आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हे सामाजिक बंधन आहे. वेगवेगळ्या रूढी परंपरा यांचा मिलाफ आपल्याला लग्न समारंभामध्ये पाहायला मिळतो. लग्नदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो , तो अजून स्मरणीय ह्यावा यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातात.
विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
त्यासाठी त्यांनी राज्यस्थान मधील सवाई माधोपुर येथील एका फोर्टची निवड केल्याची बातमी समोर येत आहे. यात नेमकं तथ्य किती आहे ही आत्ता सांगता येणार नाही, पण तुमच्याही मनात तुमच्या लग्नाविषयी अशीच स्वप्नं असतील तर हा लेख तुमच्यासाठी.
तुम्हालाही असंच डेस्टीनेशन वेडिंगची इच्छा असेल तर खालील काही पर्यायांचा तुम्ही नक्कीच विचार करायला हवा!
१. राजस्थान –
जर तुम्हाला रॉयल पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असेल तर राज्यस्थानामध्ये तुम्हाला एकाहून एक सुंदर जागा मिळतील. उदयपूर, जयपूर, जोधपूर ही शहरं डेस्टिनेशन वेडिंगसाठी हॉट लिस्ट मध्ये आहेत. भव्य राजवाडे, महाल, गड इथे लग्नासाठी भाडे तत्वावर मिळतात.
इतिहासाचा वारसा जपत आधुनिकतेने नटलेल्या इथल्या वास्तू या भारतातील तसेच भारताबाहेरील लोकांनाही भुरळ घालतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी लग्नासाठी राज्यस्थानला पसंती देतात.
तिथल्या रिसॉर्ट्स मध्ये सुद्धा समारंभाची उत्तम सोय केली जाते. थंडीच्या दिवसांत लग्नासाठी राजस्थान उत्तम राज्य आहे.
२. गोवा –
जर तुम्ही पार्टी प्रेमी असाल तर तुमच्यासाठी गोवा हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकेल. बऱ्याचदा कपल्स लग्नानंतर हनिमूनसाठी गोव्याला जातात परंतु गेल्या काही वर्षांपासून बीच वेडींगच फॅड बघता गोव्यात लग्न करण्याचा कल वाढू लागलाय.
शिवाय बीच वर करता येणाऱ्या ॲक्टिविटी लग्न समारंभात समाविष्ट करून लग्नाची रंगतही वाढवता येते.
३. केरळ –
जर तुम्हाला हटके पण निवांत लग्न समारंभाची आवड असेल तर केरळ हा चांगला पर्याय आहे. केरळ हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण नाही पण कमीत कमी लोकांमध्ये खास पद्धतीने लग्न करणाऱ्यांसाठी उत्तम जागा आहे.
बॅक वॉटर, नारळाची झाडं, निवांत समुद्र किनारे यामुळे अनेक जण केरळकडे आकर्षित होतात.
–
- जोडीदार निवडताना या ९ चुका झाल्या तर आयुष्यभर किंमत चुकवावी लागू शकते
- फक्त २०,००० रुपयात केलं गेलेलं हे “शानदार” लग्न, सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलंय!
–
४. मसुरी, उत्तराखंड –
धुकं तर कधी बर्फाने भरलेल्या पर्वत रांगांमध्ये आयुष्याच्या आणाभाका घ्यायला कुणाला नाही आवडणार? धुळीने माखलेली शहरे आणि प्रचंड गर्दी पासून सुटका घेऊन तुम्ही डोंगराची राणी मसुरीमध्ये लग्नगाठ बांधू शकता.
हिरवळ आणि सभोवताली असणारे हिमालय पर्वतांचे भव्य नजारे सोबतीला गडवाली जेवणाचा आस्वाद तुमच्या विवाह सोहळ्याला नक्कीच अविस्मरणीय करेल.
५. ऋषिकेश, वाराणसी –
ऋषिकेश आणि वाराणसीसारख्या पवित्र ठिकाणी लग्न करून विलक्षण अनुभवाची अनुभूति घेता येते. इथली शांतता, सुंदर मंदिरं आणि निसर्गाच्या प्रेमात पडून अनेकांनी गंगेच्या काठावर लग्नाच्या गाठी बांधण्यास पसंती दिली आहे.
राजाजी नॅशनल पार्कसुद्धा ऋषिकेशमध्ये लग्नासाठी लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचे महिने इथे लग्नासाठी योग्य आहेत.
६. अंदमान निकोबार –
अलिकडच्या काळात मुख्य भूमीपासून दूर , पांढऱ्या शुभ्र वाळूंचे किनारे असलेल्या खासगी रिसॉर्टमध्ये लग्न करण्यासाठी अनेक जण अंदमान निकोबार या बेटांकडे वळत आहेत.
बंगालच्या उपसागरातील रमणीय किनारे आणि हिरवेगार जंगल भोवती असणारे समुद्र किनारे हे एखाद्या नंदनवनापेक्षा कमी नाहीत. हॅवलॉक आणि रॉस बेटे ही अंदमानातील सर्वात योग्य बेटे आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.