Site icon InMarathi

अफगाणिस्तानी सिरीअल्समधून महिला गायब, तालिबान्यांचा नवा भयावह फतवा

taliban 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टिव्ही मालिकांमध्ये सर्वाधिक कोणत्या मालिकांना टिआरपी मिळतो असं विचारलं तर बहुतांश लोकं सासु-सुनेची भांडणं, नायक-नायिकांची फुललेली प्रेमकथा, खलनायिकांचा जाच करणारी सहनशील आदर्श सुन अशाच मालिकांची नावं घेतली जातील.

 

 

 

थोडक्यात काय तर कोणत्याही मालिकांमध्ये स्त्री पात्राची वेगवेगळी रुपचं प्रेक्षकांना आवडतात. मुळातच मालिकांचा महत्वाचा प्रेक्षकवर्ग हा स्त्रिया असल्याने स्त्रीविषयक मालिका, स्त्री पात्र रंगवणाऱ्या अभिनेत्री यांचीच चलती असते. मात्र तुम्हाला जर सांगितलं की येत्या काही दिवसात तुम्हाला सासु-सुनांशिवाय मालिका पहाव्या लागणार आहेत. तुमच्या टिव्हीवर ना सासु-सुनांची भांडणं रंगणार, ना देखण्या नायिका दिसणार, ना ड्रामा रंगवणाऱ्या खलनायिका, तर?…

असाच काहीसा धक्का अफगाणिस्तानातील प्रेक्षकांना लागला आहे. अर्थातच या सगळ्या नियमावलीमागे तालिबानी सरकार आहे हे उघडच आहे.

नेमकं काय घडलं?

वृत्तवाहिन्या आणि टिव्ही मालिका यांसाठी तालिबानी सरकारने धार्मिक गाई़डलाइन्स आखल्या आहेत. तालिबानी राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानात मोठे बदल होतील हे अपेक्षित होतं, मात्र तरिही टिव्ही मालिकांबाबत एवढा मोठा निर्णय घेतला जाईल हा धक्का पचवणं अफगाणिस्तानातील चित्रपटसृष्टीला शक्य नाही.

तालिबान्यांनी काढलेल्या फतव्यात नमुद केलं आहे की,कोणत्याही मालिकांमध्ये स्त्री पात्र दाखवले जाणार नाही. म्हणजेच अफगाणिस्तानात प्रसारित केल्या जाणाऱ्या कोणत्याही मालिका, चित्रपट यांमध्ये महिला पात्र रंगवली जाणार नाहीत. याचाच अर्थ अभिनेत्रींसाठी या क्षेत्राची दारं आता बंद करण्यात आली आहेत. ही बाब अभिनेत्रींसाठी जितकी धक्कादायक आहे, तितकीच प्रेक्षकांसाठीही कंटाळवाणी आहे.

यापुर्वीही तालिबान्यांनी स्त्रीयांसाठी जाचक नियम घातले होते, मात्र आता मनोरंजन क्षेत्राबाबत सरकारने घेतलेला हा निर्णय कलाकारांना अमान्य असला तरी त्यांच्यापुढे अन्य कोणताही पर्याय ठेवण्यात आलेला नाही.

 

 

या निर्णयामुळे प्रेक्षकांना केवळ पुरुष पात्र असलेल्या  मालिका पहाव्या लागणार आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


पुरुषांवरही करडी नजर

स्त्रीयांना पडद्यावर येण्यासाठी बंदी घालणाऱ्या सरकारने पुरुष कलाकारांवरही नियम घातले आहेत. यामध्ये पडद्यावर पुरुषांना कोणत्याही प्रकारचे अंगप्रदर्शन करता येणार नाही.

 

 

शर्ट काढलेला हिरो किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना नायक दाखवणे अशा सर्व सीन्सवर सरकारतर्फे बंदी घालण्यात येणार आहे.

तालिबान राजवट: अफगाणिस्तानात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा दर झालाय दुप्पट…

तालिबानी राज्यातील हे जाचक नियम करणार महिलांच्या आयुष्याचा नरक…

त्या चित्रपटांनाही बंदी

इस्लाम धर्माविरुद्ध कोणताही आशय दाखवणाऱ्या परदेशी चित्रपटांवर तालिबानी सरकारने बंदी घातली आहे. इस्लाम धर्म, मुल्य यांना विरोध करणारा किंवा कोणताही अपमानास्पद आशय दाखवला जाणार नसल्याची ताकीद सरकारने दिली आहे.

 

 

एवढचं नव्हे तर इतर कोणत्याही धर्माची बाजु घेणारे, इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्मांचा पुरस्कार करणारे चित्रपटही दाखवले जाणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे.

१९९६ चा काळ परतणार?

१९९६ साली तालिबान सरकारवे अफगाणिस्तानमध्ये अशाच प्रकारची जाचक नियमावली जाहीर केली होती. मुख्यत्वे महिलांसाठी हा अत्यंत कठीण काल होता. यामध्ये महिलांनी चोविस तास बुरख्यात राहणे, पुरुषाच्या आधाराशिवाय घराबाहेर न पडणे, घराबाहेर हाताचे किंवा पायाचे नखही प्रकाशात न येणे असे भयावह नियम घालण्यात आले होते.

 

 

हे नियम मोडल्यास स्त्रीयांना कठी शिक्षेस सामोरेे जावे लागत होते.

सध्या सरकारने धर्माचा प्रसार, स्त्रीयांवरील नियम, मनोरंजन क्षेत्रात केलेली घुसखोरी या कृत्यांमुळे अफगाणी लोकांना भुतकाळ आता पुन्हा परतणार का? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version