' विक्रम गोखलेंच्या विधानाचा संबंध, अतुल कुलकर्णी यांच्या ट्विटशी का जोडला जातोय? – InMarathi

विक्रम गोखलेंच्या विधानाचा संबंध, अतुल कुलकर्णी यांच्या ट्विटशी का जोडला जातोय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देशातील एकूणच वातावरण, त्यावर कलाकारांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनतर होणाऱ्या उलटसुलट चर्चा हे आता सामान्य जनतेला काही नवीन नाही. आज सोशल मीडिया इतकं सक्रिय झालं आहे की कोणतंही घटना घडली की राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, कलाकार आपली भूमिका मांडतात, सामान्य माणसू मात्र फक्त या चर्चा बघत असतो.

नुकतंच मराठीतले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुण्यातील एका कार्यक्रमात काही विधान केली, ज्यावरून नेते मंडळींपासून ते अभिनेत्यांपर्यंत सगळेच आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. झालं असं की विक्रम गोखले यांनी कंगनाच्या स्वातंत्र्यबद्दलच्या विधानाला दुजोरा दिला.

 

kangana vikram gokhle inmarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

पुढे ते म्हणाले की, आज वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार आहे अशी ओरड केली जाते, मात्र मोदी सरकार गेल्या साठ वर्षांचा कचरा साफ करत आहेत असे म्हणून त्यांनी आपला पाठिंबा मोदींना आहे हे सांगून टाकले. तसेच कधीकाळी युतीत असलेले भाजप शिवसेना पक्ष आज एकमेकांच्या विरोधात आहेत, तर या दोघांनी वेळीच सत्तेसाठी वाटाघाटी करायला हवी होती असे विधान केले.

 

uddhav-thackeray-amit-shah-inmarathi

आता विक्रम गोखलेंच्या या विधानावरून अतुल कुलकर्णी यांनी आपल्या ट्विटवर वरून मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, साहजिकच त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही मात्र लोकांनी लगेचच त्या ट्विटचा संबंध विक्रम गोखले यांच्या विधानाशी जोडला, नेमकं काय म्हणालेत अतुल कुलकर्णी चला तर मग बघुयात….

 

atul inmarathi

 

ज्येष्ठता आणि शहाणपण या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, कमीत कमी शब्दात अतुल कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या या ट्विटवर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात…

 

atul inmarathi 1

 

विक्रम गोखले तुमचे लोकेशन शोधत आहेत असं रिप्लाय या यूजरने केला असून आझादी हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे.

 

atul inmarathi 2

 

विक्रम गोखले यांच्याबद्दल बोलत असावेत असा अंदाज या युजरने लावलेला दिसून येतो.

 

atul inmarathi 3

 

या मॅडमनी तर खोचक शब्दात विक्रम गोखले यांना  कोपरखळी मारत अतुल कुलकर्णींच्या ट्विटला समर्थन दिले आहे.

आज देशातील एकूणच राजकीय वातावरण चांगलेच ढवळले गेले आहे, आज मोदींच्या बाजूने बोलणारे लोक आहेत तर त्यांचे कट्टर विरोधक मोदींच्या अपयशाबद्दल कायमच त्यांच्यावर टीका करताना दिसून येत असतात. आतापर्यंत अनेक हिंदी, साऊथचे  कलाकार राजकीय प्रतिक्रिया देत असल्याचे दिसून आले आहे मात्र आता मराठी सिनेमातील कलाकार देखील पुढे येत आहेत.

 

naendra modi 1

 

लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात आज प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे त्यातच वाढत्या सोशल मीडियाच्या माध्यमामुळे लोकं आपापली मत मांडत असतात आणि त्यावरून सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगून येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?