Site icon InMarathi

चविष्ट तरीही पौष्टिक: वजन घटवण्यासाठी हे ५ भारी ड्रिंक्स ट्राय कराच

shruti marathe inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वर्क फ्रॉम होममुळे किंवा सारखं घरात राहून वजन वाढतंय आणि ते कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत पण होत नाहीये. आपण अनेक जणांकडून वजनाच्या या तक्रारींबद्दल ऐकतोय.

तसं वजन कमी करण्यासाठी आहार आणि योग्य व्यायामच उपयोगी पडतो, परंतु दिवसभरातील आहारात काही बदल केल्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.  यात सकाळी उठल्यावर घेण्यात येणाऱ्या पेयाचा फार मोठा महत्वाचा भाग आहे.

काही साधी पेये तुमच्या आरोग्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. आपण काही पेय पाहूया जी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी व उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत करतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कॉफी –

 

 

कॉफी हे बहुतेक लोकांचे सकाळचे आवडते पेय आहे आणि अनेक जण त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात व यात काहीच गैर नाही.

वजन कमी करायचे असल्यास साखर नसलेली ब्लॅक कॉफी घ्यावी. एक कप कॉफीमध्ये साखर आणि दूध मिसळल्याने कॅलरीजची संख्या वाढू शकते ज्यामुळे तुमचे दैनंदिन आहारचक्र बिघडू शकते.

तुमचे रोजचे कॉफीचे सेवन २ कपपर्यंत मर्यादित ठेवा. अन्यथा तुम्हाला निद्रानाश, निर्जलीकरण यासारख्या कॅफीनच्या अतिसेवनाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल.

ग्रीन टी –

 

 

ग्रीन टी वजन कमी करण्याऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. वजन कमी करण्याचे ठरवल्यावर अनेकजण ग्रीन टी चा वापर करतात. अभ्यासातून असे समोर आले, की हे पेय चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देते आणि व्यायाम करताना तुमची कार्यक्षमता देखील वाढवते.

या पेयातील मुख्य कंपाऊंड कॅटेचिन आहे जे शरीरासाठी उपयुक्त ठरते. तुम्ही इतर प्रकारचे हर्बल टी जसे हिबिस्कस टी, ओलोंग चहा देखील घेऊ शकता.

पाणी –

 

सकाळी उठल्यावर शरीरासाठीचे उत्तम पेय म्हणजे पाणी. पाण्यासोबत आपण लिंबू , पुदीना किंवा दालचिनी घालू शकता आणि पेय बनवू शकता.

पुदिना, मसाले, लिंबू या सर्व खाद्यपदार्थांमध्ये चरबी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यात, तुम्हाला जास्त काळ तरतरीत ठेवण्यास मदत करू शकतात.

फळांचा रस –

 

 

एक ग्लास ताज्या फळांचा किंवा भाज्यांचा रस तुम्हाला चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे प्रदान करू शकतो. रसांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते चयापचय वाढवू शकतात.

भाज्या आणि फळे मिक्स करूनही तुम्ही रस तयार करू शकता. सकाळी एक ग्लास रस चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेस चालना देतो आणि पुढच्या जेवणापर्यंत पोट पूर्णपणे भरण्यास मदत करतो.

 

स्मूदी-

 

काही फळे आणि नट्स घालून बनवलेल्या एक ग्लास स्मूदीमध्ये तुमचा नाश्ता होऊ शकतो. स्मूदीमधील दूध, फळे आणि काजू या गोष्टी आरोग्यदायी असून याचा शरीराला फायदा होईल.

एक ग्लास स्मूदीमुळे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळतात. जर तुम्ही व्यायाम करत असाल, तर तुम्ही स्मूदीमध्ये प्रोटीन पावडर देखील घालू शकता.

आपण अनेकवेळा ऐकतो किंवा वाचतो, की सकाळचा योग्य नाश्ता हा शरीरासाठी फार महत्वाचा ठरतो. शरीराला दिवसभर ऊर्जा देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे वरील दिलेल्या गोष्टींचा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी विचार करू शकता.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version