Site icon InMarathi

अमरावती हिंसाचार: महाराष्ट्रातील दंगलीच्या मुळाशी असणारी ‘रझा अकादमी’ कोण आहे?

raza acadamy inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात प्रगत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणून स्थापन केलेल्या या ‘हिंदवी स्वराज्य’ संस्थेत सध्या काही धर्मांध लोक हिंदू, मुस्लिम यांच्यात पुन्हा एकदा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही चिंतेची बाब आहे. आधी मालेगाव, मग अकोला, अमरावती या तिन्ही शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीने आपण विचारांनी प्रगत झालो आहोत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही वर्षांपूर्वी होणाऱ्या दंगली या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने व्हायच्या. सोशल मीडियाच्या सध्याच्या काळात मात्र दंगल सुद्धा ‘घडवून’ आणलेली असते हे आता सर्वांनाच माहीत आहे.

बांग्लादेशमध्ये मंदिरं पाडली जातात, या घटनेचा भारतात शांतीपूर्वक निषेध होतो. पण, चित्र असं रंगवलं जातं की, बांग्लादेशातील मंदिरं पाडण्याचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी लोकांनी मस्जिद जाळली, कोणते तरी जुने फोटो व्हाट्सअप् वर येतात, लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि लोकांचा सार्वजनिक वस्तूंवर राग काढण्याचं सत्र सुरू होतं. हा सर्व नियोजित कार्यक्रम ‘रझा अकादमी’ या संस्थेने घडवून आणल्याचं नुकतंच स्पष्ट झालं आहे.

‘रझा अकादमी’ची स्थापन कोणी केली? त्याचा उद्देश काय आहे? जाणून घेऊयात.

१९७८ मध्ये मोहम्मद सईद नूरी या व्यक्तीने ‘रझा अकादमी’ची स्थापना केली होती. स्थापन करतांना या संस्थेचा असा उद्देश ‘अहमद रझा खान’ या सुन्नी मुस्लिम समाजावर लिखाण करणाऱ्या लेखकाची पुस्तकं प्रकाशित करणे असा होता.

रझा अकादमीच्या वेबसाईटवर त्यांच्या स्थापनेचा उद्देश असा लिहिण्यात आला आहे की, “समाजातील अल्पसंख्यांक लोकांपर्यंत शिक्षणाचं महत्व समजावून सांगणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना तयार करणे.” दक्षिण मुंबईत रझा अकादमीचं मुख्यालय आहे.

मोहम्मद सईद नूरी हा सुरुवातीला मुंबईत धाग्याचा व्यवसाय करायचा. ‘सुन्नी मुस्लिम धर्मातील विचारांचा प्रसार करणे’ ही ओळख मोहम्मद सईदला आपल्या संस्थेची ठेवायची होती. पण, आज रझा अकादमीची ओळख ही ‘मुस्लिम धर्मियांच्या हक्कासाठी दंगल करणे’ अशीच होतांना दिसत आहे.

 

 

२०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर रझा अकादमी ने आयोजित केलेल्या एका मोर्चाला सुद्धा हिंसक वळण प्राप्त झालं होतं.

त्रिपुरा मध्ये बांगलादेशातील मंदीर पाडण्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चानंतर रझा अकादमी ही सक्रिय झाली. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती आणि मालेगाव या शहरांना या संस्थेने सर्वप्रथम आपलं लक्ष्य बनवलं. अमरावती मध्ये १२ नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या नमाज नंतर रझा अकादमीने एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या घराला आग लावली ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी ‘अमरावती बंद’ची हाक दिली होती. पण, या बंद ला सुद्धा हिंसक वळण लागलं आणि असं दर्शविण्यात आलं की, मुस्लिम धर्मीय लोकांचीच दुकानं ठरवून जाळण्यात आली आहेत.

 

 

सत्ताधारी शिवसेना पक्षाने या घटनेची चौकशी करण्या आधीच रझा अकादमी ही ‘भाजपा पुरस्कृत संस्था’ असल्याचं विधान करून लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मोहम्मद सईद नूरी सध्या ‘नॉट रीचेबल’ असल्याने या घटनेची चौकशी होऊ शकत नाही असं स्पष्टीकरण सध्या सामान्य नागरिकांना मिळत आहे.

१९९९ मध्ये सुद्धा रझा अकादमी चर्चेत आली होती ती सलमान रश्दी यांचं साहित्य जाळण्यासाठी आणि त्यांना भारतात येऊ देऊ नये या मागणीसाठी! भारत सरकारने सलमान रश्दी यांना व्हिसा देऊन भारतात येण्याची परवानगी दिलेली असतांना ‘रझा अकादमी’ ही त्यापेक्षा मोठी आहे का? हा प्रश्न तेव्हा सुद्धा सर्वांनाच पडला होता.

लेखिकेला लक्ष्य

रझा अकादमीने लक्ष्य बनवलेली अजून एक व्यक्ती म्हणजे बांगलादेशी लेखिका ‘तस्लिमा नसरीन!

 

 

२००० साली जेव्हा तस्लिमा नसरीन या भारतात येणार होत्या तेव्हा त्यांचा नियोजित कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न सुद्धा रझा अकादमीने केला होता.

भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र वाहिनी बीबीसी यांच्याबद्दल सुद्धा रझा अकादमीच्या मनात रोष आहे. एका व्हिडिओमध्ये बीबीसीने मोहम्मद पैगंबर यांचं चित्र दाखवल्याच्या आरोपात रझा अकादमीने बीबीसीला त्यांच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.

ए आर रेहमानला त्रास

२०१५ मध्ये रझा अकादमीने भारताची शान असलेल्या ए आर रहेमान या गुणी संगीतकाराला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. कारण हे होतं की, ए आर रहेमान हे एका इराणच्या निर्मात्यासोबत ‘मोहम्मद: मेसेंजर ऑफ गॉड’ या सिनेमाच्या संगीतावर काम करत होते.

 

 

२०१८ च्या केरळमध्ये आलेल्या पुरात लोकांना पुनर्वसन करण्यासाठी रझा अकादमीने मदत केली होती असं त्यांनी आपल्या पत्रकात सांगितलं होतं.

२०१२ मध्ये रझा अकादमीने आझाद मैदानावर आयोजित केलेल्या मोर्चात २ निष्पाप लोकांचे जीव गेले होते आणि पोलिसांसह ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आझाद मैदानाच्या २.७४ कोटी रुपयांच्या मालमत्तेची नासधूस केल्याचा रझा अकादमीवर आरोप करण्यात आला होता. मदिनातूल्लाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या मोर्चात झालेल्या नुकसानाची कोणीच भरपाई केली नव्हती.

धार्मिक दिशाभूल करण्यासोबतच ‘कोरोना लस’ला विरोध, ‘तिहेरी तलाक’चं समर्थन अशा विचित्र विचारसरणीमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडत आली आहे.

 

 

बरेलीच्या इमाम अहमद खानच्या नावावरून सुरू करण्यात आलेल्या ‘रझा अकादमी’ या संस्थेची मान्यता रद्द करण्यातच समाजाचं भलं आहे हे आपल्याला सुद्धा वरील घटनांची माहिती वाचून नक्कीच पटलं असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version