Site icon InMarathi

वाजपेयींनी सुरु केलेली दिल्ली-लाहोर बस सेवा, आजही जोडून आहे दोन्ही देशातील नातेसंबंधांना!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रमेश – यार रेहान तू उद्या आम्हाला सोडून जाणार?
रेहान – काय माहिती अब्बा तर हेच बोलतायत की उद्या आपण लाहोर ला जाणार आहोत.
रमेश – रेहान आपण एका देशात का नाही राहू शकत?
रेहान – हे तर धर्मवादी आणि सत्ताधारीच सांगू शकतात.

जेव्हा भारत आणि पाकिस्तान विभक्त झाले तेव्हा ये दोघे मित्र पण वेगळे झाले, त्या नंतर ते एकमेकांना कधीच भेटले नाहीत. जेव्हा पण ईद यायची तेव्हा रमेश त्याच्या वडिलांना रेहान कधी येणार विचारत असे. रेहानला ही रमेश बरोबर घालवलेल्या दिवसांची आठवण येत असे. जेव्हा पण दिवाळी येई तेव्हा त्यांना एकत्र वाजवलेले फाटके आठवत असत. ईद च्या वेळी खाल्लेली खीर आठवत असे, ती मज्जा मस्ती आणि सोबत केलेला दंगा आठवून त्यांच्या डोळ्यांतून अलगद अश्रू खाली पडत असत. नातेवाईकांची तर जणू दिल्ली-लाहोर अशी फाळणीच झाली होती जणू! पण आजही त्यांना एकत्र बांधून आहे दिल्ली – लाहोर बस सेवा…!

tribuneindia.com

१४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री ब्रिटीश सरकारने भारत आणि पाकिस्तान मध्ये फुट पडली,ज्यामुळे एका रात्रीतच किती तरी लोकांना आपला देश सोडून दुसरीकडे राहायला जावे लागले.लोकांनी आपले घर सोडले पण मनातून त्या घरातील आठवणी जात नव्हत्या, ते म्हणत असत की देश बद्दल्याने काही आठवणी पुसून तर टाकता नाही येत ना.! म्हणून या दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी म्हणजेच दोन्ही देशाच्या लोकांना जवळ आणण्यासाठी, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आताचे पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ यांनी दिल्ली ते लाहोर ही बस सेवा सुरु केली.

 

कधी झाली सुरुवात?

फाळणीमुळे वेगळे झालेल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना एकत्र आणण्यासाठी १९ फेब्रुवारी १९९९ मध्ये  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बस दिल्लीच्या आंबेडकर टर्मिनस पासून लोहोरच्या गुलबर्ग आणि ननकानासाहेब बस स्टॅंड च्या दरम्यान चालवली जाते. जे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपल्या लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही बस सेवा खूप लाभदायक आहे.

frontline.in

 

खूप वेळा बंद झाली आहे ही बस सेवा

भारत आणि पाकिस्तान मध्ये प्रत्येक वेळी तणावपूर्ण वातावरण असते हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कारणाने ही बस सेवा बंद पडत असते. २००१ मध्ये संसद भवनावर झालेल्या आतंकवादी हल्यानंतर काही वेळेपर्यंत ही बस सेवा बंद करण्यात आली होती. मागील वर्षी जाट आंदोलनाच्या वेळी सुरक्षेच्या कारणाने दोन दिवस ही बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. उरी हल्यानंतरही भारत आणि पाकिस्तान मध्ये काही समस्या निर्माण झाल्या होत्या,पण त्यामुळे ही बस सेवा जरी बंद करण्यात आली नव्हती, तरी त्या काळात प्रवाश्यांची संख्या मात्र बरीच खालावली होती.

 

सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय कडक व्यवस्था

आंबेडकर बस स्टॅंडमध्ये दिल्ली पोलीस तैनात असतात. बस पोहोचण्याच्या तीन तास आधी बॉम्ब दल संशयास्पद वस्तुंची पडताळणी करतात. लोकांच्या सुरक्षेसाठी फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अटारी-वाघा सीमेपासून आंबेडकर नगर पर्यंत या बसच्या मागे आणि पुढे एक –एक पोलिसांची गाडी असते, त्यामुळे प्रवाश्यांना सुरक्षित पोहचवले जाते.

nation.com.pk

या बसला सुरक्षा देण्यासाठी पाकिस्तानचा मात्र नकार

पेशावर मधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर आणि रोज होणाऱ्या छोट्या मोठ्या हल्ल्यांमुळे पाक सरकारने २०१४ मध्ये ही बस सेवा वाघा सिमेपर्यंत चालवण्याचे ठरवले होते, पण भारत सरकारने प्रवाशांना होणारी सुविधा लक्षात ठेवून बस सेवेमध्ये काहीच बदल केले नाहीत.

metrovaartha.com

भारत आणि पाकिस्तानमध्ये कितीही शत्रुत्व असले तरी ज्यांचे नातेवाईक सिमेपलीकडे आहते त्यांच्यासाठी मात्र हे दोन्ही देश सारखे आहेत आणि त्यांना एकमेकांशी जोडण्याच पुण्याचं काम करते ही दिल्ली-लाहोर बस सेवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version