“मी कंगनाला पाठिंबा दिलाय कारण…” असं विक्रम गोखले का म्हणतायेत?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
”१९४७ साली भारताला जे मिळालं ती भीक होती, खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं”, भारतीयांना संताप आणणारं कंगनाचं हे वक्तव्य!
अर्थात वक्तव्य आणि कृती यांतून कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी किंबहूना ठरवून कॉन्ट्रव्हर्सी निर्माण करण्याची आवड असणारी अभिनेत्री कंगना राणौत हिच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं जात असलं तरी देशाचे स्वातंत्र्य आणि त्यासाठी बलिदान दिलेल्या लाखो जवानांचा हा अपमान भारतीयांना सहन होणं शक्यच नव्हतं.
त्यात दोनच दिवशी सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराने ज्या देशाने सन्मानित केलं त्याच देशाच्या इतिहासाबद्दल, स्वातंत्र्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणं हा कोणता न्याय? असा प्रश्न उपस्थित झाला.
कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का? इथपासून ते थेट देशद्रोही कंगनाला मिळालेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्या इथपर्यंत अनेक टिकांचा भडीमार अद्याप सुरु असतानाच ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी या वादात उडी घेतली.
कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा देणाऱ्या विक्रम गोखलेंवरही टिका होत असताना त्यांनी ही भुमिका नेमकी का घेतली असावी असा प्रश्न प्रत्येकालाच पडला.
तुमच्यापैकीही अनेकांना हा प्रश्न पडला असेल. मात्र या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अखेर आज विक्रम गोखले माध्यमांसमोर आले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
काय म्हणाले विक्रम गोखले
पत्रकार परिषदेतत गोखले यांनी आपली भुमिका मांडली. ”माझ्यावर टिका होत असली तरी मी माझं मत बदलणार नाही” हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलं.
अभिनेत्री कंगना हिच्याशी माझा काहीही संबंध नाही. वैयक्तिक आयुष्यात आम्ही एकमेकांना ओळखत नाही किंवा भेटलेलो नाही. त्यामुळे तिला मी पाठिंबा दिला यात कोणताही हितसंबंध नाही. तिने जी वक्तव्य केली हे तिचे वैयक्तिक मत आहे, आणि मी जे मुद्दे मांडले तो माझा आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आहे.
मात्र कंगना बोलली ते मला गैर वाटले नाही यामागे कारण आहे. १८ मे २०१४ रोजी गार्डीयनमध्ये जे लिहिलं गेलं आहे तेच कंगना बोलली. त्याला मी दुजोरा दिला.
माझ्या मते २०१४ पासून जागितीक स्तरावर भारत सक्षमपणे उभा राहिला, त्यामुळे माझ्यासाठी तेंव्हापासून खरे स्वातंत्र्य मिळाले, आता या मुद्द्यांवर विनाकारण टिका होत आहे.
माझ्या बोलण्याचा विपर्यास
माझ्या भाषणातील सगळे मुद्दे न दाखवता केवळ काही मुद्दे प्रकाशित केले गेल्याने त्याचा विपर्यास झाला. अर्थात याचा अर्थ असा नाही की माझं मत वेगळे आहे.
कंगनाला दिलेले समर्थन हे केवळ तिचे वक्तव्य मला पटल्याने दिले गेले असून त्यामागे माझे विचार आहेत.
राजकीय पक्षाशी निगडीत नाही
मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही. गेल्या ३० वर्षात मला अनेकदा राजकीय पक्षांकडून विचारणा झाली. मात्र तो माझा प्रांत नसल्याने कधीही राजकीय पक्षाशी जवळीक वाढवली नाही.
त्यामुळे आत्ता केलेले विधान किंवा आत्ताची भूमिका ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा विरोधातील नसून हा केवळ माझा वैयक्तिक विचार आहे.
मी देशाचा किंवा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही किंवा तसा विचारही नाही असेही त्यांनी सांगितले.
सबब काहीही असली तरी कंगनाच्या विधानाचं समर्थन करणाऱ्या विक्रम गोखलेंवर अद्याप टिका सुरुच आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–