Site icon InMarathi

कोणत्या कपड्यात तुम्ही जाड दिसता? कपडे निवडताना या ७ गोष्टींचा विचार कराच

fashion hacks im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या काळात फराळ आणि गोडाधोडावर मनसोक्त ताव मारल्यानंतर आता तुम्हाला वाढलेल्या वजनाची चिंता सतावत असेल. एकदा वजन वाढलं, की ते कमी होईपर्यंत नाकी नऊ येतात.

नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने वजन कमी होईलच, परंतु काही खास टिप्स वापरून तुम्हाला फॅशनेबल राहता येईल. काही टीप्स आणि ट्रिक्स मुळे तुम्ही आहात त्यापेक्षा थोडं बारीक दिसू शकता किंवा तुमची जाडी सहज लक्षात न येता लपून जाऊ शकते.

तर पाहूया काही सोप्या ट्रिक्स-

 

 

१. गडद रंग –

फिकट, हलक्या शेडच्या रंगापेक्षा डार्क रंगामध्ये माणूस बारीक दिसतो. फिकट रंगाचा वापर केल्याने माणूस नेहमीपेक्षा जास्त जाड दिसू शकतो. त्यामुळे बारीक दिसायचं असेल, तर गडद रंगाचे कपडे जास्त वापरा.

===
===
२. काळे कपडे –

काळ्या रंगाचे कपडे वापरून बारीक दिसणं ही सगळ्यांत जुनी ट्रिक आहे. काळ्या कपड्यांमध्ये तुमची जास्तीची चरबी झाकली जाते, त्यामुळे तुम्ही स्लिम ट्रिम दिसता.

३. प्रिंट निवडताना-

प्रिंट पेक्षा प्लेन कपड्यांमध्ये सडपातळ दिसण्यास मदत होते. परंतु तुम्हाला प्रिंटचे कपडे घालायचे असतील, तर बारीक प्रिंट असलेले कपडे निवडा.

जाड आणि मोठ्या प्रिंटमुळे माणूस बेढब दिसू शकतो, तसेच कमी उंचीच्या जाड मुलींनी आडव्या लायनिंग पेक्षा उभ्या लाईन असलेली प्रिंट घातल्यास उंच आणि बारीक दिसण्यास मदत होते.

४. जीन्स घालताना –

हल्ली जीन्स ही प्रत्येकाच्या दैंनदिन आयुष्याचा भाग झाली आहे, परंतु जीन्स निवडताना लाईट रंगापेक्षा डार्क रंग निवडा. त्यामुळे मांड्या कमी जाड दिसतात, तसेच जाड मुलींनी लो वेस्ट जीन्स टाळा.
हाय वेस्ट जीन्समध्ये पोट आणि कंबरेवरची चरबी झाकली जाऊन स्लिम फिट फील येतो.
५. वन पीस घालताना –
ट्रेंडी वन पीस हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार आहे. जाड मुलींनी शक्यतो छान फ्रील असलेला वन पीस घालावा. तसेच पोटावर बारीक बेल्ट लावल्यास पोट बारीक दिसून मस्त लूक येतो.
६. शेपवेयरची खरेदी –

कधीकधी एका चांगल्या शेपवेयर मध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्य काळासाठी उपयोगी ठरू शकते. चांगल्या शेपवेयरमुळे जास्तीची, सैल झालेली चरबी आवळून जाऊन शरीराला योग्य तो उभार येतो.

फॉर्मल शर्ट, बॉडीफिट वनपीस, इव्हीनिंग् गाऊन असे कपडे घालायचे असतील, तर चांगल्या प्रतीचा शेपवेयर कधीही उपयुक्त आहे.

७. कपड्यांचा गळा –

आपण घालत असलेल्या कपड्यांचा गळा हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. व्ही आकाराच्या गळ्यामुळे तुम्ही कोणत्याही कपड्यात उंच आणि बारीक दिसायला मदत होते.

त्यामुळे ड्रेस किंवा टॉप निवडताना गोल, चौकोनी किंवा कोणत्याही वेगळ्या आकारापेक्षा व्ही नेक असलेल्या कपड्यांना पसंती द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version