Site icon InMarathi

रामायण सर्किट ट्रेन: भगवी वस्त्र परिधान केलेले वेटर पाहून नेटकरी संतप्त

train ram inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘हा देश कधीही हिरवा होणार नाही तो कायमच भगवा म्हणून राहील’, असं रोखठोक मत मराठीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलून दाखवले. तसेच कंगनाने स्वातंत्र्यप्राप्तीवरून जे वक्तव्य केले त्याला देखील विक्रमजींनी पाठिंबा दर्शवला.

आज देशातील एकूणच वातावरण ढवळले गेले आहे, २०१४ सालापासून जेव्हा भाजपचे  सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासूनच हे राष्ट्र आता हिंदू होणार अशी ओरड विरोधकांनी लावायला सुरवात केली, याला भर म्हणून भाजपचे मंत्री अधूनमधून बेताल वक्तव्य करून उगाच नव्या वादांना जन्म देतात.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बॉलीवूडवाले देखील आपल्या कलाकृतीतून कायमच हिंदू धर्माला टार्गेट करतात अशीही टीका मोठ्या प्रमाणावर झाली, मात्र सरकारनेच सुरु केलेल्या एका धार्मिक कार्यक्रमामुळे लोक संतप्त झाले आहेत, काय आहे ते नेमकं कारण चला तर मग जाणून घेऊयात…

हिंदूंच्या धार्मिक स्थळांना चालना देण्यासाठी IRCTC ने एक विशेष योजना बनवली. रामायण सर्किट नावाने एक विशेष ट्रेन सुरु केली आहे ज्यात रामाशी निगडित धार्मिक स्थळांना या ट्रेनमधून भेट देण्यात येईल. या रेल्वेने एकूण ७५०० किमीचा प्रवास पार केला जाणार आहे.

 

IRCTC ने सुरु केलेल्या या योजनेचे कौतुक सगळ्यांनीच केले, ज्या रामभक्तांना रामस्थळांचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना या सहलीतून सर्व स्थळांना भेटी देता येणार आहेत. या योजनेची पहिल्या सत्रातील ट्रेन ७ नोव्हेम्बरला सुरु झाली, ट्रेनचे फोटो सोशल मीडियावर फिरत होते, मात्र एक व्हिडिओने मोठ्या प्रमाणावर खळबळ माजवली.

ही ट्रेन एका विशिष्ट कारणासाठी बनवली गेली असल्याने त्याचे रंग रूप धार्मिक पद्धतीचे केले गेले मात्र या ट्रेनमध्ये जे सेवक आहेत त्यांना भगवी वस्त्र दिली गेली, आणि त्यांनी देखील भगवी वस्त्र घालून आपले काम केले. ट्रेनमधली कर्मचाऱ्यांचा पोशाख हा भगवा का? साधू संतांचा अपमान करणारी गोष्ट घडली असल्याने अनेकांनी याचा निषेध केला, लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात…

 

वरील व्हिडिओमध्ये आपण पहिले असेल की भगवी वस्त्र, रुद्राक्ष माळा घातलेले वेटर प्रवाशांची सेवा करत आहेत. आता यावरून आलेल्या प्रतिकिया पाहूयात..

 

 

हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्याचे यापेक्षा आणखीन उदाहरण नसेल अशा शब्दात या यूजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, तसेच साधू संतांच्या वस्त्रांचा अपमान केला गेला आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.

 

 

बॉलीवूडने वर्षानुवर्ष हिंदूंच्या मनाला जी अस्वस्थता दिली आहे त्याच प्रमाणे हा प्रकारही तसाच आहे, हा प्रकार रद्द व्हावा, अशी थेट मागणीच या यूजरने केली आहे.

 

 

कोणत्या प्रकारचे हे हिंदुत्व आहे? असा थेट सवाल या उजरने प्रशासनाला आणि रेल्वे मंत्र्यांना केला आहे.

 

 

अशा पद्धतीचे पोशाख घालायची काय गरज आहे?असा थेट सवाल एका यूजरने केला आहे तर स्टाफचे कपडे बदला अशी विनंती एका यूजरने केली आहे

आजकाल लोकांच्या धार्मिक भावना खूपच संवेदनशील झाल्या आहेत. त्यात हिंदू विरोधी एखादि कृती आढळून आल्यास त्यावर तातडीने निषेध नोंदवला जातो. त्यामुळे आज समजत वावरताना आपले भान ठेवून वागावे लागते अन्यथा छोटयाश्या गोष्टीचे रूपांतर वादात होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version