' सावधान!! ‘तो’ परत आलाय, तुमच्या मोबाईलमधून तुमचं आयुष्य उध्वस्त करायला… – InMarathi

सावधान!! ‘तो’ परत आलाय, तुमच्या मोबाईलमधून तुमचं आयुष्य उध्वस्त करायला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जोकर हे सिनेविश्वातलं आजही सगळ्यात जास्त पसंत केलं जाणारं निगेटिव्ह पात्र आहे. अगदी बॅटमॅनपेक्षा त्याचीच क्रेझ सगळ्यात जास्त होती.

त्यानंतर मात्र वॉर्नर ब्रदर्सच्याच जोकरने २०१९ च्या मध्यापासून फिल्म जगतामध्ये हवा करायला सुरुवात केली. वॉकीन फिनिक्सने रंगवलेला हा जोकर लेजरने साकारलेल्या जोकरच्या तोडीचा होता.

 

joker inmarathi

 

फिल्म जगतामध्ये हा जोकर सगळ्यांचं आपल्याकडे लक्षकेंद्रित करत होताच तसाच काही वर्षांपूर्वी डिजिटल दुनियेत सुद्धा एक नवीन जोकर आला होता.

‘जोकर मालव्हेअर.’ २०१९ च्या सप्टेंबरमध्ये गुगलने आपल्या गुगल प्ले स्टोअर वरून तब्बल २४ ऍप्लिकेशन तत्काळ काढुन टाकण्याचे आदेश दिले होते. ही २४ अँप याच व्हायरसने इन्फेक्टेड झाली होती.

अशीच काही ७ अॅप्लिकेशन गुगलने पुन्हा बॅन केल्याची बातमी समोर येत आहे. ही अॅप्लिकेशन आता तुम्हाला डाउनलोड करता येणार नाहीत, पण ती मोबाईलमधून तात्काळ डिलिट करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

kaspersky या security firm ने याबद्दल जगाला माहिती दिली असून, ही अॅप्लिकेशन्स ज्यांच्या मोबाईलमध्ये असतील त्यांच्या मोबाईलमध्ये जोकर मालवेअरचा अटॅक होण्याची शक्यता आहे.

 

google play service inmarathi

 

Joker malware हा सर्वप्रथम २०१९ मध्ये नजरेत आला होता, आणि याचा वापर सायबर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी अगदी सोयीचा बनला होता. subscribe based channel च्या माध्यमातून अँन्ड्रॉईड सिस्टिममध्ये शिरून पैसे चोरल्याच्या बऱ्याच घटना २०१९ मध्ये समोर आल्या होत्या.

हा असा एकमेव malware आहे जो गुगलच्याही security system ला सहजासहजी सापडत नाही. गुगल प्ले स्टोअरवरची ही ७ अॅप्लिकेशन्स या जोकर नावाच्या ट्रोजनने भरलेली असल्याकारणाने ती अॅप्लिकेशन्स तातडीने काढून टाकण्यात आली आहेत.

या अॅप्लिकेशनच्या लिस्टमधली मुख्य अॅप्लिकेशन पुढीलप्रमाणे आहेत – Now QRcode Scan, EmojiOne Keyboard, Battery Wallpaper, volume booster, loud sound equalizer, super hero effect, classic emoji effect!

ही सगळी अॅप्लिकेशन्स गुगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आली असून, अजूनही लाखो लोकांनी ती डाउनलोड केली आहेत, तुमच्याही मोबाईलमध्ये यापैकी कोणतं अॅप्लिकेशन असेल तर ते लगेच डिलिट करा.

joker trojan inmarathi

 

सध्याच्या युगात मोबाईल हा सर्वात जास्त sensitive गोष्ट आहे, त्यात जगभरातला डेटा सेव्ह असतो आणि अशा काही व्हायरसमुळे त्याला धोका निर्माण होऊ शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?