' प्रदूषणाचा भस्मासुर – वॉटर फिल्टर नाही तर एअर फिल्टरची गरज वाढत चालली आहे… – InMarathi

प्रदूषणाचा भस्मासुर – वॉटर फिल्टर नाही तर एअर फिल्टरची गरज वाढत चालली आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दिल्लीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा समोर येतोच. मग हरियाणा पंजाब मधल्या शेतकऱ्यांच्या शेती जाळण्याच्या प्रक्रियेमुळे किंवा दिवाळी मधल्या फटाक्यांमुळे हे प्रदूषण वाढते अशी कारणं समोर येतात. यावर्षीदेखील दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण झाले आहे. हवेचा स्तर खराब झाल्यामुळे लोक घरात एअर फिल्टर घेत आहेत.

दिल्लीत प्रदूषणामुळे सरकारने काही कठोर नियम घेतले आहेत. एक आठवड्यासाठी शाळांना सुट्टी देण्यात आली असून, बांधकाम क्षेत्रातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना तूर्तास घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या काही नियमांमुळे प्रदूषण आणि हवेचा दूषित स्तर कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

 

pollution inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही लोकांनी एअर फिल्टर घेतले आणि त्यातून कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे. दिल्ली आणि उत्तर भारतात या एअर फिल्टरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

युरेका फोर्ब्सच्या सीइओ मारझीन श्रॉफ यांनी असे सांगितले की आमचे नवीन उत्पादन लोकांना पसंत पडत असून देशातल्या अनेक घरांना याचा फायदा होत आहे. यासोबत ते असेही म्हणाले की एका वर्षात त्यांच्या कंपनीची विक्री ३० टक्के ने वाढली आहे.

 

share market
patrika

 

केंट आरओचे चेअरमन महेश गुप्ताही म्हणाले की गेल्या वर्षभरात आमचा विक्रीचा दर तेजीने वाढला. तोच दर यावर्षीही तसेच राहील. ते पुढे असेही म्हणाले की येत्या काही काळात एअर फिल्टरची मागणी वाढणार आहे. कारण ग्राहकांची स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देण्याच्या बाबतीतली जागरूकता वाढली असून ते घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी एअर फिल्टरचा वापर करत आहेत.

 

kent inmarathi

 

एअर फिल्टरचा वापर हा फक्त दिल्ली पुरताच मर्यादित नसून तो चंदिगढ, लुधियाना, हरियाणा येथे हि केला जातो. एअर फिल्टरची विक्री प्रामुख्याने प्रदूषण वाढल्यावर हवेचा स्तर खराब झाल्यावरच होते.

मीडियामध्ये ज्या पद्धतीने दाखवले जाते कि हवा खराब झाली आहे. धोक्याची पातळी गाठली असून आपली तब्येत सांभाळावी. या बातम्यांनी लोकांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यातूनच विक्री वाढते.

 

chandi inmarathi

 

श्रॉफ म्हणाले की सध्या ग्राहक नवनवीन तांत्रिक गोष्टींच्या आधारे एअर फिल्टरची निवड करत आहेत. कोणती कंपनी किती चांगले फिल्टर देत आहे त्याला जास्त पसंती मिळत आहे. त्यांच्या मते भारतात एअर फिल्टरचं ४५० ते ५०० करोड इतकं मोठं मार्केट आहे.

काही वर्षात हे आणखी वाढणार आहे. मार्केट गतीने वाढत असले तरी त्यात जवळपास ८० टक्के वाटा हा भारताच्या उत्तर भागातील राज्यांचा आहे. पण सध्या वाढत्या प्रदूषण, आजारांमुळे ग्राहकांची या बाबतीतली जागरूकता वाढली असून देशातील इतरही  राज्यात याची विक्री लवकरच होईल.

 

filter inmarathi

 

डायसन कंपनीचे सिनिअर इंजिनीअर ब्रायन हू ह्यांनी एका मुलाखतीत म्हणाले की ,”डायसन या ब्रिटिश कंपनीने भारतात एअर फिल्टर तयार करण्यास सुरुवात करत आहेत. ते सध्या भारतातील प्रदूषण व हवेच्या स्तरावर अभ्यास करत असून यासाठी ते आधुनिक एअर फिल्टर बनवत आहेत. ज्यात त्यांचे मशिन्स डायसन या त्यांच्या अँपमुळे कळू शकेल की हवा किती धोकादायक आहे व त्यावर काय उपाय करता येईल”.

 

filter 2 inmarathi

 

भारतात नवनवीन कंपनीज एअर फिल्टर या क्षेत्रात उतरत असून ग्राहकांना परवडेल व त्यांच्या वापरानुसार त्यांच्यासाठी एअर फिल्टर बनवत आहेत. सध्या भारतातील १५ पेक्षा जास्त कंपनीज त्यांचे एअर फिल्टर विकत आहेत. ज्याची किंमत ४००० पासून ते ५०,००० रुपयांपर्यंत आहे. वाढतं प्रदूषण व आजारांमुळे एअर फिल्टर विकत घेणे ही एक प्रकारची गरजच बनली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?