' आता अमेरिकेत सुद्धा प्रचंड मागणी असलेल्या पनीरचा रंजक इतिहास.. – InMarathi

आता अमेरिकेत सुद्धा प्रचंड मागणी असलेल्या पनीरचा रंजक इतिहास..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चवीने खाणार त्याला शेफ देणार’ असे म्हणणे काही चूक नाही कारण शेफच्या चुकीतून देखील अनेक उत्तम आणि स्वादिष्ट पदार्थांचा जन्म झाला आहे. सर्वांचे आवडते ‘श्रीखंड’ हा ही असाच अपघाताने सापडलेला पदार्थ. असाच अजून एक पदार्थ आहे जो सर्व आबालवृद्धांच्या खास पसंतीचा आहे.

भारतामध्ये तर फोटो काढताना ‘से चीज’ म्हणायच्या ऐवजी त्या पदार्थाचे नाव घेवून तोंडभर हसून सुंदर फोटो काढला जातो. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल तो पदार्थ कोणता आहे…तो आहे, टिक्का मसाला, बटर मसाला या डिशना चार चांद लावणारा तुमचा आमचा पनीर!

 

paneer-tikka-masala-inmarathi

 

 

 

भारतातल्या पनीरच गारुढ आता अमेरिकेत सुद्धा जाऊन पोहचले आहे. पनीरमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ते आता अमेरिकन नागरिकांच्या पसंतीस पडत चालले आहे. २०१९ च्या अहवालानुसार पनीरची मार्केट व्हॅल्यू ९.५ बिलियन इतकी होती. अनेकांच्या डाएटमध्ये पनीरचा समावेश झाला आहे.

न्यू यॉर्क पासून ते अगदी कॅनडापर्यंत जितके डेअरी उत्पादक आहेत त्यांचे हेच म्हणणे आहे की पनीरला आता मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तर अशा या पनीरचा उगम कसा झाला जाणून घेऊयात...

पनीरचा शोध कधी आणि कुठे लागला यात आजही जरी एकवाक्यता नसली तरी त्याची चव आजही सर्वांना भुरळ पडते. मुख्य म्हणजे प्रत्येक घरामध्ये कमी अधिक प्रमाणात पनीर वापरला जातोच. बाजारात सुपर मार्केट किंवा डेअरीमध्ये पनीर विकत मिळत असला तरी घरी बनवले जाणारे पनीरही तितकेच स्वादिष्ट असते. मटार सोबत, वेगवेगळ्या भाज्यांमध्ये, टिक्का करून पनीर खाल्ले जाते. तुम्हाला या पौष्टिक पनीरची कथा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

असे म्हणाले जाते की भारताच्या बंगाल प्रांतात १७ व्या शतकामध्ये पनीरचा शोध लागला. त्या काळात बंगाल प्रांतावर पोर्तुगीजांचे राज्य होते. दुधावर सायट्रीक अॅसिडची प्रक्रिया करुन पनीर तयार करण्याचा शोध पोर्तुगीजांनी लावला. त्यानंतर बंगालमध्ये दूधावर प्रक्रिया करून पनीर बनवण्यास सुरुवात झाली. पण पनीर हा शब्द आधी प्रचलित नव्हता. ‘छेना’ या नावाने पनीर ओळखले जात होते.

 

portugeese inmarathi

 

पनीर हा ‘पर्शियन’ शब्द आहे. हाच शब्द नंतर प्रचलित झाला आणि आता याच नावाने हा पदार्थ ओळखला जातो. पनीरला इंग्रजीमध्ये ‘चीझ’ म्हणूनच ओळखले जात होते. पण नंतर त्याला ‘कॉटेज चीझ’ अशी ओळख मिळाली. वेगवेगळ्या देशांमध्ये पनीर खाल्ले जाते. त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी ‘पनीर’ हा सर्वसाधारण शब्द यासाठी वापरला जातो.

 

cheese inmarathi

 

दूध उकळताना त्यात लिंबू पिळून किंवा सायट्रीक अॅसिड घातले जाते. लिंबू पिळल्यानंतर दूधाचे दह्यात रूपांतर होणे सुरू होते. हे दही मलमलच्या पातळ कपड्यामध्ये टाकून त्यातील पाणी काढून टाकले जाते. त्यातील आंबटपणा घालवण्यासठी ते छान धुतले जाते आणि मग एकत्र करुन ते सेट केले जाते.

 

paneer inmarathi

पनीरचे तुकडे करून मग ते भाजीत वापरले जाते. पनीर मधील न्युट्रीशनचा विचार करता त्याचा वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये उपयोग केला जातो. चटपटीत भाज्यांपासून ते मिठाईपर्यंत पनीरचा वापर केला जातो. मिठाई बनवताना पनीर छान मळून त्यात साखर घातली जाते. त्यानंतर त्याची मिठाई बनवली जाते. बंगाली मिठाईमध्ये पनीरचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. रसगुल्ला ही पनीरपासून बनवली जाणारी प्रसिद्ध मिठाई आहे.

पनीर हा उच्च प्रथिनयुक्त आहार आहे. त्यामुळे नाश्त्यात पनीर खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा जाणवेल, जास्त वेळ भूक लागत नाही, कारण ते पचायला खूप वेळ लागतो.पनीरमध्ये आढळणारे लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे खनिजे शरीराचे पोषण करतातच. सोबत शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल पातळी कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

 

panner inmarathi 1

 

बर्‍याच आहार तज्ञांच्या मते पनीरमधे व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. डायबेटिक रुग्णांसाठी तर हा सर्वोत्तम आहार आहे. यामध्ये असलेले प्रोटीन, फॉस्फरस, फोलेट यांसारखे पोषक घटक गर्भवती महिला आणि बाळाचे आरोग्य चांगले ठेवतात.

चीझ सारखे पनीर गरम पदार्थांमध्ये विरघळत नसल्याने वेगवेगळ्या ग्रेव्ही तसेच करींमध्ये पनीरचा सढळ हाताने वापर होतो. उत्तर भारतात  पनीर आणि त्याच्यापासून बनवले जाणारे पनीर पराठा, पकोडा, टिक्का हे लोकप्रिय आहेत. केवळ चव च नाही तर आरोग्यासाठीची उपयुक्तता पनीरला ओव्हर रेटिंग प्रदान करतात.

 

pannner inmarathi

 

१७ व्या शतकात पनीरचा शोध लागला असला तरी असे म्हणतात की,आपल्या पुराणात पनीरचा उल्लेख करण्यात आला आहे. दुधापासून तयार होणाऱ्या या पदार्थाचा शोध हा भारताने लावला असे यातून सिद्ध होत असले तरी यावर अनेक संशोधकांनी आक्षेप घेतला.

त्यांनी केलेल्या शोधानुसार भारतात जरी पनीरचा शोध लागला असला तरी त्याला पनीर रुपात वापरण्याचा शोध भारताचा नाही असे अनेकांनी म्हटले आहे. काही असले तरी पनीरने आपल्या अनेक भारतीय पदार्थांची शोभा नक्कीच वाढवली आहे. चला तर मग घरी पनीर पासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेवू आणि म्हणू…’से पनीर’!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?