमध्ये आत्मघाती हल्ले घडवून आणण्यासाठी तथाकथित “क्लीन स्किन” म्हणून छाप पाडणाऱ्या तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात आहेत.
लिव्हरपूलमध्ये कार बॉम्ब हल्ला झाल्यापासून युकेमध्ये दहशतवादाची समस्या ही गंभीर झालेली आहे. कोव्हीड लॉकडाऊनमध्ये असे असे व्हिडीओ बघून डोके फिरलेले अनेक माथेफिरु दहशतवादी हल्ले करण्यासाठी योग्य संधीची वाटच बघत आहेत.
काही दिवसांपूर्वी इटलीमधील मिलान येथे एका १९ वर्षीय महिलेला अटक झाली. ही महिला आंतरराष्ट्रीय दहशतवादात सहभागी असल्याच्या संशयावरून तिला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना तिच्या फोनमध्ये शिरच्छेदाचे व्हिडिओ आणि आयसिसच्या प्रचार शाखेने तयार केलेल्या इतर सामग्रीचा समावेश होता. तसेच ऑगस्टमध्ये काबुल विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला करून १८३ लोकांना मारलेल्या तरुणाचा फोटो देखील त्या ,महिलेच्या फोनमध्ये सापडला.
टिकटॉकवर जेव्हा लोकांनी हे कन्टेन्ट रिपोर्ट केले तेव्हा ते लगेच टिकटॉकवरून काढून टाकण्यात आले. टिकटॉकच्या प्रवक्त्याने एका विधानात असे स्पष्ट केले आहे की, “आम्ही लोकांना आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर धमकावण्यासाठी किंवा हिंसाचार भडकावण्यासाठी किंवा दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्याची परवानगी देत नाही. ह्याचे उल्लंघन करताना आढळलेली कोणतीही खाती ताबडतोब काढून टाकली जातील.”
- हिंदुत्व आणि ISIS ची तुलना : काँग्रेसच्या नेत्याने पुन्हा अकलेचे तारे तोडलेच!
- आयसिसच्या शेकडो दहशतवाद्यांना, एक-हाती जहन्नूम मध्ये धाडणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी!
–
आयसिसने २०१९ साली ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यात शेकडो लोकांनी आपला जीव गमावला होता. आठ ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. आताही आयसिस असल्याच हल्ल्याच्या प्रयत्नांत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपणही दिवसभर मोबाईलवर विविध ऍप्स बघत असतो. तुम्हालाही असे कुठलेही कन्टेन्ट आढळले तर ते लगेच रिपोर्ट करा. कारण रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे आपण कुठल्याही संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे होईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.