' पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही? – InMarathi

पृथ्वी अतिशय वेगाने फिरते, तरी आपल्याला तिचा वेग का जाणवत नाही?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपली पृथ्वी ही सूर्याभोवती आणि स्वतःभोवती सुद्धा फिरत असते, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. विज्ञानाची आवड कमी असली, तरीही पृथ्वी ३६५ दिवसात सूर्याभोवती आणि २४ तासांत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, हे मात्र सगळ्यांना ठाऊक असते.

ही पृथ्वी अशी का फिरते, नेमकीने काय घडते, अशा काही प्रश्नही उत्तरे आपल्याला शाळेत असताना मिळालेली असतात.

अनेकांना मात्र हा प्रश्न पडतो की पृथ्वी फिरते, तर मग ते आपल्याला जाणवत का नाही? शेवटी हे विज्ञान आहे आणि विज्ञानाकडे ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे तसेच या भंडावून सोडणाऱ्या प्रश्नाचे देखील उत्तर आहे. ते देखील स्पष्टीकरणासह.

तुमच्या चौकस बुद्धीला सुद्धा हा प्रश्न कधीतरी पडलाच असेल. याचे उत्तर शोधण्याचा विचार कधीतरी तुम्ही केला असेल. आज आम्ही तुमच्या याच शंकेचे निरसन करणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाच्या दृष्टीकोनातून!

 

earth-rotation-marathipizza01

 

विज्ञान या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणते की,

पृथ्वी ज्या वेगाने भ्रमण करते तो वेग आपल्याला जाणवत नाही, कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जोडले गेलो आहोत आणि त्यामुळे पृथ्वी आणि आपल्यामध्ये कोणतेही थेट relative motion नाही. आपण देखील त्याच वेगाने फिरत आहोत ज्या वेगाने पृथ्वी फिरत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की relative motion म्हणजे काय?

तसे पाहायला गेले तर, सर्वच motion ह्या relative असतात. परंतु आपले शरीरदेखील पृथ्वीसोबत फिरत असल्या कारणाने, आपले शरीर स्थिर असते.

म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपले शरीर देखील फिरत असते. हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.

 

earth-rotation-marathipizza02

 

आपण एका उदाहरणासह ही प्रक्रिया समजून घेऊ म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल.

समजा तुम्ही चालत्या बसमध्ये कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात, तर ते पुन्हा तुमच्या हातातच येऊन पडेल. कारण तुम्ही बसच्या गतीने जात आहात. त्यामुळे त्या गतीचा कॉईनवर कोणताच परिणाम होणार नाही.

पण समजा रस्त्यात एक मोठे वळण आले आहे आणि बस ज्यावेळेस त्या वळणावर असेल, नेमके त्याचवेळेस तुम्ही कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र त्याचा कॉईनवर परिणाम होईल. अशावेळी ते कॉइन इतरत्र जाऊन पडेल.

कारण बसने वेगळ्या दिशेमध्ये गती घेतल्यामुळे कॉईनची स्थिर स्थिती बदलली आणि कॉईन देखील बसच्या गतीबरोबर जाऊ लागला.

 

earth-rotation-marathipizza03

 

त्याचप्रकारे, आपण देखील पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो. त्यामुळे आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही. आपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवेल, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.

शांघाई माग्लेव ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिचा वेग आहे ताशी ४३१ किमी! पण आपल्या पृथ्वीचा वेग त्याहून कितीतरी जास्त म्हणजे ताशी १६७० किमी इतका आहे.

जर तुम्ही कधी या ट्रेनने प्रवास केलात तर त्यावेळेस ट्रेनमध्ये जोरात उडी मारून पहा, जेव्हा तुम्ही हवेत असाल तेव्हा तुमचा पृथ्वीशी असलेल्या गतीसोबतचा संपर्क तुटेल आणि तुम्ही चांगलेच धडपडाल! (पण हा साहसी प्रकार जरा जपूनच ट्राय करा)

 

earth-rotation-marathipizza04

 

आणि मग तुमच्या अगदी नीट लक्षात येईल की पृथ्वी ही जगातील सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा ही जास्त वेगाने फिरते, तरी आपल्याला तो वेग का जाणवत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?