' या मंत्र्याने मदत केली नसती तर, सुश्मिताचा मिस युनिव्हर्स किताब हुकलाच होता! – InMarathi

या मंत्र्याने मदत केली नसती तर, सुश्मिताचा मिस युनिव्हर्स किताब हुकलाच होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय सौंदर्यवती २१ वर्षिय हरनाझ संधूने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून तब्बल दोन दशकांनंतर हा झळाळता मुकूट भारतात आणला आहे. हरनाजच्या आधी एकवीस वर्षांपूर्वी २००० साली लारा दत्ताने हा मुकूट जिंकला होता.

 

harnaz sandhu inmarathi

 

‘मिस युनिव्हर्स’ ही एक जागतिक सौंदर्यस्पर्धा आहे, ज्यामध्ये देशोदेशीच्या अनेक सौंदर्यवती सहभागी होतात आणि किताब जिंकतात. १९९४ साली असेच काही घडले होते. भारतामध्ये झालेल्या ‘मिस इंडिया’ सौंदर्यवती स्पर्धेत तिने ऐश्वर्या राय हिला हरवले होते आणि आपला ‘मिस युनिवर्स’ स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग जिकला होता.

त्यासाठी तिला फिलिपाईन्सला जावे लागणार होते. मुळची बंगाली मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी आपल्या परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेला पात्र ठरली होती. पण एक वेळ अशीही आली की त्या मुलीचे ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भाग घेणे जवळपास रद्द झाले होते.

असे काय घडले आणि कशामुळे ती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकली? इतकेच नाही तर ती स्पर्धा देखील तिने जिंकली. चला तर मग जाणून घेवू या कहाणीमागची कहाणी.

मित्रांनो ‘ब्युटी वीथ द ब्रेन’ अशी भारतीय सौंदर्यवती सुश्मिता सेन हिची ही गोष्ट. मिस इंडियाच्या अंतिम फेरीत ऐश्वर्या रायला हरवून सुश्मिता मिस इंडिया -फॉर मिस युनिवर्स बनली.

 

miss india inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आता पुढची पायरी होती मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होऊन ती स्पर्धा जिकण्याची. त्याच दरम्यान बांग्लादेशात होणार्‍या एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी त्यावेळच्या आयोजक टीममध्ये असणार्‍या ‘अनुपमा वर्मा’ यांनी कायदेशीर ओळखपत्र म्हणून सुश्मिताचा पासपोर्ट मागून घेतला आणि स्वत:कडे ठेवला.

जेव्हा स्पर्धेच्या आयोजकांनी सुश्मिताला पासपोर्ट बद्दल विचारले तेव्हा, पासपोर्ट अनुपमा यांच्याकडे असल्याचा विश्वास असल्याने तिने आयोजकांना निश्चिंत रहायला संगितले. पण जेव्हा स्पर्धेसाठी प्रत्यक्ष फिलिपाईन्सला जाण्याची वेळ आली तेव्हा हे लक्षात आले की सुश्मिताचा पासपोर्ट अनुपमाकडून गहाळ झाला होता.

या गोष्टीची जबाबदारी घेऊन अनुपमा यांनी माफी मागितली तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि इतक्या कमी काळात नवा पासपोर्ट बनवून मिळणे देखील अशक्य होते.

सुश्मिताला संगितले गेले की इतक्या लवकर नवीन पासपोर्ट मिळणे अशक्य आहे तेव्हा तुम्ही आत्ताच्या स्पर्धेत सहभागी न होता पुढे होणार्‍या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी व्हावे.

 

sushmita sen inmarathi

 

आयोजकांकडूनही काही मदत होईल ही शक्यता नव्हती उलट त्यांनी स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या ऐश्वर्याला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी पाठवण्याची तयारी सुरू केली आणि पुढे नोव्हेंबरमध्ये होणार्‍या मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुश्मिताला सांगण्यात आले.

ही तशी अन्यायकारक परिस्थिती होती. तुम्ही जिंकलेली एखादी गोष्ट तुमची चूक नसताना केवळ परिस्थितीमुळे तुम्हाला मिळू शकत नाही हे खरच खूप वेदनादायक असते. सुश्मिताच्या दृष्टीने हा असा काळ होता जेव्हा कोणाचेही मनोबल खच्ची होवू शकले असते.

ती निराश झाली आणि आपल्या वडिलांसमोर तिने आपले मन मोकळे केले. त्यावेळी तिला अश्रु आवरले नाहीत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांचा कोणा मोठ्या व्यक्तीशी परिचयदेखील नव्हता की जो आपल्या अधिकाराचा वापर करून पासपोर्टची अडचण दूर करू शकेल. तिच्या वडिलांना तिची हतबलता समजली होती. स्पर्धेचे कोणी आयोजक देखील मदत करणार्‍यातले नव्हते.

अशावेळी तिच्या वडिलांच्या डोळ्यांसमोर त्यावेळचे केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे नेता असलेले श्री राजेश पायलट यांचे नाव आले.

 

rajesh pilot inmarathi

 

सुश्मिताच्या वडिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तीला अशा अडचणीमध्ये मदत केली पाहिजे असे म्हणत पायलट यांनी सुश्मिताला नवीन पासपोर्ट मिळवून देण्यात मदत केली. त्यांच्या मदतीमुळे सुश्मिताला खूप कमी कालावधीत पासपोर्ट मिळाला आणि ती स्पर्धेत सहभागी होऊ शकली.

नंतरचा इतिहास तुम्ही जाणताच. ती स्पर्धा जिंकून सुश्मिताने पायलट यांचा विश्वास सार्थ ठरवला. मित्रांनो जेव्हा कधी एखादे कार्य उभे राहते त्यावेळी असे अनेक घटक त्यासाठी कारणीभूत असतात.

 

miss universe sushmita sen inmarathi

 

तुम्हाला सुश्मिताची ही स्टोरी कशी वाटली ते आम्हाला अवश्य कळवा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?