“डावखुऱ्या” पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत जास्त – “लेफ्टीं”बद्दल २० रंजक गोष्टी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मित्रांनो तुम्ही खूप वेळा वयस्कर व्यक्तींना हे बोलताना ऐकले असेल की, डाव्या हाताने जेवणे चांगले असते. तुमच्यापैकी अनेक जण डावखुरे असतील.
तुम्हाला लहानपणी अनेकांचा ओरडाही पडला असेल की, डाव्या हाताने खाऊ नको आणि त्या हाताने काही कामही करू नको,
सगळी कामे उजव्याच हाताने करत जा वगैरे वगैरे! परंतु असं थोडीच आहे ना, कोणी डाव्या हाताने काम करो वा उजव्या हाताने काम करो त्याने जास्त काही फरक पडत नाही.
जर काम चांगल्या पद्धतीने होत असेल तर डाव्या हाताने काम करण्यास देखील काही समस्या नाही.
तुम्हाला कदाचित माहित असेलच की, आपल्या देशातील काही प्रसिद्ध व्यक्ती या डावखुऱ्या आहेत.
उदा. सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रतन टाटा आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पण हे खरं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील डावखुरेच आहेत. (पूर्णत: नाही, काही गोष्टी ते उजव्या हातानेही करतात.)
जगात कित्येक अशी नावाजलेली माणसे आहेत जी डावखुरी आहेत. आज आम्ही तुम्हाला डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांविषयी तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आजवर कधीही ऐकल्या नसतील.
१.जबरदस्त तणावात असणाऱ्या गर्भवती महिला डावखुऱ्या मुलाला जन्म देतात असे निदर्शनास आले आहे.
२. उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत डावखुऱ्या लोकांचे कारचे अपघात होण्याची शक्यता ८५ टक्क्यांनी जास्त असते.
३. स्त्रियांच्या तुलनेत डावखुऱ्या पुरुषांची संख्या जास्त असते.
४. उजव्या लोकांच्या तुलनेत डावखुऱ्या लोकांच्या बोटाची नखे जास्त लवकर वाढतात.
५. LRRTM1 एक असा जीव आहे, जो माणसाला डावखुरे बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
६. वेळेच्या आधी जन्म घेणारी मुले बहुधा डावखुरी असतात.
७. ज्या स्त्रिया ४० वर्षाच्या नंतर मुलांना जन्म देतात ती मुले डावखुरी होण्याची शक्यता १२८ टक्के इतकी जास्त असते.
८. उजव्या लोकांपेक्षा डावखुरे लोक मद्यपानाच्या आहारी जाण्याची शक्यता ३ पट जास्त असते.
९. प्रत्येक वर्षी २५०० पेक्षा जास्त डावखुऱ्या लोकांना उजव्या लोकांसाठी बनवलेल्या उपकरणांनी मारले जाते.
१०. जर आई – वडील दोन्ही डावखुरे असतील तर ५० टक्के शक्यता असते की मुलही डावखुरेच असेल. तेच उजव्या असणाऱ्या आई – वडीलांची मुले डावखुरी होण्याची शक्यता केवळ २ टक्के असते.
११. डावखुऱ्या लोकांना उजव्या लोकांच्या तुलनेत छातीचा कर्करोग होण्याची भीती जास्त असते.
१२. डावखुऱ्या लोकांची केस कसेही वाढतात, त्यांच्या तुलनेत उजव्या लोकांचे केस सरळ वाढतात.
१३. डावखुऱ्या लोकांना एलर्जी, अनिद्रा आणि माइग्रेनची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
१४. डावऱ्या लोकांची नकारात्मक भावना जास्त असते,त्यांना उजव्या लोकांच्या तुलनेत लगेच राग येतो.
१५. डावखुरे लोक उजव्या लोकांपेक्षा जास्त हुशार असतात.
१६. डावखुरे लोक अनेक कामे एकाचवेळेस करण्यात उजव्या लोकांपेक्षा जास्त निपुण असतात.
१७.डावखुरे लोक हे बहुधा अन्न डाव्या बाजूने चावतात तेच उजवे लोक जास्त करून अन्न उजव्या बाजूने चावतात.
१८.अमेरिकेत ३ करोडपेक्षा जास्त लोक डावखुरे आहेत.
१९. डावखुरे व उजवे होण्याने तुमच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही.
२०. डावखुऱ्या लोकांना Dyslexia आणि Stuttering सारख्या समस्या असतात.
या रंजक गोष्टी तुमच्या डावखुऱ्या मित्रांना नक्की सांगा
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.