Site icon InMarathi

Paytm च्या घसरलेल्या IPO वर त्यांच्याच कट्टर स्पर्धकाचे परखड मत वाचा

ashb inmarathi 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुलींच्या लाडक्या नायका ब्रँडने शेअरमार्केटमध्ये दमदार एंट्री घेतली, नायका सारखा महिलांच्या सौंदर्य प्रसादनाचा ब्रँड आज आपला IPO बाजारात आणून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं संपूर्ण श्रेय जात ते फाल्गुनी नायर यांना, त्या एका खाजगी बँकेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होत्या मात्र त्यांनी व्यवसायाची वाट धरली.

 

 

नायका जसा गाजावाजा झाला तसा पेटीएमचा आयपीओ आल्यावर झाला होता, मात्र शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे तो साफ आपटला, आता यावर अनेकांची मतांतरे आहेत. पेटीएमच्या आयपीओवर भारतपेचे  सीईओ अशनीर ग्रोव्हर यांनी मनीकन्ट्रोलला दिलेल्या मुलखतीमध्ये याबाबत आपली मतं मांडली आहेत, नक्की काय म्हणाले आहेत ते चला तर मग जाणून घेऊयात….

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

मुलाखतीच्या सुरवातीलाच अशनीर यांनी विजय शर्मा यांच्या फिनटेक फर्मच्या आयपीओवर चुकीची किंमत लावली गेली त्यामुळे एकूणच भारतातील आयपीओचे चक्र बिघडले आहे. असे स्पष्ट केले. 

पेटीएमच्या बाबतीत ते पुढे म्हणाले की स्टॉक एक्स्चेंजमध्ये पाउल ठेवताच फसवणूक झाल्याने पेटीएमच्या स्टॉकमध्ये सतत घसरण होत आहे. अलीकडचा इतिहास बघता ही सर्वात वाईट कामगिरी असून २१५० रूपे किंमतीवरून थेट १५६० रुपयांवर आली आहे म्हणजे तब्बल २७% घसरण झाली आहे.

 

 

पेटीएमप्रमाणे त्यांनी स्वतःच्या फर्ममधील गुंतवणुकीबद्दलची माहिती दिली आहे. नुकतंच त्यांच्या कंपनीला छोट्या बँकेचा परवाना मिळाला आहे. तसेच त्यांच्या कंपनीत ज्या चिनी लोकांनी गुंतवणूक केली होती त्यांना त्यांचे शेअर बाजारातील किंमतीवर परत केले आहेत.

त्यांच्या गुंतवणूकदारांना ते कायम सांगत असत की बाजाराचे दोन प्रकार असतील प्रि पेटीएम आणि पोस्ट पेटीएम कारण पोस्ट एटीएम हा साफ पडणार आहे आणि नेमके तेच घडले. याचे कारण देखील सोपे आहे बाजारात तुम्ही तुमच्या आयपीओची चुकीची किंमत ठरवली. तसेच चिनी लोकांचे शेअर परत करण्यासाठी भारतीय बाजार पेठेत व्यत्यय आणलात. असा थेट निशाणा त्यांनी पेटीएमवर लावला.

news.bitcoin.com

 

ग्रोव्हरच्या मते ज्यांची कंपनी वर्षाच्या सुरवातीला युनीकॉर्न बनली ( ज्या कंपनीने १ बिलियन मूल्यांपर्यंत पोहचली आहे) त्यांचा परिणाम येत्या काही दिवसात LIC सह इतर कंपन्यांच्या IPO वर होणार आहे. देशातील सर्वात मोठा आणि चर्चेत असलेला LIC चा IPO येत्या दोन आठवड्यात मार्केटमध्ये दाखल होणार आहे.

 

 

बाजारातील अस्थिरतेमुळे सगळ्या IPO चे पुनर्मूल्यांकन केले जाण्याची शक्यता आहे ज्यात कदाचित LIC चा समावेश असू शकतो, जर त्याची किंमत सुद्धा कमी झाली तर हे प्रकरण सरकारला डोईजड होईल. कारण त्यांचे लक्ष असलेले निर्गुंतवणूकिकरण पूर्ण होणार नाही.

पेटीएमच्या IPO ची किंमत घसरल्याने अनेकांची पदरी निराशा आली आहे, सध्याच्या बाजरातील अस्थिरतेमुळे आपण सगळ्यांनीच गुंतवणूक करताना तज्ञ लोकांचा सल्ला नक्की घ्यावा जेणेकरून आपण आपले नुकसान टाळू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version