आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘योग्य वयात लग्न, त्यानंतर पुढच्याच वर्षी मुली आणि शरीर धडधाकट असेपर्यंत मुलांचं संगोपन’ भारतीयांसाठी असलेला हा अलिखित नियम! पुर्वजांनी सांगितलेली ही गोष्ट आतापर्यंत पाळली जात होती, मात्र प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर आता या नियमालाही छेद दिला जात आहे.
आधी शिक्षण, मग करिअर, दरम्यान प्रेम-लग्न यांचं हुकलेलं वय आणि कालांतराने वाढत्या वयात लग्न केल्यानंतर नैसर्गिक प्रसुतीत येणाऱ्या अडचणी यांवर आता सरोगसी, आयव्हीएफ असे सशक्त पर्याय उपलब्ध झाल्याने झाल्याने आता उतारवयातही मातृत्वाचे सुख मिळू शकते.
४६ वर्षांच्या प्रिती झिंटाच्या घरी याच सरोगसीव्दारे जुळ्या लेकरांचा जन्म झाला आहे. जय आणि जिया यांच्या आगमानाची बातमी देताना प्रिती झिंटाने सरोगसीचा पर्याय स्विकारल्याचे मान्य केले. मात्र वय वाढल्यानंतर मुल व्हावं या हट्टापायी सरोगसीचा पर्याय स्विकारणारी प्रिती ही एकमेव अभिनेत्री नाही.
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरात आज जी मुलं नांदतायत, त्यापैकी अनेकांचा जन्म सरोगसीव्दारे झाला आहे.
१. शाहरुख- गौरी खान
सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आर्यन आणि त्यानंतरची लेक सुहाना यांचा नैसर्गिकरित्या जन्म झाला, मात्र तरिही अनेक वर्षानंतर शाहरुख आणि गौरीला आणखी एक अपत्य असावे अशी इच्छा होती.
उतारवयात नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्याने त्यांनी सरोगसीचा पर्याय स्विकारला आणि २०१३ साली अब्राहम खान कुटुंबियांच्या घरी दाखल झाला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
२. शिल्पा शेट्टी – राज कुंद्रा
पॉर्न फिल्म प्रकरणी काही महिन्यांपुर्वी अटकेत असलेल्या राज कुंद्राची धाकटी लेकही सरोगसीव्दारे जन्माला आली आहे. मोठ्या मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री शिल्पा आणि राज यांनी सरोगसीद्वारे लेक समिशाला गेल्या वर्षीच घरी आणले.
त्यांनी सरोगसीचा पर्याय स्विकारल्याचे खुलेआमपणे सांगितले होते.
३. आमीर खान- किरण राव
परफेक्शनीस्ट आमीरच्या मुलाचा अर्थात आझादचा जन्मही आयव्हिएफ झाला आहे. किरण रावने ही बाब माध्यमांना सांगितली होती.
एवढचं नव्हे तर आमीर खान स्वतः दाम्पत्यांना सरोगसी, आयव्हीएफ यांची माहिती देत या पद्धतींबाबत जागृकता निर्माण करतात.
४. सोहेल – सीमा खान
पहिला मुलगा निर्वाण याच्या जन्मानंतर काही वर्षांनीअभिनेता सोहेल खानने दुसऱ्या अपत्यासाठी प्रयत्न केले. मात्र वैद्यकीय चाचण्यांनंतरही त्यांना नैसर्गिकरित्या मुल न झाल्याने त्यांनी २०११ साली सरोगसीची मदत घेतली. त्यानंतर योहानचा खानचा जन्म झाला.
याच दाम्पत्याच्या सल्ल्यानुसार गौरी आणि शाहरुखनेही पुढील वर्षी सरोगसीचा पर्याय स्विकारला होता.
५. फराह खान
सरोगसीव्दारे ४६ व्या वर्षी कोरिओग्राफर फराह खानच्या घरी तीन मुलांचा जन्म झाला.
”ज्यांना नैसर्गिक मातृत्व मिळत नाही, त्यांच्यासाठी हा पर्याय किती दिलासादायक आहे” याबद्दल सांगताना तिने आपला अनुभव अनेकदा मांडला आहे.
६. तुषार कपूर
एकल पालकत्व स्विकारणाऱ्या तुषार कपूरनेही सरोगचीचा पर्याय स्विकारत २०१६ साली लक्ष्य या आपल्या मुलाला जन्म दिला.
तुषार अद्याप अविवाहित असून मुलाच्या जन्मानंतर करिअरपासून दूर राहत मुलासोबत तो जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो.
७. करण जोहर
तुषार प्रमाणे करण जोहरनेही एकल पालकत्व स्विकारले आहे. सरोगसीव्दारे यश आणि जुही या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर त्याने ‘पालक’ हा नवा प्रवास सुरु केला.
आई, दोन मुलं यांच्यासह राहताना पालक ही भुमिका एन्जॉय करत असल्याचे तो अनेकदा सांगतो.
८. एकता कपूर
भाऊ तुषारच्या पावलावर पाऊल टाकत दिग्दर्शिका, निर्माती एकता कपूरनेही सिंगल मदर होणं पसंत केलं आहे.
सरोगसीव्दारे तिने २०१९ साली रवी या मुलाला जन्म दिला.
९. सनी लिऑनी – डॅनिअल
पॉर्न एक्ट्रेस आणि आता बॉलिवूडमध्ये स्थिरावणारी अभिनेत्री सनीनेही सरोगसीचा पर्याय स्विकारत जुळ्या मुलांना कुटुंबात सहभागी करून घेतले. एवढचं नव्हे तर त्यानंतर तिने एका भारतीय वंशाच्या मुलीला कायदेशीररित्या दत्तक घेत ‘निशा’ असे नावही दिले.
हे दाम्पत्य आता तीन मुलांसोबत धमाल करण्याचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशळ मिडीयावर शेअर करत असतं.
१०. श्रेयस तळपदे
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही चमक दाखवणारा अभिनेता श्रेयस तळपदे यानेही २०१८ साली सरोगसीचा पर्याय स्विकारला.
लग्नाला १४ वर्ष उलटल्यानंतर या दाम्पत्याने सगोरसीव्दारे ‘आद्या’ या लेकीला जन्म दिला.
सेलिब्रिटींकडे असलेला पैसा, प्रसिद्धी यांच्या बळावर अनेकजण प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत प्रसुतीसाठी अशा पर्यायांची निवड करतात. मात्र सर्वसामान्यांमध्ये आजही या पर्यायांबद्दल तितकीशी जागृकता झालेली दिसत नाही.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.