Site icon InMarathi

जगाचा नकाशा बनवतात तरी कसा? जाणून घ्या पहिल्यावाहिल्या नकाशाबद्दल

map inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शाळेत पाचवीपासून भूगोल हा विषय अभ्यासात सामील झाला. तेव्हापासूनच नकाशा हा शब्द कानी पडू लागला.

भूगोल ह्या विषयाच्या माध्यमातून अनेक देशांचे, ठिकाणांचे, नदी-पर्वतांचे नकाशे समजू लागले. त्यातून हे जग समजू लागलं, ह्या जगाची भौगोलिक स्थिती समजू लागली. ह्यातूनच भारत हा जगाच्या पाठीवर दक्षिण आशियात असल्याचे समजले.

जगात सात खंड आहेत हेही ह्या भूगोलानेच शिकवले. पृथ्वीतलावर किती प्रमाणात पाणी आहे आणि किती जमीन, कश्याप्रकारे आपण चारी बाजूने समुद्राने वेढलेलं आहोत हेही ह्या भूगोलातूनच शिकायला मिळाले.

खऱ्या अर्थाने भूगोलामुळेच आपण आपल्या देशाच्या अधिक जवळ येऊ शकलो, ह्या देशाची भव्यता समजू शकलो.

जगाच्या पाठीवर आपण कुठे उभे आहोत हे ह्या भूगोलाने शिकवले आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे ते नकाशे. ज्यांच्या आधारे आपण हे सर्व समजावून घेऊ शकलो.

 

conspiraciones1040.blogspot.com

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता आपल्या शैक्षणिक जीवनात तसेच आपल्या आयुष्यातही एवढी महत्वाची भूमिका बजावणारे ह्या नकाशाची निर्मिती नेमकी कशी झाली ह्याचा कधी तुम्ही विचार केला का?

म्हणजे जगातील पहिला नकाशा कधी तयार करण्यात आला असेल? तो कुणी तयार केला असेल? आणि कसा कसा तयार केला असेल?

कारण त्यावेळी आजसारख्या आधुनिक गोष्टी नव्हत्या, नाही तेवढी साधनं होती. मग तरीदेखील कशी ह्या नकाश्याची निर्मिती करण्यात आली असावी? तर आज आम्ही आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहोत.

जर तुम्हाला नकाशांमध्ये रुची असेल, किंवा तुम्ही cartography म्हणजेच नकाशा बनविणे ह्यामध्ये आपलं करिअर बनवू पाहत असाल, तुम्हाला नकाश्यांची माहिती गोळा करायला, नकाश्यांचे वाचन करायला आवडत असेल तर तुम्हाला नकाशांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.

हे नकाशे कसे तयार केले जातात, त्यासाठी कुठली माहिती हवी असते. तसेच सर्वात आधी जगाचा नकाशा कुणी व कसा तयार केला असेल वगैरे…

प्राचीन काळी हे नकाशे रंगद्रव्यांच्या माध्यमातून दगडांवर किंवा भिंतींवर रंगवलेले असायचे.

 

quora.com

 

सर्वात प्राचीन नकाशा आजही आपल्याला एका दगडावर कोरलेला आढळून येतो, ह्याला इमागो मुंडी म्हणतात ही ६०० इसवीसनची आहे.

सर्वात प्राचीन ज्ञात नकाशा जो त्या वेळी ओळखले जाणारे जग दाखवतो. हा प्राचीन ग्रीसमधील एनीमॅक्सटरने बनवला होता. इमागो मुंडीमध्ये देखील तसच काहीसं दर्शविण्यात आलं आहे. ह्यावरून जग दर्शविले गेले ग्रीक लोक मानतात.

जगाला २० व्या शतकापर्यंत पूर्णतः नकाशात उतरविण्यात आलेले नाही. हे गेल्या शतकाच्या सुरवातीपासून सुरु झाले. ह्यावरून हे दिसून येते, की आधी लोकांसाठी जगाचे काय महत्व होते आणि त्यात नकाशांची काय भूमिका होती.

त्यामुळे आत्ताचे नकाशे आणि तेव्हाचे नकाशे ह्यांच्या गुणवत्तेत खूप फरक होता.

 

nationalgeographic.org

 

जगातील पहिला पूर्ण नकाशा हा हाताने तयार करण्यात येत होता. आणि त्यासाठी parchmentpaper म्हणजेच चर्मपत्र कागदाचा वापर केला होता.

नेहमी एकसारखा नकाशा तयार करणे हे खरंच खूप कठीण काम आहे. एकावेळी एक नकाशा बनविण्यासाठी जेवढी मेहनत आणि जेवढा वेळ लागतो त्यावरून हेच दिसून येते की नेहमी एकसारखा नकाशा बनविणे तेव्हा शक्य नव्हते.

त्यानंतर वेळेसोबतच नकाशा बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सामुग्रीत बदल झाला, टेक्नोलॉजी बदलल्याने हे काम सोपं झालं. ह्यामुळे नकाशा तयार करणाऱ्यांचे काम जरा सोपे झाले.

जसे, की चुंबकीय कंपासचा शोध लागल्याने नकाश्याच्या गुणवत्तेत भर पडला तसेच प्रिंटींग प्रेसमुळे एकावेळी एकसारखे अनेक नकाशे तयार करणे सोपे झाले.

आता जर एक व्यवस्थित नकाशा तयार केला तर तसेच आणखी नकाशे तयार करणे सोयीचे झाले.

आज तर जगाने खूप प्रगती केली आहे. आजच्या आधुनिक युगात नकाशे हे हाताने नाही तर कॉम्पुटरच्या मदतीने तयार व्हायला लागली आहेत. त्यासाठी खास अशा मॅपिंग सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

सध्याचे नकाशे बनविण्यासाठी गुगल स्ट्रीट व्ह्यू मॅपचा वापर केला जातो. ज्यामुळे तुम्ही नकाश्यावर एका ठिकाणी पॉइंटर ठेवून तिथली भौगोलिक स्थिती अनुभवू शकता, जसेकाही तुम्ही खरंच तिथे उभे आहात.

हे विस्तीर्ण नकाशे आजचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केले जातात.

 

street360.net

जे चित्र तुम्हाला ह्या Google Street View map च्या सहाय्याने बघायला मिळतात ते कॅमेऱ्याच्या सहाय्याने काही विशिष्ट कार्सनी जागोजागी जाऊन घेतलेले आहेत.

ह्यासाठी त्या कार्सवर ९ कॅमेरे लावण्यात आले होते, ज्यामुळे ते ३६० डिग्रीचे पूर्ण वर्तुळ चित्र घेऊ शकतील.

त्यानंतर ह्या सर्व चित्रांना एकत्र करून एक अखंड लोकेशन तयार करण्यात येते. त्यामुळे तुम्ही घरबसल्या जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाचा फेरफटका मारून येऊ शकता.

आज कुठेही जायचं म्हटलं, तर आपण ह्या नकाशांचा आधार घेतो. अशाप्रकारे ह्या नकाशांनी आज आपल्या जीवनात एक अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त केले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version