Site icon InMarathi

छातीवरच्या केसांमुळे झाला राडा आणि सलमानने अनुरागला सिनेमातून हाकलून दिलं!

anurag kashyap featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विविध स्वभावांची माणसे एका ठिकाणी काम करत असतील तर मतभेद होणार हे ओघाने आलेच. प्रत्येकाचा स्वभाव काही दुसऱ्याशी जुळवून घेण्याचा नसतो आणि दोन भिन्न स्वभावांची माणसे एकत्र आली की अनेकदा वादाचे रूपांतर भांडणात होते.

आता हे भांडण अगदी सभ्य शब्दांतला वाद किंवा एकमेकांची कॉलर धरून मारामारी करण्यापर्यंत अगदी दुसऱ्याचा जीव घेण्याच्या टोकापर्यंत देखील जाऊ शकते.

याला चित्रपटसृष्टीही अपवाद नाही. चित्रपटसृष्टीत हजारो लाखो लोक काम करतात. त्यामुळे मोठमोठ्या लोकांचेदेखील एकमेकांशी असलेले वाद, मतभेद, भांडणे बऱ्याचदा बातम्यांतून, गॉसीपमधून आपल्याला कळत असतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असे अनेक किस्से ह्या उद्योगाशी संबंधित व्यक्तींबद्दल आपण वाचतो, ऐकतो. प्रत्येक चित्रपट तयार होतांना असे अनेक चांगले-वाईट किस्से घडतात.

सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. चित्रपटातील गाणी, सलमान खानचा अभिनय, एकूणच चित्रपटाची कथा लोकांना भावली. चित्रपट आल्यानंतर अनेक मुले सलमान खानची हेअरस्टाईल कॉपी करून “राधे भाई” बनून फिरत होते.

२००३ साली आलेला हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता आणि भूमिका चावलाचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील त्यावेळी मिळाले होते. सलमान खानच्या करियर मधला हा अत्यंत महत्वाचा चित्रपट समजला जातो.

 

 

बाला आणि जैनेंद्र जैन यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. बाला यांच्या एका मित्राच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. १९९९ साली आलेल्या सेथु ह्या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे.

सेथु या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याचे ठरल्यावर दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे राईट्स विकत घेतले होते. त्यानंतर रामगोपाल वर्माकडून बोनी कपूरनी हे राईट्स घेतले.

वेगळ्या धाटणीचे चित्रपट देण्यासाठी प्रसिद्ध असलेले अनुराग कश्यप सुरुवातीला या चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी अनुराग कश्यपकडे होती.

चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी कोण घेणार हे अजून ठरले नव्हते आणि गंमत म्हणजे तेव्हा या चित्रपटात मुख्य भूमिका म्हणजे राधेची भूमिका करण्यासाठी संजय कपूरला घेण्याचे ठरले होते. पण नंतर काही कारणांमुळे त्यात बदल झाला आणि संजय कपूरच्या जागी सलमान खानची वर्णी लागली.

जेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही. चित्रपटातला राधे भाई हा आग्रा – मथुरा या ठिकाणचा एक टिपिकल मुलगा होता.

 

अनुराग कश्यप स्वतः उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांना तिथली टिपिकल मुले कशी असतात हे चांगलेच माहित होते. सलमान खानमध्ये त्यांना तो आग्रा-मथुरेतला राधे दिसेना! पण सलमानला कोण रिप्लेस करेल? सलमानशी वैर घेणे म्हणजे चित्रपटसृष्टीतील स्थान आणि करियर दोन्ही संपुष्टात येणे असे आहे.

सलमान खान हा माचो मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात त्याला एक देशी मुलगा कसे दाखवायचे हा विचार करत असताना अनुराग कश्यपला एक कल्पना सुचली.

त्याने सलमानला सांगितले की या माचो लूक मध्ये तो युपीचा एक उनाड देसी मुलगा वाटणार नाही. आणि म्हणूनच त्याला छातीवरचे केस वाढवण्याचा सल्ला दिला जेणे करून तो एक राऊडी देसी भाई म्हणून शोभून दिसेल.

सलमानने शांतपणे अनुरागचे पूर्ण बोलणे ऐकून घेतले. पण त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्या दिवशी अनुराग कश्यपला चित्रपटाच्या निर्मात्याचा फोन आला. त्यांनी त्याला भेटायला बोलावले होते.

अनुराग जेव्हा निर्मात्यांना भेटण्यास गेला तेव्हा कुणीतरी त्यांच्या अंगावर एक काचेची बाटली फेकून मारली. ती बाटली निर्मात्यांनीच अनुरागला फेकून मारली होती आणि नंतर निर्माते त्याला ओरडून म्हणाले की -“साले तू सलमान को बाल उगाने को बोलेगा!”

 

 

यानंतर रातोरात अनुराग कश्यपला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि सतीश कौशिक यांना दिग्दर्शक म्हणून घेण्यात आले. तेव्हापासून आजवर सलमान खान आणि अनुराग कश्यप यांच्यात अजूनही ३६ चा आकडाच आहे.

एका इंटरव्ह्यूमध्ये अनुराग कश्यपने सांगितले होते की, “आम्ही दोघेही एकमेकांना आवडत नाही. मला नाही वाटत सलमान खानला मी आवडत असेन! त्याला कदाचित माझा चेहेरासुद्धा बघायला आवडत नसावा.”

म्हणूनच अनुरागने २०१२ साली “गँग्स ऑफ वासेपूर -२” चित्रपट प्रदर्शित केला आणि तो चांगला व्यवसाय करत होता त्याच्या पुढच्याच आठवड्यात सलमान खानने त्याचा “एक था टायगर” प्रदर्शित केला आणि मग अनुरागच्या चित्रपटावर त्याचा परिणाम झाला. असे अनेकदा झाले आहे असे अनुराग कश्यपचे म्हणणे आहे.

 

 

सलमान खानच्या करियरसाठी अत्यंत आवश्यक असलेला हिट चित्रपट “तेरे नाम” ने त्याच्या खात्यात दिला. आजही लोक सलमानच्या “राधे” वर मनापासून प्रेम करतात. “तेरे नाम” च्या आठवणी आजही ‘नाईंटीज किड्स’च्या मनात ताज्या आहेत.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version